भारतिय र्गुप्तचर विभाग सक्शमरित्या काम करते आहे?
वाचने
827
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
माझ्यामते भारतीय गुप्तचर विभागाचे काम फारच ढिसाळ असले पाहीजे.आपल्याकडे इतके बाँब्स्फोट होतात्,इतक्या सार्या गोष्टी होतात पण तरीही फारच कमी गोष्टी थांबवल्या जातात. साहजिकच गुप्तचर विभागाचा दोष आहे.
माझ्या मते केवळ गुप्तचर विभागाला दोष देऊन चालणार नाही. सर्वानी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे. डोळसपणे आजूबाजूला पाहून जर काही सन्शयास्पद घडत / वाटत असेल तर ताबडतोब पोलिसाना कळवायला हवे. फक्त सरकारने काम करावे मी घरी बसून टीका करणार ही व्रूत्ती सोडून एकत्रित आलो तर खरच परिस्थिती लवकरच बदलेल.
या इथे कोणी हो किंवा नाही असे कोणतेही उत्तर दिले तर नक्की काय माहिती मिळणार आहे?
हे असले धागे काढुन असा कोणता निष्कर्ष निघणार आहे.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
In reply to या इथे by विजुभाऊ
विजुभाऊंशी १००% सहमत.
आणि इथे मतं मांडणाय्रा लोकांना किती आतली माहिती आहे की त्यांच्या मताला काही वजन असावं?
अदिती
अगदी बरोबर बोललात. हा विषय इथे चर्चा करून नक्की काय मिळणार आहे??
उगाच ट्रॅफिक जाम...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
असे कौल उडवायला पाहिजे असे वाटायला लागले आहे. !!!!
(स्वगत : मालकाशी आणि संपादकांशी चर्चा करावी म्हणतो)
अवांतर : तस्से पाहिले तर कौलच नव्हे, तर अनेक गोष्टीं इथे आणि समाजात असतात आणि त्यावर आपण चर्चा करत असतो. ज्याचे निष्कर्ष नाहीत मग त्यावर चर्चा करु नये का ?
In reply to नकारात्मक प्रतिसाद आल्यावर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवांतर : तस्से पाहिले तर कौलच नव्हे, तर अनेक गोष्टीं इथे आणि समाजात असतात आणि त्यावर आपण चर्चा करत असतो. ज्याचे निष्कर्ष नाहीत मग त्यावर चर्चा करु नये का ?
मला हा गुप्तचरखात्याचा विषय महत्त्वाचा वाटतो .....शीर्षक वाचून आत शिरलो तर घोर निराशा झाली....
चर्चा करावी पण कौल टाकणार्याने निदान हा कौल घेण्याचे कारण काय ? त्या कौलाबद्दल स्वतःची मते काय ? कौलाच्या निष्कर्षातून काय सिद्ध करायचा हेतू आहे?याबद्दल निदान स्वतः काहीतरी लिहावे ... नुसती एक ओळ टाईप करून त्यावर काथ्याकूट कसा करायचा?
अवांतर : बरेच लोक हल्ली कोणत्यातरी वर्तमानपत्राचा दुवा देतात आणि म्हणतात वाचा.... अरे काय वाचा? का वाचा? ते तू का वाचलंस? तुला आवडलं का? असलं तर का? नसलं तर का? ते नको का लिहायला?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
In reply to अवांतर : by भडकमकर मास्तर
भडकमकर मास्तरांशी सहमत. मी पण शिर्षक वाचुन आत शिरलो आणि घोर निराशा झाली.
एका चांगल्या चर्चेची अपेक्षा होती पण सुरवात ही कौल टाकणार्याने करायला हवी ...
फुकटचे कोंबडे लढवुन मजा बघण्यात काय अर्थ ???
विषय खरेच महत्वाचा आहे, चांगली चर्चा होऊ शकते ...
निश्कर्ष काय निघतो व त्याचा उपयोग काय हे प्रश्न जरी वादाचे असले तरी विषय उत्तम ...
पाहु दुसरा धागा सुरु करु ...
पण हा असा कौल मात्र फक्त निर्रथकच !
सुस्पष्ट - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
कौलाचा निष्कर्ष हा नव्हे की खरोखर गुप्तचरविभाग सक्षम आहे की नाही.
कौलाचा निष्कर्ष असा आहे की याबद्दल लोकांचे काय मत आहे.
काही परिस्थितींमध्ये मूळ सत्यासत्याइतकीच "लोकांना काय वाटते" हा प्रश्नही महत्त्वाचा असतो. ठळक उदाहरण म्हणजे "अमुक बँक बुडणार आहे का?" बहुतेक लोकांना वाटत असेल की बँक बुडणार, तर त्याचा बँकेवर परिणाम होतोच. मग त्या त्या बँकेची वास्तविक परिस्थिती त्या मानाने भक्कम असली, तरी लोक आपले पैसे काढून घेतील, आणि बँक बुडेल... इ.इ.
लोकशाहीत "सरकार वास्तविक काय करते" याच्याइतकाच "लोकांना सरकार काय करते असे वाटते?" हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
"सद्दाम-इराक कडे महाध्वंसक शस्त्रास्त्रे असल्याचे बुश सरकारची गुप्त माहिती खरी होती का?" या प्रश्नाइतकाच महत्त्वाचा प्रश्न आहे "लोकांना खरी वाटली का?"
मग माहिती वास्तविक खरी असो नसो, अमेरिका युद्धात उतरणे अटळ होते.
मोठ्या आणि दीर्घकालिक राज्यांची गुप्तहेरसेवा नेहमीच बरेच काहीकाही गुप्तपणे करत असते - ते आपल्याला ठाऊक नसते कारण त्या संस्था गुप्त आहेत.
पण बहुतेक लोकांना आपला देश अति-सचोटीचा, अति-सहिष्णू, आणि लेचापेचेपणाकडे झुकणारा आहे असे वाटणे महत्त्वाचे आहे. नाहीतर बोजड सुरक्षाव्यवस्थेला बिनशर्त अधिकाधिक पैसे पुरवायला मतदार तयार होणार नाही. हिशोब मागेल. हिशोब दिला-घेतला की सुरक्षाव्यवस्था गुप्त राहाणार नाही. गुप्त राहाणार नाही तर कार्यक्षम राहाणार नाही - असा एक मतप्रवाह आहे. (सुरक्षाव्यवस्था गुप्त असणे अपरिहार्य आहे, म्हणून ती बिनहिशोबी =बोजड/भ्रष्ट असणे अपरिहार्य आहे.)
या कौलातून "लोकांचे मत काय?" असा महत्त्वाचा कानोसा घेता येतो.
In reply to कौलाचा निष्कर्ष वेगळा आहे by धनंजय
धन्याशेठशी सहमत आहे!
बाय द वे, माझं मत -
मुळीच सक्षम नाही. नाहीतर इतके धडाध्धड बाँब फुटलेच नसते! आजकाल साला कुठेही कधीही बाँब फुटू शकतो आणि त्यात निरपराध लोकांचा बळी जातो. उपयोग काय त्या गुप्तचर विभागाचा? फुकटचा पगार खातात साले!
तात्या.
ठळक उदाहरण म्हणजे "अमुक बँक बुडणार आहे का?" बहुतेक लोकांना वाटत असेल की बँक बुडणार, तर त्याचा बँकेवर परिणाम होतोच. मग त्या त्या बँकेची वास्तविक परिस्थिती त्या मानाने भक्कम असली, तरी लोक आपले पैसे काढून घेतील,
हे उदाहरण गैरलागु आहे. कारण बॅन्क बुडत असताना त्यातले शक्य तेव्ढे पैसे काढता येतात.
गुप्तचर विभाग अक्षम आहे असा निष्कर्ष निघाला तर काय करायचे.
हल्ली सरकारच डोके ठिकाणावर आहे का? असले अग्रलेख लिहुनही उपयोग होत नाही.
सरकार बदलणे हेही हाताबाहेरचे आहे.
देश बदलणे म्हणावे तितके प्रॅक्टिकल नाही.
मग कौलाचा निष्कर्ष काय येतो याचा काय फरक पडणार आहे. आणि तो निष्कर्ष काढुन आपण तरी काय मिळवणार आहोत?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
In reply to ठळक उदाहरण by विजुभाऊ
ठळक उदाहरण नेमके गैरलागू आहे - पण ते दिले कारण त्याविषयी एकमत आहे. त्याच्या उपमेने पुढील नेमके उदाहरण लावावे.
नेमके उदाहरण "सद्दाम-इराककडची शस्त्रास्त्रे/अमेरिकेची गुप्तहेर संस्था/लोकांचे गुप्तहेरसंस्थेबद्दल मत" हे होते.
"अमेरिका युद्धात उतरणार" हे निश्चित भाकित "अमेरिकन लोकांना अमेरिकेची गुप्तहेर संस्था सक्षम वाटते" यावरून सांगता आले होते. "सद्दामकडे शस्त्रे खरोखर होती की नव्हती", किंवा "अमेरिकन गुप्तहेर संस्था खरोखर सक्षम आहे की नाही" या प्रश्नांचा काही
लोकांचे मत कळण्याचा मला फायदा हा -
१. माझे मत वेगळे असेल, अमेरिकेने युद्धात उतरू नये असे वाटत असेल, तर लोकांमध्ये "सद्दामकडे शस्त्रास्त्रे नाहीत/अमेरिकन गुप्तहेर संस्था या बाबतीत सक्षम नाही" अशी माहिती पसरवणे.
२. मला अमेरिकेच्या-इराकच्या भल्याचे सोयरसुतक नसेल, पण भारताचे धोरण आखायचे असेल, तरी "अमेरिका युद्ध करणार" हे भाकित उपयोगी आहे.
३. मला अमेरिकेच्या-इराकच्या भल्याचे सोयरसुतक नसेल, भारताचे धोरण आखण्यात माझा हात नसेल, तरीही मोठ्या युद्धामुळे शेअरबाजार बदलतोच. मी माझे पैसे युद्धसामग्री-उत्पादकांमध्ये आणि तेल-उत्पादकांमध्ये अधिक गुंतवावेत.
४. माझ्याकडे शेअरबाजारात गुंतवण्यासाठी पैसे नसतील तरी युद्धामुळे इंधनतेलाचा भाव वाढणार असे भाकित लक्षात घेऊन काटकसर वाढवावी.
विजुभाऊ म्हणतात : "मग कौलाचा निष्कर्ष काय येतो याचा काय फरक पडणार आहे." वरील चार मुद्दे अशा प्रकारे व्यापक ते वैयक्तिक अशा सर्व स्तरांवर ही माहिती उपयोगी आहे. ज्यांना लोकमत बदलता येते, ज्यांना सरकार बदलता येते, ज्यांना अर्थकारण बदलता येते, आणि ज्यांना स्वतःची काटकसर बदलता येते, सर्वांसाठीच अशा प्रकारच्या कौलाचा फायदा करून घेता येतो.
मी मुद्दामून अमेरिकेचे उदाहरण दिले आहे. इतक्या तटस्थपणे स्वदेशाबद्दल बोलायची आणि ऐकायची आपल्याला सवय नाही. वाचकाने स्वतःचा दृष्टिकोन आणि उद्दिष्ट्ये जाणून या कौलाचा उपयोग "स्फोट/भारतीय गुप्तहेर संस्था/संस्थेबद्दल लोकांचे मत" या विषयाला लावून घ्यावे. अमेरिकेबद्दल मुद्दे १-४ सारखेच मुद्दे आजमवावे. ज्या कुठल्या स्तरावर आपल्याला कार्यशक्ती आहे, तिथे निष्कर्षाचा फायदा करून घ्यावा.
In reply to बरोबर by धनंजय
धनंजयचा रोख हा तुमच्या 'सर्कल ऑफ इंफ्लूअन्स' मधे तुम्ही प्रभावी काम/बदल करु शकता, तिकडे आहे.
'सर्कल ऑफ इंफ्लूअन्स' - म्हणजे एखाद्या निष्कर्षातून जेव्हा काही निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आपली पोच जिथपर्यंत आहे त्या परिमितीत आपण त्या निष्कर्षाचे फायदे अनुभवू शकतो.
तुम्ही स्वतः, तुमचे कुटुंब, तुमची मित्रमंडळी, परिसरातले लोक, तुमचा निवडणूक वॉर्ड, शहर, तालुका, जिल्हा..ह्या क्रमाने ते वर्तुळ विस्तारत जाऊ शकते!
चतुरंग
माझ्यामते