भर दुपारी बारा वाजता शनिवारवाड्यापाशी अत्रुप्त आत्म्याची वाट बघत उभा होतो. ट्रॅफिक जाम मध्ये अडकल्याने तसे थोड्याश्या उशिरानेच आत्माजी हजर झाले. कसबा पेठेतील प्राचीन शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिराला भेट देण्याचा आजच्या भटकंतीचा उद्देश होता. साततोटी हौद चौकापासून अगदी जवळच हे मंदिर आहे. त्रिशुंड गणपती मंदिर हे इ.स १७५४ मध्ये नाथपंथी गोसावींनी बांधलेले आहे. मंदिराला कळस नाही. मंदिर पूर्वाभिमुख असून पुरूषभर उंचीच्या दगडी जोत्यावर उभारलेले आहे. राजस्थानी, माळवा आणि दाक्षिणात्य शैलींचा संमिश्र वापर येथे करण्यात आला आहे. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूंना विष्णूच्या जय-विजय या द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गणेशपट्टीच्या वर शिल्पसमृद्ध कमान कोरलेली असून सर्वात वरील बाजूस शेषशायी भगवान विष्णू कोरलेला आहे. मंदिराच्या दर्शनी भागावर यक्ष, किन्नर, गंधर्व, मोर, पोपट, भैरव, गजांतलक्ष्मी, मर्कटे अशी अनेक मांगल्यसूचक शिल्पे कोरलेली आहेत. १. त्रिशुंड गणपती मंदिराची दर्शनी बाजू
२ व ३. चौकटीच्या बाजूस कोरलेले द्वारपाल
४. चौकटीवरील कमान N ५. काही नक्षीदार शिल्पे
६. हत्तीशिल्प
७ व ८. भारवाहक यक्ष व गंधर्व प्रतिमा
इथले सर्वात वेगळे आणि एकमेवाद्वितीय असे म्हणता येईल असे जे शिल्प आहे ते एकशिंगी गेंड्याचे. काही शिपाई हे गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसत आहेत. हिंदुस्थानच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचे चित्रीकरण करणारे हे शिल्प असावे असा काही अभ्यासकांचा कयास आहे. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगाल आणि आसाम प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित केली लवकरच हिंदुस्थानात इंग्रज आपला पाय रोवतील जणू याची भविष्यवाणीच ह्या शिल्पाद्वारे व्यक्त केलेली आहे. हे शिल्प बहुतेक १७५७ नंतर कोरलेले असावे. ९. एकशिंगी गेंड्याचे एकमेवाद्वितीय असे शिल्प
१०. डाव्या बाजूस कोरलेला गेंडा
११. उजव्या बाजूस कोरलेला गेंडा
मंदिराच्या दर्शनी बाजूच्या डाव्या कोपर्यात रखुमाईचे शिल्प तर डाव्या बाजूच्या प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठ्लाचे शिल्प कोरलेले आहे. तसेच पुढे जाता एका चौकटीत नटराजाची अतिशय देखणी मूर्ती कोरलेली दिसते. १२ व १३. विठ्ठल रखुमाई
१४. नटराजाची अतिशय रेखीव मूर्ती
मंदिराच्या पाठीमागील बाजूस आगळ्या पद्धतीचे सहसा कुठेही न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. यात फक्त शाळुंका असून वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह आणि शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारीत आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू हंसाचे रूप घेऊन अंत शोधायला गेला तर ब्रह्माने वराहरूप घेऊन पाताळात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले. १५. अद्भूत शिवलिंग
१६. शिवलिंग अधिक जवळून
हे सर्व बघूनच मंदिराच्या आत प्रवेश केला. आतमध्येच एक तळघर असून ते फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडले जाते अशी माहिती मिळाली. तळघरात नेहमीच कंबरभर पाणी असते. गर्भगृहाच्याही दोन्ही बाजूंस द्वारपाल कोरलेले असून वर नक्षीदार कमान आहे. त्याच्यावर तीन शिलालेख कोरलेले आहेत. पैकी दोन संस्कृतात असून एक फारसी भाषेत कोरलेला आहे. पहिल्या शिलालेखात मंदिराच्या स्थापनेचा काल व रामेश्वराची प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून दुसर्या शिलालेखात गीतेतील नमनाचा श्लोक कोरलेला आहे तर फारसी शिलालेखात हे स्थान गुरुदेवदत्तांचे असलेले नमूद केले आहे. १७. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील कमानीवरील गजांतलक्ष्मी शिल्प
१८. कमानीवरील संस्कृत आणि फारसी शिलालेख
गाभार्यात गेलो. नावाप्रमाणेच गणेश मूर्तीला तीन सोंडा आहेत. कदाचित ही दत्तस्वरूपातील गणेशमूर्ती असावी म्हणूनही मंदिराच्या बांधणीत ब्रह्मा, विष्णू, शंकराच्या संदर्भातील शिल्पे येथे बरीच कोरलेली दिसतात. एकमुख, तीन सोंडा आणि सहा हात अशीरचना असलेली ही मयुरारूढ मूर्ती मूळची काळ्या पाषाणातील असून आता पूर्णपणे शेंदूरविलेपीत आहे. सत्व, तम आणि रजोगुणांनी युक्त असलेला ह्या गणेशाच्या मांडीवर शक्तीदेवता बसलेली आहे. हातात परशू, अंकुश आदी आयुधे आहेत. मूर्तीच्या पाठीमागच्या भिंतीवर अतिशय रेखीव अशी शेषशायी विष्णूची प्रतिमा कोरलेली असून त्यावरील कमानीवर देखणे गणेश यंत्र कोरलेले आहे. १९. त्रिशुंड गणपती
२०. त्रिशुंड गणपती
२१. गणेशमूर्तीच्या पाठीमागील बाजूस कोरलेला शेषशायी श्रीविष्णू
२२. त्यावर कोरलेले गणेशयंत्र
२३. मंदिरात इतरत्र असलेल्या काही शिल्पप्रतिमा
२४. मंदिरात इतरत्र असलेल्या काही शिल्पप्रतिमा
२५. मंदिरात इतरत्र असलेल्या काही शिल्पप्रतिमा
मंदिराला शिखर नसल्याने बर्याच काळपर्यंत हे तसे दुर्ल़क्षितच होते. शिखराच्या जागी स्वर्गमंडपासारखे सपाट वर्तुळाकार छत आहे. पण हल्ली मंदिराची चांगली निगा राखली जातेय. गणेशाचे दर्शन घेऊन मी आणि अत्रुप्त आत्मा बाहेर पडलो ते आता पुढच्या टप्प्यात पुण्यातली अशीच काही दुर्लक्षित पण शिल्पसमृद्ध मंदिरे बघण्याचे मनावर घेऊनच. पण आता आमची पावले वळली ती मात्र जुन्याबाजाराकडे.
हेरीटेज पुणे: त्रिशुंड गणपती मंदिर
वाचने
32672
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवर्णीय खरच हेरीटेज
व्वा! मंदीराची ओळख
जबराट रे वल्ली! मंदिराची छान
वल्ली,माहिती छान लिहिली
सुंदर शिल्पाकृतींचे सुरेख फोटो, आवडले!
कधी ऐकले नव्हते याबद्दल. नविन
नेहमीप्रमाणेच मस्त!
तळघरात जिवंत झरा आहे. दर
In reply to नेहमीप्रमाणेच मस्त! by पैसा
वल्ली'जी.. थॅन्क यु वेरी वेरी
In reply to तळघरात जिवंत झरा आहे. दर by प्रचेतस
हो तळघरात जिवंत झरा आहे.आणि
In reply to तळघरात जिवंत झरा आहे. दर by प्रचेतस
किचेन ला दितेलमध्ये पत्ता
In reply to हो तळघरात जिवंत झरा आहे.आणि by किचेन
मंदिराचा पत्ता: कसबा पेठेतून
In reply to किचेन ला दितेलमध्ये पत्ता by सुहास..
शरम गेली
In reply to मंदिराचा पत्ता: कसबा पेठेतून by प्रचेतस
मला मंदिर कुठे आहे ते माहित
In reply to शरम गेली by चौकटराजा
काय हो ताई?
In reply to हो तळघरात जिवंत झरा आहे.आणि by किचेन
सुंदर वर्णन..
मस्त रे, एकदम मस्त. कधीतरी
+११११
In reply to मस्त रे, एकदम मस्त. कधीतरी by ५० फक्त
मस्त फोटो
अप्रतिम फोटो.... मस्तच रे
मित्रांनो, लगेच कुच केल्या
फोटु अन माहीती छानच
हा लेख परत एकदा वेळ मिळताच
वा!!!
मस्तच...
-
वल्लीदा मन प्रफुल्लीत झाले रे....
एकदम झक्कास माहिती.....
वा! अप्रतिम देवळाची अप्रतिम
वल्ली साहेब , एक अप्रतिम लेख.
मस्त आजोबांच्या जुन्या आठवणी
In reply to वल्ली साहेब , एक अप्रतिम लेख. by निश
वपाडाव साहेब, नक्कीच माझि चुक झाली यात
In reply to मस्त आजोबांच्या जुन्या आठवणी by वपाडाव
लगे रहो वल्लीशेठ! अप्रतिम
सुंदर
+१
In reply to सुंदर by अमृत
+२
In reply to +१ by मी-सौरभ
सुरेख ...
सुंदर
छान
फारसी शिलालेखाचे संपूर्ण वाचन
In reply to छान by धनंजय
धन्यवाद
छ्या. काही उपयोग नाही माझा.
एक चुल्लू पानी ले... पानी
In reply to छ्या. काही उपयोग नाही माझा. by पिंगू
सध्या पाण्याचा दुष्काळ पडलाय
In reply to एक चुल्लू पानी ले... पानी by प्यारे१
तु कसब्यात कुठं राहतोस? याचं
In reply to सध्या पाण्याचा दुष्काळ पडलाय by पिंगू
_/\_ _/\_ _/\_
_/\_
खास वल्ली टच असलेले लेखन!
आवडले
पुण्यात असुनही कधी बघितलेले
तुला कश्या रे माहिती असतात
In reply to पुण्यात असुनही कधी बघितलेले by मृत्युन्जय
गेंडा
जबरदस्त नजर देता तुम्ही
३ सोंड असलेला गणपती
गेंडा..
वा..
हेरीटेज पुणे: भाग २..?
+१
In reply to हेरीटेज पुणे: भाग २..? by मोदक
तसेच एखादे सुंदर मंदीर मिळाले
In reply to +१ by अन्या दातार
@तसेच एखादे सुंदर मंदीर
In reply to तसेच एखादे सुंदर मंदीर मिळाले by प्रचेतस
मारुती मंदीरे तेवढी टाळा हो...
In reply to @तसेच एखादे सुंदर मंदीर by अत्रुप्त आत्मा
@अजून काही वर्षे तरी.. >>>
In reply to मारुती मंदीरे तेवढी टाळा हो... by मोदक
पुण्यातली फारशी माहिती नाही हो
त्रिशु॑ड गणपती
छान
धन्यवाद.
In reply to छान by सह्यमित्र
सुंदर
सुपर्ब
वर काढणार्याला धन्स... बाकी
शेषशायी विष्णू हे आवडते…