Skip to main content

फ्राईड भेंडी

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 21/03/2012 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : बोटाइतक्या लहान व कोवळ्या भेंड्या पाव किलो शेंदेलोण व पादेलोण प्रत्येकी १/२ चमचा लाल मिरचीपूड १/२ चमचा दालचीन पूड पाव चमचा तळणासाठी तेल अर्धी वाटी भेंडी धुऊन देठे व शेंडे कापावे. कढईमध्ये तेल तापवून पूर्ण आचेवर अखंड भेंड्या थोड्या थोड्या तळून घ्याव्या. निवल्यावर एका ताटामध्ये पसरून प्रथम शेंदेलोण, पादेलोण व नंतर दालचीन पूड व लाल मिरचीपूड वरून भुरभुरावी. स्नॅक्स म्हणून खाण्यास चांगली.

वाचने 9095
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

छान झाला आहे हा आयटम :) पण चिरुन तळ्ल्या तर कुरकुरीत होतिल अस वाट्तय ,अन मसाला देखील व्यवस्थित लागेल...

In reply to by सुहास..

नेमकी भेंडी खात असतानाच हा धागा आला. भेंडी म्हणजे आपला जीव की प्राण. बाकी धागा वाचून सुहासने दिलेल्या पाकृचीच आठवण झाली पहिल्यांदा.

भेंडीचे सगळे प्रकार मला आवडतात म्हणून हाही आवडेल. अवांतर: भरल्या भेंडीची भाजी पोळीबरोबर कशी खायची हे अजूनही मला न उलगडलेलं कोडं आहे.

In reply to by रेवती

भरल्या भेंडीची भाजी पोळीबरोबर कशी खायची हे अजूनही मला न उलगडलेलं कोडं आहे.
अशा वेळी पोळी भरल्या भेंडीच्या भाजीबरोबर खायची.

अर्धी भेंडी १०० किलो काजूत मिसळून जो पदार्थ होईल त्याला काजूभेंडी म्हणतात. हा भेडीचा प्रकार फारच छान लागतो. १०० किलो काजू घेतल्यास गोव्यात अर्धी भेंडी फ्री मिळते. त्यामुळे भेंडीचा खर्च येत नाही.