शंभर वर्षातून एखाद्याच वेळेला साजरे करण्यासारखे काही क्षण असतात, त्यापैकी एक म्हणजे सचिनची सेंचुरीची सेंचुरी. त्यासाठी काहीतरी भन्नाट पेय नको का? पण आपले लाडके कॉकटेलाचार्य सोत्रि सध्या दारूचा बारच्यामागची आपली जागा सोडून वेगळेच बार उडवण्याच्या मोहिमेवर आहेत. तेव्हा म्हटलं आपण चान्स मारून घ्यावा. म्हणून 'सेंचुरी धमाका' हे नवीन कॉकटेल सादर करत आहोत. हे कॉकटेल काहींना भन्नाट आवडतं आणि ते भरभरून प्रतिसाद देतात. आणखीन इतरांना ते कॉकटेल वाईट वाटलं नसलं तरी आधीच्यांचे प्रतिसाद आवडत नाहीत, मग ते त्यांना तसं सांगतात. त्यांची एकमेकांत चर्चा रंगते आणि प्रतिसादांची सेंचुरी हा हा म्हणता गाठली जाते. म्हणून हे नाव.
या कॉकटेलचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे एक स्फोटक विषय. स्त्री-पुरुष, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, निवासी-अनिवासी, पुणेकर-इतर, एक संस्थळ - दुसरं संस्थळ असे जनमत दुभागणारे विषय हवेत. ते विषय आधीच खूप वेळा वापरून घेतले गेले आहेत याची चिंता करू नये. दारूप्रमाणेच या विषयांची नशाही दरवेळी नवीन चढते. व्होडका बऱ्याच वेळा प्यायली आहे म्हणून आपण ती पुन्हा प्यायची नाही असं करतो का? खरं तर म्हणूनच तिची वेगवेगळी कॉकटेलं करून प्यायली की जरा तेवढाच बदल होतो.
दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आत्यंतिक साळसूदपणा. स्क्रूड्रायव्हरमध्ये घातलेल्या ऑरेंज ज्यूसप्रमाणे त्यामुळे अल्कोहोलची जळजळीत चव सुसह्य होते. त्यासाठी काहीही विधानं करण्याऐवजी प्रश्न विचारणं सोयीस्कर ठरतं. त्या प्रश्नाचे शब्द योग्य प्रमाणात आले पाहिजेत. खरडवह्यांतून किंवा व्यनिंतून - 'साला, पेटणार आहे बघ वडवानल!' असं स्वतःला गुदगुल्या होत असलेल्या स्वरात जरूर लिहा. पण लेखात मात्र गंभीरतेचा आव आला पाहिजे. तुम्हाला काही क्षण उच्चभ्रूच समजलं जाण्याचाही किंचित धोका पत्करावा लागेल इतपत गंभीर. म्हणजे उदाहरणार्थ 'हे हरामखोर अनिवासी इतके का माजलेले आहेत?' असा सरळ प्रश्न विचारला तर कॉकटेलची मजा जाते. त्याऐवजी 'अनिवासी भारत सोडून गेल्यामुळे त्यांची महाराष्ट्राशी असलेली सांस्कृतिक नाळ तुटते का?' असा उच्चभ्रू शब्दांत, स्वतःला खरोखरच त्या माहितीत रस असल्याप्रमाणे प्रश्न विचारावा. मग कोणीतरी लिहितंच 'हे साले अनिवासी, सिटिझन होतात आणि आपल्याच माजी देशवासीयांवर गोळ्या घालू म्हणून खणखणीत आवाजात शपथ घेतात.' जर कोणी लिहायला तयार नसेल तर आपल्याच मित्राला असली भडकाऊ कॉमेंट टाकायला सांगायची. मग कोणी तरी पिडांसारखा मातब्बर नागरिकत्व आणि जीवनपद्धती यांमधला फरक सांगायला गदा फिरवत धावून येतो. स्वतःला काहीच टोकाची विधानं करावी न लागता शांतपणे धाग्यावरचे प्रतिसादांचे चौकार, षटकार वाढताना बघायचे. अगदी शून्य ची पानं फाडून टाकलेल्या पुस्तकाने खेळलेल्या बुक क्रिकेटसारखे.
सामान्य कॉकटेलला ज्याप्रमाणे थंडावा देण्यासाठी बर्फाची जरूर असते, तशीच या कॉकटेललाही काहीतरी सुसंबद्ध भासणाऱ्या लिखाणाची गरज असते. उदाहरण देऊन सांगतो. मार्गारिटामध्ये आइस्ड आणि फ्रोझन असे दोन प्रकार असतात. एकात बर्फाचे मोठे तुकडे असतात, दुसऱ्यात ते कॉकटेल ब्लेंडरमधून बर्फासकट काढल्यामुळे अगदी पेयाशी एकजीव झालेला बर्फाचा भुगा असतो. (नक्की कुठचं आइस्ड आणि कुठचं फ्रोझन हे माहीत नसलं तरी फरक पडत नाही). तसंच तुम्हाला दोन पद्धतीने ते लेखन करता येतं. एक म्हणजे साळसूद प्रश्न - यात विषयाची मांडणी आणि तदनुषंगिक प्रश्न येतात. दुसरी पद्धत म्हणजे एखादी ढोबळ रूपककथा लिहिणं. राजा-प्रधान, अमात्य-विदूषक, एक राज्य आणि दुसरं राज्य वगैरे घिसीपिटी रूपकं वापरली की झालं. मग तुमच्या साळसूदपणाच्या ऑरेंज ज्यूसची चवही जिभेला थंडगार लागते. वाचकांनी ही रूपकं चुकीची इंटरप्रिट केल्यामुळे प्रतिसादांत आणखीनच कल्ला होतो हा बोनस!
सर्वात शेवटी गार्निशसाठी एक डिस्क्लेमर भुरभुरवावा. म्हणजे पेयातली सगळी कडवट चव निघून जाते.
हा लेख निव्वळ कॉकटेलचंच वर्णन म्हणून घेणे, व त्यात इतर अर्थ शोधू नयेत, व शोधलेच आणि समजा काही विचित्र साम्यं सद्यपरिस्थितीशी किंवा व्यक्तीशी सापडलीच तर तो कर्मधर्मसंयोग समजावा, आणि तेवढे कष्ट घ्यायचे नसतील तर सगळ्यांनीच हलक्याने घेणे. आणि अर्थातच मी हे सांगण्याचं काम केलेलं आहे कारण माझं मन स्वच्छ आहे, मला कोणाच्या कुरापती काढायच्या नाहीत हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे.
वाचने
10120
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
सचिनच्या सेन्च्युरीनिमित्ताने
बाकी घासकडवींना इथे पुन्हा
In reply to सचिनच्या सेन्च्युरीनिमित्ताने by प्रास
_/!\_
वॉव!
विहीर समुद्र वडवानल आणि
निषेध निषेध निषेध...
In reply to विहीर समुद्र वडवानल आणि by विजुभाऊ
फोटो?
सहमत
In reply to फोटो? by पैसा
पुरे आता..
ऐसीचा दुवा फाफॉमध्ये बुकमार्क
प्याक्क जमला नाय ...
डान्राव
In reply to प्याक्क जमला नाय ... by छोटा डॉन
प्याक्क भरा श्रामो ...
In reply to डान्राव by श्रावण मोडक
कल्चरल डिफरन्स
In reply to प्याक्क भरा श्रामो ... by छोटा डॉन
काय हे?
In reply to कल्चरल डिफरन्स by श्रावण मोडक
चोता दोन राव, चला दोन दोन
In reply to प्याक्क भरा श्रामो ... by छोटा डॉन
धन्य झालो मी.
In reply to प्याक्क भरा श्रामो ... by छोटा डॉन
डान्राव, .../\...
In reply to प्याक्क जमला नाय ... by छोटा डॉन
अस्सं आहे होय...
In reply to डान्राव, .../\... by वपाडाव
म्हणजे काय ?
In reply to अस्सं आहे होय... by धन्या
उदाहरण पटले.
In reply to म्हणजे काय ? by छोटा डॉन
@भटजीबुवांच्या मंगलाची
In reply to अस्सं आहे होय... by धन्या
म्या बी
In reply to डान्राव, .../\... by वपाडाव
अतिशय भिकारचोट लेख.. असे लेख
बरे झाले तुम्ही सांगितलेत.
In reply to अतिशय भिकारचोट लेख.. असे लेख by धोणी
तर परवा काय झाल, मी अन माझा
स्त्री-पुरुष समानता का काय
In reply to तर परवा काय झाल, मी अन माझा by स्पंदना
ते कस काय बुवा? मी समजले
In reply to स्त्री-पुरुष समानता का काय by बॅटमॅन
अपर्णातै...
In reply to ते कस काय बुवा? मी समजले by स्पंदना
जगदंब... जगदंब... जगदंब...
In reply to अपर्णातै... by धन्या
अरे मित्रा...
In reply to जगदंब... जगदंब... जगदंब... by वपाडाव
अर्थ होय! अर्थ हाच, मी, माझ,
In reply to अपर्णातै... by धन्या
प्रतिसाद आवडले पण...
In reply to अर्थ होय! अर्थ हाच, मी, माझ, by स्पंदना
चुक!
In reply to प्रतिसाद आवडले पण... by राजेश घासकडवी
मग हाच विषय का? ताई तुमचा
In reply to चुक! by स्पंदना
अहो, त्या प्रवृ्त्तीचीच
In reply to मग हाच विषय का? ताई तुमचा by राजेश घासकडवी
अन माझ्या एक्सप्लनेशन्च काय?
In reply to अहो, त्या प्रवृ्त्तीचीच by धन्या
क्षमस्व.
In reply to अन माझ्या एक्सप्लनेशन्च काय? by स्पंदना
पटलं.
In reply to अर्थ होय! अर्थ हाच, मी, माझ, by स्पंदना
मी जाणुन बुजुन ओढुन कशाला घेइन?
In reply to पटलं. by धन्या
एक प्रेमळ भेट
दिलदार !! दमदार !! खेळकर !!!
'..' भौ
In reply to दिलदार !! दमदार !! खेळकर !!! by सुहास..
फा....रच्च शार्प-नर म्हणायचं
In reply to दिलदार !! दमदार !! खेळकर !!! by सुहास..
कोटी लै आवडली शार्प-नर ची
In reply to फा....रच्च शार्प-नर म्हणायचं by प्यारे१
@-अतृप्त आत्म्याने झपाटलेला
In reply to फा....रच्च शार्प-नर म्हणायचं by प्यारे१
हम्म्म
तुमच्या मताबद्दल आदर आहे.
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
माका वाटता, सोत्रि साहेब तुमचो हे वांदो करतत
लेख उत्तम. खूप हसू आले.. पण
कॉक