Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on Sat, 04/07/2012 - 12:26
नमस्कार, ३/४ दिवसांपुर्वी श्री.मन ह्यांनी "विमान प्रवास कसा करावा?" ह्या बाबत काही सुचना आणि सल्ले मागितले होते...असे सल्ले देण्यात मराठी माणुस नेहमीच पुढाकार घेतो, आणि मी पण त्याला अपवाद नाही...त्यांनी हे सल्ले सगळ्यांना सांगा अशी एक प्रती-सुचना केली आणि आपण पण एक १००% मराठी आहोत असे सिध्ध केले.. विमान प्रवास सुचना आणि सल्ले...वाचुन सोडुन द्या....फारच मुल्यवान वगैरे वाटल्या तर जपुन ठेवा... अ.) बैठक राखुन ठेवा.....आज-काल बैठक आधीच राखुन ठेवता येते...शक्यतो खिडकीची बैठक घ्या....(खुलासा पुढे आहे...चिंता नसावी...अगदीच घाई असेल तर (हा) कडे वळा..)... ब.) शक्यतो कानात बोळे घाला आणि फक्त १ तास लवकर जा... बैठक राखुन ठेवल्यामुळे , विमान कर्मचारी आपली चरफडत वाट बघत असतात..सामान घेण्या पासुन ते व्यवस्थित विमानात चढवे पर्यंत सर्व मदत करतात...अगदी बोर्डिंग पास सकट.. क.) आपल्या कानात बोळे असल्याने , ते चिडलेले विमान कर्मचारी , आपल्याशी अजुन हळु बोलतात... हळुच बोलल्यामुळे ते चिडु शकत नाहीत....(स्वतः वर प्रयोग करुन बघा....पटेल...)...राग येवुन पण तो चिडु शकत नाही त्यामुळे तो अजुन चरफरडतो....ते त्याच्या चेहर्‍यावर दिसते...मस्त मजा येते ही गम्मत बघायला...खुप चिडला तर Feed Back Form मागा....सगळे विमान कर्मचारी ह्या Feed Back Formला घाबरतात... ड.) हे विमान नसुन हवेत उडणारी बस आहे असे समजा.. ई.) एयर इंडिया नामक एक विमान कं. आहे तिने जा....ती हवेतील कसरती छान करुन दाखवते..माझी विमान प्रवासाची भिती पार पळुन गेली आहे...एकदाच ह्या कं.ला पैसे दिले...सगळे वसुल झाले...आपल्या जीवाची किंमत पण कळाली.....सासु बाईंना एकदा ह्या कं. चे तिकीट दिले..नंतर परत कधी त्या, घरी आल्या नाहीत...फार जालीम उपाय आहे.... फ.) एक-दोन पेग आधीच मारुन घ्या...विमान वर जाण्याआधीच आपले शरीरच एक मस्त विमान झालेले असते...आधी मला पण बस लागायची..मी हा प्रयोग बस-प्रवासात करुन बघितला आहे...आणि तो उत्तम आहे...(ती कथा परत कधीतरी)....तुम्ही पण हा प्रयोग विमान प्रवास करतांना करुन बघा आणि अनुभव सांगा...(मी विमान प्रवासासाठी हा प्रयोग केलेला नाही...तुम्ही जर हा प्रयोग केला तर त्याचे मानधन म्हणुन "मि.पा." वर लेख टाका...त्याचे १०० प्रतिसाद हेच तुमचे प्रति मानधन समजा...) ग. ) तंबाखु खात असाल तर उत्तम....ती खाल्ली की काहीच लागत नाही...तोंडात असलेल्या तंबाखुच्या पानाशिवाय आमचे पान पण लिहुन होत नाही....सकाळचा परसदारचा प्रवास असो की विमान प्रवास हे पान आधी...तुम्ही पण हा प्रयोग करुन बघा... ह. ) Internet Connection असलेला Laptop जवळ ठेवा आणि "मिसळपाव"ला भेट द्या...आपण हसतोय असे बघितले तर शेजारी मस्त जळतो..(भारतात सार्वजनिक ठिकाणी आणि त्यात पण विमानात एक्ट्याने हसणे हे पाप समजतात)..ते बघुन मग अजुन २/३ "दिल खेचक" साईट त्याला हळुच दिसेल अश्या उघडा आणि बंद करा....तो चिडेल आणि मग तुमचा वेळ पण जाईल....तुम्हाला जरा जरी कंटाळा आला की हिच गोष्ट परत करा... हा ) मध्येच एकदा विमान कर्मचार्‍याला Feed Back Form मागावा आणि त्याचे नाव विचारुन, लगेच विसरुन जावे...त्याला तो Form आणतांना बघुन ती उदबत्तीची कांडी किंवा कचकड्याची बाहुली किंवा पाप्याचे पितर उर्फ हवाई सुंदरी वैतागते...एका पुरुषाने दुसर्‍या पुरुषाला असे काही भले करणारे मागितले की सर्वच महिला कर्मचारी वैतागतात...पण ती काही जीव द्यायला उडी मारत नाही... हा राग ती मग आपल्याला खाण्याची सेवा देतांना व्यक्त करते, आणि जास्तीचे खाणे देते..(आंतर राष्ट्रीय प्रवासात २/३ पेग जास्त मिळतात्..आणि सर्वात शेवटी उतरण्यापुर्वी एखादी पाण्याची बाटली व २/३ चकण्याची पाकिटे)....आपली खिडकी जवळ बैठक असल्याने ती थोडी अजुन झुकते व त्याच्याशी अबोला धरते...मग त्या दोघांचे भांडण बघत आपला वेळ छान जातो...बरं, परत ती हवाई सुंदरी आपल्याशी गोड बोलतांना आणि वाकलेली बघुन शेजारी अजुन चिडतो... ही ) थोडक्यात काय तर आपल्या आजुबाजुंच्या व्यक्तींना जेवढा त्रास देता येईल तेव्हढा द्या....."इतरांचे तळतळाट आणि शाप , हेच आमचे समाधान" हे भारतिय नेत्यांचे ब्रह्मवाक्य लक्षात ठेवा.... ह्या मुळे तुमचा प्रवास सुखकर होईल की नाही ते माहीत नाही...पण लेख वाचतांना तुमच्या ४ घटका तर हसत खेळत गेल्या ना..... आपलाच मित्र टवाळखोर ता.क. : Feed Back Form काही-बाही वाटेल ते लिहुन पाठवा...कुणीही तो वाचत नाही....
  • Log in or register to post comments
  • 9806 views

प्रतिक्रिया

Submitted by अमोल खरे on Sat, 04/07/2012 - 12:47

Permalink

सहीच

मजा आली. :)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 04/07/2012 - 13:16

Permalink

बा### !

सगळ्यात आधी विमान उडायच्या आधी खिशात बिल भरण्याचे पैसे असतील आणि आजूबाजूचे वेटर दणकट नसतील ह्याची खात्री करा.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 04/07/2012 - 13:39

Permalink

एवढं धीर गंभीर लिखाण ' विनोद

एवढं धीर गंभीर लिखाण ' विनोद आणि विडंबन' या सदरांखाली कसे येईल ते कळाले नाही,
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sat, 04/07/2012 - 14:46

Permalink

मुक्त विहारी तुमचा.......

मुक्त विहारी , तुम्ही या लेखाचा फीडबॅक किंवा फिस्टबॅक फॉर्म तयार केला असेल ना ? तो पाठवा.बघून घेतो.पुढच्या वेळेला आमच्या कंपनीच्या विमानाचे कसे येता ते ! आपला फौकट म्हाराजा
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 04/07/2012 - 16:20

Permalink

मस्त!

तुमच्याकडे पण गगनविहारींसारखे सगळ्या विषयांवर सल्ले आहेत की हो!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 04/07/2012 - 18:54

Permalink

मला हा ) ...ही ) ... अनुभव

मला हा ) ...ही ) ... अनुभव घ्यायचा आहे... ;-) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Sat, 04/07/2012 - 19:11

In reply to मला हा ) ...ही ) ... अनुभव by अत्रुप्त आत्मा

Permalink

मला हा ) ...ही ) ... अनुभव

मला हा ) ...ही ) ... अनुभव घ्यायचा आहे.. ;) आपण मुक्त विहारी आहात... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Sun, 04/08/2012 - 11:48

In reply to मला हा ) ...ही ) ... अनुभव by पक पक पक

Permalink

आत्म्यांना विमानात प्रवेश

आत्म्यांना विमानात प्रवेश नाही.त्यातला त्यात साध्या आत्म्यांना वशिलेबाजी करून प्रवेश मिळू शकतो, पण अतृप्त आत्मा....नाय नो नेवर...
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 04/08/2012 - 17:51

In reply to आत्म्यांना विमानात प्रवेश by किचेन

Permalink

@साध्या आत्म्यांना वशिलेबाजी

@साध्या आत्म्यांना वशिलेबाजी करून प्रवेश मिळू शकतो, पण अतृप्त आत्मा....नाय नो नेवर...>>> Image removed. एss...एss... किच्चुताइ वेडी...किच्चुताइ वेडी... पण मी कुणाचं झाड पकडुन गेलो तर....? Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Sun, 04/08/2012 - 17:57

In reply to आत्म्यांना विमानात प्रवेश by किचेन

Permalink

ओ किचेन तै ,आत्म्यांना

ओ किचेन तै ,आत्म्यांना सर्वत्र मुक्त संचार करता येतो म्हण्ल.... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 04/08/2012 - 00:59

Permalink

ई) या मुद्द्याशी भयानक

ई) या मुद्द्याशी भयानक सहमत. मेल्यांनी अगदी नको नको केलं यावेळी.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीयुत संतोष जोशी on Sun, 04/08/2012 - 09:47

Permalink

हाहाहा

हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sun, 04/08/2012 - 11:43

Permalink

झक्कास....

सूचना कडक.... प्रवास मस्त झाला(थँक्स टू ऑल मिपाकर्स, च्युंइंगम खात खात आलो, डोकेदुखी टळली.)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sun, 04/08/2012 - 14:21

Permalink

छान छान हो मु वि.

पण एक सुचना आड करायची राहिली का? हु) प्रवासापुर्वी गवींचे एअर क्रॅश (भाग १ ते ५) न वाचणे. आणि वाचले असल्यास न आठवणे. (ह.घे.)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com