ग्रेससारख्या श्रेष्ठ कविच्या कवितेचा अर्थ आपण आपल्या सामान्य सीमित जीवनाच्या अनुभवांच्या चौकटीतच शोधायला निघतो..... तिथे अर्थ अपुरा राहू शकतो कारण कदाचित अशा कविच्या अनुभवाचे, कल्पनेचे आणि प्रतिभेचे क्षितिज नक्कीच आपल्यापेक्षा अधिक विस्तृत असतं.... !!!
भय इथले संपत नाही..मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो..तू मला शिकविली गीतेया जगात, तु गेल्यावर मी भयभीत झालो आहे, आई तु मला जीवन जगण्यास शिकवलेस पण तरी मला तुझी आता खुप आठवण येते आहे तु शिकवलेले सगळे मी व्यवहारात आणतो आहे पण भयामुळे दिवस संपल्यावर. संध्याकाळ ही एक परिस्थीती संपुन दूसरी सुरु होण्याची रुपक आहे, संध्याकाळ ही केवळ "भय इथले संपत नाही" म्हणत दुर्बल मनाची अवस्था नाही! ही वैचारिक स्थित्यंतराची कलाटणी आहे!
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवायाते झरे शितल चंद्रप्रमाणे आहेत, ती धरती एक रक्ताची माया देती आहे तरी तुझ्या विचारांच्या झाडात तुझ्या रुपासहीत मी निजतो पुन्हा तुझ्याच आठवणीत उगवण्यास चंद्र सजणांचे झरे .. वेगळेच वाटते आहे ना, नाहि. चंद्र हा जसा कलेकले ने बदलतो तसेच येथील प्रितीचे आहे. ती प्रिती शाश्वत नाहिये. म्हनुन प्रेमाचे झरे आटतात म्हणुन चंद्र सजनाचे व्यवहारी रुपक येथे योजले आहे. म्हणुन झाडांची उपमा घेवून, सुक्ष्म विचारांची बी होउन पुनःजन्म घेण्याचे कवी बोलतो आहे.
त्या वेळी नाजूक भोळ्या, वार्याला हसवून पळती क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरतीतुझ्या विचारात असताना त्या वेळा कधी निघुन जातात त्या कळत नाहीत तरी तुला पहाताना(शोधताना) दुरवर क्षितीजांची तोरणे माझ्या मनाच्या दारावर दस्तक देती . हे विश्वच माझे घर आहे. कारण तु नाहियेस.. पण माझ्या विश्वातील कणाकणात तु आहेस का हा विचार काही जात नाहि. आणि मग क्षितिजापलिकडे तुला नजर शोधते आहे.
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू राघव शेलातुझे ते बोल माझे पुर्ण आयुष्य स्पर्शून गेले माझ्या आयुश्याच्या वनवासात तेच माझे सोबती आहेत जसे सीतेच्या वनवासातील राघव . भले तु माझ्या सोबत प्रत्यक्ष नाही, पण जशी रामाची साथ सितेला वनवासात, तसेच तुझे बोल आहेत माझ्या साठी
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ, फुटला खांब थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंबदेऊळ आहे येथे पलीकडे, तरीही तुझ्या आठवणींचा फ़ुटका खांब माझ्यापाशी आहे आणि थरथरत्या डोळ्यात आता आठवणींशिवाय काहीच नाही. हा आसवे म्हणशिल तर मीच त्यात एक उरला सुरला थेंब आहे . देऊळ म्हणजे ईश्वर आहे तेथे, पण फुटलेल्या खांबातुन प्रकटणारा देव म्हणजे त्याचे अस्तित्व सर्वत्र आहे, अशी तुझी ओंजळ सर्वत्र आहे, मला अनुभवाचे दान तीच देते आहे. माझे अस्तित्व फक्त बुबळापासुन तुझा शोध घेणारा एक थेंब आहे फक्त .
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत रानेसंध्याकाळी मी, तू सांगितल्या प्रमाणे नटलेलो जगासंगे, सभोवताली आठवणींच्या क्षितीजासोबत निळाईत आकाशाची राने संध्ये समयी आता पांढर्या कमळाप्रमाणे आहे मी, कदाचीत अस्तित्व संपत आल्याची जाणीव येते आहे मनात म्हणुन हे आकाश मला कवेत घेण्यास येते आहे जणु
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचेस्त्रोत्रात माझी इंद्रिये अवघी का गुनगुनती ही दु:ख सारी अग चांदण्या सम शितल स्मरणे तुझी सरता संपत नाहीत
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राईतू सांगीतल्या प्रमाणे मी जगतो संध्याकाळी अन रात्री पण मेंदुतुन आता, निश्पर्ण वाळलेले विचार गळुन जात आहेत, एक स्थितप्रज्ञता येत आहे. कदाचीत हे धुके म्हणजे माझ्या समाधी ची वेळ जवळ आली आहे हेच तर सांगत नाहित . -- शब्दमेघ अवांतर : कवि ग्रेस, हे माझे अत्यंत आवडते कवी. मनातुन काही केल्या जात नाहीत. त्यांचे या कवितेचे रसग्रहण हे माझ्या कुवतीप्रमाणे आहे.. चु.भु.दे.घे. जाता जाता : त्यांना भेटण्यासाठी गेलो असता , त्यांच्या प्रेरणे पासुन लिहिलेल्या कवितेंवर त्यांची सहि घेतली होती. त्या कविता http://www.misalpav.com/node/17166 आई .. मिटलेला श्वास..
भय इथले संपत नाही
ग्रेसजींची ही कविता
बरोब्बर.. तुम्हांला तो शब्द,
धन्यवाद सर्वांचे ! शैलेंद्र,
--^--^--^--
गणेशा:कवितेचे चांगले रसग्रहण.
गणेशा तुच रे तुच. मला खात्री
मृत्युंजय साहेब, " ती गेली
गणेशा साहेब जसे तुम्ही आणि
ऑर्कुटावर त्यांना भेटून
महत्वाचे आहे. कवितेचा संपुर्ण
वाचनखुण साठवली आहे
रसग्रहण आणि चर्चा आवडली. मूळ
सर्वांचे मनापासुन आभार..
रसग्रहण आवडले व या कवितेचा