ही पाकृ मला आपल्या मिपावरची मैत्रीण स्मिता हिने सांगितलेली आहे :)
झटपट आणी एकदम चविष्ट अशी ही पाकृ आहे :)
भरीताला पाहून नेहमी नाक मुरडणारे मी आणी माझा नवरा आवडीने हे खाऊ लागलो :)
स्मिताचे मनापासून आभार :)
साहित्यः
मोठे भरीताचं वांगं
२-३ हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
२-३ लसूण (लसूण आणी हिरव्या मिरच्या कोरड्याच तव्यावर भाजून घ्यायच्या)
मुठभर कोथंबीर
मुठभर कांद्याची पात चिरून
१ टीस्पून ओवा
मीठ चवीनुसार
पाकृ:
प्रथम वांग्याला सुरीने चिरा पाडून , जरासा तेलाचा हात लावून गॅसवर खरपूस भाजून घ्यावे.
वांग्याची सालं काढून घ्यावी.
त्याचा गर व्यवस्थित मॅश करुन घ्यावा.
खल-बत्त्यात कोथींबीर, कांद्याची पात, लसूण व हिरव्या मिरच्या एकत्र ठेचून घ्यावे.
हा ठेचा वांग्याच्या गरात घालून एकजीव करावा.
कढईत जरा जास्त तेल तापवून ओव्याची फोडणी करावी.
भरीत त्यात घालून व्यवस्थित एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालावे व २ मिनीटे शिजवून गॅस बंद करावा.
टिपिकल जळगावकडचं भरीत -पुरी तयार आहे :)
नोटः
मुळ खानदेशी पाकृत दाण्याचा कुट किंवा अख्खे शेंगदाणे घालत नाही , आवडत असल्यास घालावे . तसे ही भरीत छान लागतं :)
वाचने
19201
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाकृ पाहून शब्द संपले !!
नाही ना जळगावचे आम्ही नाही
In reply to पाकृ पाहून शब्द संपले !! by यकु
होय रे!
In reply to पाकृ पाहून शब्द संपले !! by यकु
जाज्ज्वल्य खानदेशीचा प्रश्न
In reply to पाकृ पाहून शब्द संपले !! by यकु
सानिकातै थँक्यू.. सांगितलंय
In reply to जाज्ज्वल्य खानदेशीचा प्रश्न by स्मिता.
अरे व्वा!
अरारारा...!काय हे..? ही
नेहमीच्याच प्रतिक्रीया लिहील्या आहेत -
+१
In reply to नेहमीच्याच प्रतिक्रीया लिहील्या आहेत - by चिंतामणी
खानदेशी पध्दतीने भरीत बनवले आहे
In reply to नेहमीच्याच प्रतिक्रीया लिहील्या आहेत - by चिंतामणी
ज ब रा ट !
स्मिताने सांगितली असे म्हणले आहे.
In reply to ज ब रा ट ! by परिकथेतील राजकुमार
(No subject)
हे भरित वांगे न घालता कसे
In reply to (No subject) by बिपिन कार्यकर्ते
नाहीतर भोपळ्याचे भरीत शिकवा...
In reply to हे भरित वांगे न घालता कसे by कवितानागेश
माऊ यडपट आहे! आणि मोदक्या,
In reply to नाहीतर भोपळ्याचे भरीत शिकवा... by मोदक
(माऊ) काकू S S S.. मला वाचवा.. :-D
In reply to माऊ यडपट आहे! आणि मोदक्या, by बिपिन कार्यकर्ते
मस्तच दिसतय हे भरीत
भरीत खमंग होण्यासाठी एक टीप..
न गाळता घेतले तरी विशेष बिघडत
In reply to भरीत खमंग होण्यासाठी एक टीप.. by मोदक
वाह
जबरदस्त.... मला प्रचंड आवडतं
व्वा!
सर्व काही
अगदी अगदी.
In reply to सर्व काही by jaypal
राणीच्या देशात ज्वारी/बाजरीचे पीठ
In reply to अगदी अगदी. by चिंतामणी
राणीच्या देशात ज्वारी/बाजरीचे पीठ
In reply to अगदी अगदी. by चिंतामणी
खूप आवडले..
मी हे पाकृत नमुद केले आहे ताई
In reply to खूप आवडले.. by निवेदिता-ताई
ओवा घालून भरीत प्रथमच पहाते
लई भारी!
खानदेशातून पांढरी ठिपके
एक नंबर.. पण जांभळ्या
भरीतासोबत बाजरीची कडक भाकरी
ही पाक्रु करताना हिरवीगार
हिरवीगार कुडची वांगी
In reply to ही पाक्रु करताना हिरवीगार by सस्नेह
खपतोय... आज माझा उपास
उत्तम, आमच्याकडचे खानदानी
क्या बात है.......नक्की करुन
करून पाहिले...
पेठकर शेठच्या हातचे भरीत
भरीतभेट...
In reply to पेठकर शेठच्या हातचे भरीत by सर्वसाक्षी
खूप छान !!!
तोंडाला पाणी सुटले हो ...