गोवा
मालवण सोडता सोडता दोन अजब पाट्या नजरेस पडल्या. पहिली पाटी ही. काही अर्थबोध होईना.....
दूसरी पाटी ही. ह्याचा काही अर्थबोध गावकर्यांना झालेला दिसत नाहिए. अतिक्रमण विरोधी कायदेशिर पाटीच अतिक्रमणाने घेरलेली आहे.
मालवण सोडून निघालो तो दिवस शिमग्याचा होता.
कोंकणात शिमगा तसा मोठा सण. आठवडाभर चालतो. शिमग्याच्या निमित्ताने गावातील कलाकार मंडळी पौराणिक सोंगे घेऊन गावभर नाच/कार्यक्रम सादर करतात. एक गोष्ट जाणवली सोंगांचे मुखवटे-वेश पुर्वी सारखे थातूरमातूर नसून चांगल्या प्रतीचे होते.
हा नरसिंव्ह. तसा कुपोषित दिसत असला तर चेहर्यावरचा आवेश वाखाणण्याजोगा आहे.
सर्वात पहिला प्रयोग ग्रामदेवतेसमोर होतो. गायक, वादक आणि कलाकार मंडळी पुराणातील एकेक प्रसंगावर नृत्यनाट्य सादर करतात.
वीर हनुमान....
कलाकारांचे कौतुक करून मार्गस्थ झालो.
गोव्याच्या वाटेवर पुढचे ठिकाण लागले सावंतवाडी. हेच ते सावंतवाडीचे प्रसिद्ध तळे.
सावंतवाडीत राज्य परिवहन मंडळाच्या आगाराकडून बेळगावकडे जाणार्या रस्त्यावर आहे भालेकर ह्यांची प्रसिद्ध खानावळ. मत्स्यप्रेमींनी अगदी न चुकवावे असे श्रद्धास्थान. जेवणाची इतकी ओढ लागली होती की छायाचित्र काढायचे राहून गेले. इथे जेवून तृप्त मनाने गोव्याकडे प्रस्थान ठेवले.
गोव्याचा फेसाळता समुद्र किनारा.
शांत सावल्या आणि अथांग सागर.......
नयनरम्य गोवा.
शांतादूर्गाच्या वाटेवर कवी पद्मश्री बा. भ. बोरकरांचे निवासस्थान लागते.
एकूणातच कोंकणातील आणि गोव्यातील रस्ते वनश्रीने नटलेले. प्रवास कसा संपतो कळत नाही. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो शांतादूर्गा मंदिरात.
मंदीर आतूनही एकदम स्वच्छ आणि नेटके आहे.
शांतादूर्गाचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागलो. येताना आंबोली मार्गे आलो. आंबोली घाटही मोठा निसर्गरम्य आहे.
घाटात एके ठिकाणी धबधबा आहे. सध्या पाणी नाही पण पावसाळ्यात पर्यटकांची झुंबड उडते. पूर्वी एकच टपरी होती चहाची आता १०-१२ झाल्या आहेत. ह्या वेळी बहुतेक टपरी धारी मराठी दिसले. बरे वाटले.
समाप्त.

समाप्त.लेखनविषय:
याद्या
12172
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
फोटो आणि वृत्तांत आवडला
छान आले आहेत फोटो, दोन
मस्तच.
..ह्या वेळी बहुतेक टपरी धारी
काळ बदलला....
In reply to ..ह्या वेळी बहुतेक टपरी धारी by स्पंदना
सुंदर फोटो. गोवा फारच झटपट
ऐसाच्च बोलती हय!!!
In reply to सुंदर फोटो. गोवा फारच झटपट by प्रचेतस
हम्म्म्म! खरंय.
In reply to सुंदर फोटो. गोवा फारच झटपट by प्रचेतस
फोटो खूप छान ,
काका फोटो मस्तच पण ईतके कमी
धन्यवाद.
In reply to काका फोटो मस्तच पण ईतके कमी by पियुशा
वा मस्त फोटो.. स्मरणरंजनाचा
धन्यवाद.
In reply to वा मस्त फोटो.. स्मरणरंजनाचा by गवि
एकंदर सुट्टीत मस्त मजा केलेली
+१
In reply to एकंदर सुट्टीत मस्त मजा केलेली by गणपा
+२
In reply to +१ by प्यारे१
सुन्दर फोटो.पुराण़कालिन
फोटो आवडले. गोव्याच्या
मस्तच
धन्यवाद.
गोव्याची सफर आवडली. हे असे
मस्त फोटो!
वृत्तांत आणि छायाचित्रे
वाह
फोटो आणि वृत्तांत आवडले....
धन्यवाद.
वा! छान