आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला
देवाचिये दादुलेपनाचा उबारा|
न साहावेचि साताहि सागरा||
भेणें वोसरूनि राजभरा |
दिधली द्वारावती ||
(अर्थः- देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या तेजाने सातही सागर हैराण झाले व त्यांनी आपल्यातला काही भाग काढून कृष्णांस द्वारकानगरी दिली.) असे आद्य कवी नरिंद्र ह्यांना कृष्णाची स्तुती करताना म्हटलय.
बहुतेक आमचेही तेज आमच्या खड्डुस बॉस व सहकार्यांना सहन होत नसावे.मला उत्तर भारतात तडीपारीसाठी(डेप्युटेशनवर) पाठवायची म्हणूनच ह्यांनी व्यवस्था केली आहे.
मी नको नको म्हणत असतानाही बॉसनी शेवटी दिल्ली-चंदीगढचा प्रोजेक्ट(मोहिम) दिलाच. माझ्या अतुलनीय कौशल्यावर प्रसन्न होउन कंपनी मला थेट तिकडे पाठवते आहे. "दिल्ली अब दूर नही" अशी स्थिती खरोखर आली आहे.
ह्यापूर्वी पुण्याच्या पब्लिकपैकी उत्तर भारताच्या राजधानीच्या ठिकाणी आदरणीय श्री शिवाजीराव शाहाजीराव भोसले ह्यांचे व त्यानंतर दक्षिणेत कैक लढाया जिंकलेले सदाशिव(राव/भाउ) चिमाजी भट ह्यांचे जाणे झाले होते म्हणे.
पैकी पहिल्यास तिथले वातावरण अजिबात आवडले नाही, व त्या उर्मट लोकांना सुशासन काय असते हे दाखवण्यासाठी त्यांनी परत येउन इथे स्वतःचे स्वतंत्र राज्य उभारले.तर दुसरा असा काही गेला की परतलाच नाही.
ह्या सर्व प्रकारामुळे एकूणच मराठी मनांत स्वतःहून सतत दिल्लीला जाउन रहावे असे कधीच वाटले नाही.
ह्यापुढील सहाएक आठवडे माझे वास्तव्य दिल्लीला असेल्.त्यापुढील वीसेक आठवडे मी चंदीगडला असेन्.मला आता तुम्ही जालिय मित्र, हितचिंतक ह्यांची मदत लागणार आहे. फुकटात सल्ले हवे आहेत.
शंका :-
१.राहण्याची व्यवस्था कंपनीनं केलीए गुडगावला. आता गुडगावला राहायचं म्हणजे तिथलं एकूणच वातावरण्/संस्कृती कशी आहे, ह्याबद्दल सल्ला हवाय(बहुतेकांनी सल्ला दिलाय की तिथे उगी कुणाशी डोके लावत बसू नकोस म्हणून. कधीही घोडा/चाकू/कृपाण वगैरेचे दर्शन होउ शकते म्हणे.)
२.संपूर्ण NCR(दिल्ली+नवी दिल्ली+नोयडा+गुरगाव) मधली आवर्जून जावीत अशी खादाडीची ठिकाणं कुठली?
३.दिल्लीत पाहण्यासारखे काय आहे?
४.तिथली अनवट ठिकाणं कुठली?(जसं पुणे म्हटल्यावर शनिवारवाडा,शिंदे छत्री सारेच सांगतात, पण भुलेश्वर्,बनेश्वर ही ठिकाणंही आवर्जून जावीत अशी आहेत,पण कमी लोकांस ठाउक आहेत.)
५.पूर्वी अप्पूघर होते, अजूनही सुरु आहे काय? नसेल तर अजून कुठले adventure sports आहेत काय?(कोकणात/सह्याद्रीत बर्याच ठिकाणी बंजी जम्पिंग्,पॅराग्लायडिंग वगैरे सुरु आहे तसे काही)
६.सध्या कोण कोण इथले जालवासी तिथे आहेत? ह्यापूर्वी कुणाचं वास्तव्य होतं काय?
७.दिल्लीत राहिल्यावर दोनेक दिवसाची वीकांतास सुट्टी काढली तर आसपास जाण्यासारखं काय काय आहे? जसं पुण्यात दोन्-तीन दिवसांची सुट्टी काढली की जाण्यासारखं म्हणजे गोवा. तसच काहिसं.
८.देहरादून्/मसूरी,चार धामांपैकी काही धाम ह्यापैकी कुठेही दिल्लीहून जाणे सोपे आहे की चंदीगडहून?
९.अॅग्रो टुरिझम असे काही पंजाब्-हरयाणा-दिल्ली पट्ट्यात आहे का? कोणते ठिकाण आहे?
खास त्या भूभागात म्हणवली जाणारी सुपीक जमीन, भल्ल्या मोठ्ठ्या नद्या,भरपूर दहि-दूध -लोणी-तूप्,फळे-भाजीपाला ह्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठे जावे? म्हणजे एखाद्या ठिकाणी खास शेतात दोन्-चार दिवस रहायचे सोय आहे का?
१०.मोबाइलचे काय करु? सध्या माझ्याकडे एअरटेल पोस्टपेड आहे. तिथे नवीन कार्ड घ्यावे काय? कोणते घ्यावे? आहे त्या एअरटेलचे काय करावे? एखादी भारी स्किम ठाउक आहे का?
११.दोनेक दिवसात मी निघेन.पण २६एप्रिलला नागपूरला मित्राच्या लग्नासाठी जाय्चे आहे. त्यासाठी दिल्ली-नागपूर व नागपूर्-दिल्ली असे विमान तिकिट काढावे म्हणतोय.
कुठले तिकिट काढणे इष्ट होइल? जिथे तिकिट काढल्याने रोख डिस्काउंट किंवा इतर एखादे कूपन मिळते अशी एखादी वेबसाइट आहे काय ?(प्रीपेड मोबाइल आम्ही एका वेबसाइटद्वारे चार्ज केला तर चार्ज जितक्याचा केला, तितक्याचे आम्हाला मॅक डी चे कूपन्स मिळतात. तसे काही आहे का?)
१२. तिकडे चाललोच आहे तर एवढ्या दूर जाणे होतच आहे तर अजून काय काय करणे शक्य आहे? (तुम्ही अयदी द्या, सगळ्या गोष्टी नाही करता येणार ह्याची कल्पना आहे. पण दिलेल्या यादीपैकी सर्वात आवडलेल्या/सोयीस्कर गोष्टी तरी केल्या जातीलच. तेव्हा यादी लांबलचक होइल, ह्याची चिंता नको.
१३. मुळात जाणे टाळायचे असेल तर बॉसवर भानामती वगैरे करून त्याच्याकडून इथलीच असाइनमेंट घेण्यासाठी एखादा खात्रीशीर मांत्रिक वगैरे आहे काय? उपाय न झाल्यास तो पैसे परत देइल काय?
१४.खन्ना,बात्रा,लोधी.सोधी,पहवा,सिंघानिया,चोप्रा,कपूर्,बन्सल,कक्कड, तन्नेजा,रहेजा,चौहान,वासन ही नावे व दिल्ली-पंजाब्-हरयाणा ह्यांचे कल्चर (संस्कृतिक वातावरण) म्हणजे सध्या बॉलीवूड मध्ये दाखवले जाणवले धत्तड्-तत्तड,पोषाखी ,भरजरी कल्चरच ना?
--मनोबा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तु चुकूनही दिल्लीला जाऊ नये
मनोबा
सध्या माझी नणंद चंदीगढला
वेंजॉय!
इरसालांना व्यनी करा. ते
+१ इरसालांना व्यनी करा..
काय हे?
नाही ती संकटं अंगावर ओढवून
आँ?
तक्रार
चार ठिकाणं पहावीत असा उद्देश
गुरगाव
तिकडे पण गुंठामंत्री आहेत म्हणायचे.. :-)
हो हो. हेच म्हणायचे आहे. एकदा
काला आम ! पानिपत
या ठिकाणी एक आंब्याचे छोटे
आपले स्वागत..... सगळ्यात शेवटी मी देइन
भटकंती करणार असाल तर
सरळ विचारलं असतं तर सांगितलं
अभिनंदन मनोबा
शुभेच्छा!
इ बबो...............
हम्म
बस कां राव.....
अंग्गाशी
जेब्बात !! शुभेच्छा !! (
>>>पंजाबी पोरींच्या नादी लागू
कर्ज
अरे
लग्नाआधी सुद्धा त्या हे सर्व
नुसते सँडल?
बेकार वातावरण आहे. रात्री ८
पुणे ३०
+१
बाकी अजून काही किस्से
??
काय हे मास्तर. अगदी
वरच्या प्रतिसादातून
भाग्यवान आहात यक्कु.
गुडगावला सगळ्यात सावध रहायचे
केल्याने देशाटन......
थ्यांकू + शंका
झालं हाभार प्रदर्शन! उठायचं
ओय....
@एम जी :- नंबर कामाचा आहे.
आँ?
चलो दिल्ली..
मनोबा....
वा....
धन्यवाद राव....