Skip to main content

स्नेह संमेलन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
फेबु..मुक्त पिठ.. अश्या अनेक समुहाची स्नेह संमेलने होत आहेत/ असतात .. मिपा चे हि स्नेह संमेलन असावे का? त्या निमित्ताने सभा सदांच्या भेटी गाठी होतिल व स्नेह भोजनाचा कार्य क्रम हि होईल... अशी योजना राबवता येईल का? चिंता मणी..परा व अनेक अशी अनेक अनुभवी मंडळी हि या समुहावर आहेत.. प्रयत्न केला तर होउ शकते.. मान्यवरानी आपली मते मांडावी..

वाचने 4743
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

उत्तम कल्पना...

मिपाच्या भाषेत त्याला कट्टा म्हणतात आणि असे कट्टे वरचेवर ठिकठिकाणी होतच असतात. असो, कट्ट्याला शुभेच्छा!

In reply to by सुनील

जर स्नेह संमेलनाला कट्टा असे म्हणत असतील तर मुळीच नको तो कट्टा प्रकार .... एकदा अनुभवलाय मी माझ्या डोंबिवलीत ... हे असे कट्टे खूपच सेल्फ सेंटर्ड आणि एखाद्याला(तो एखादा मी नव्हे) प्रत्येक कट्ट्याच्या दिवशी 'बळीचा बकरा' बनवून त्याच्यावर हास्यविनोद करून मैफिल जिंकायची. आपल्याच मित्रांची चार चौघात अशी अवहेलना करून असे कोणते सुख मिळते देव जाणे... जो मनुष्य (मी) कट्ट्यावर पहिल्यांदा आला असेल त्याच्यावर याचा काय प्रभाव पडेल.. त्याला हे दुषित वातावरण आवडेल वा नाही... तो दुस-यंदा कट्ट्यावर येईल वा नाही ... याचा तिळमात्रही विचार केला जात नसे .. तेव्हापासून या 'कट्टा' प्रकाराचा आपण बुवा धसकाच घेतला आहे... कोणास ठावूक, जर कट्ट्यावर नवीन आलेल्या माणसाची देखील टर उडविण्याची त्या कट्ट्याची परंपरा असेल तर त्या माणसाचा तर आत्मविश्वासच जाऊ शकतो ... कै च्या कै होईल.... छ्या छ्या ... इथे तसे प्रकार नसतात असे कोणी 'लिहून' जरी दिले तरी आपण १०० वेळा विचार करू कट्ट्यावर येण्याच्या आधी... बाकी तुम्ही चालू ठेवा.. आम्ही फोटू बघून आनंद घेऊ ... :)

काही नको. जे चाललय ते ठीक आहे. प्रत्येकजण आपापले गुणदर्शन वेळोवेळी घडवीत असतो/तेच. आणखी वेगळे कशाला? तुम्हाला सदस्यांना भेटायचे असेल तर कट्टा करा.

In reply to by रेवती

अरेरे, संपादकांनीच असे म्हटलेले पाहून अं ह झालो. असो. कट्टा पुण्यात असेल तर येऊ ( आणि कट्ट्याच्या वेळी आम्ही पुण्यात असलो तरच) !! तसंही काही कट्टे म्हणजे स्नेह कमी संमेलनच फार अशी गत असल्याने चालू द्या.

'कट्टा' करा, नाहीतर आम्ही 'कट्टी' करू. भारतात असलो तर जरून येईन.

हा इंटरेष्टींग भाग आहे !! शाकाहारी कि मांसाहारी .. शाकाहारी मध्ये पनीरवाले / बिना पनीर वाले आहेत ... काय मेनु ठेवायचा ??(यावर उपस्थीती अवलंबून असेल ;) )

In reply to by कवितानागेश

चला रे, स्टेजखाली लावायला फटाके जमवा.. ;-) (अध्‍यक्षीय भाषण आणि संमेलन उधळून लावण्‍यास उत्सुक) यक्कू

In reply to by परिकथेतील राजकुमार

किती, कधी अन कुट धाडाची पोरं ? सोबतीला टमाटे अंडे पायजेल का ? समदं डिटेल सांगा आणि तुमचा इमिल पण द्या थेट व्काटेशन देतो.