Skip to main content

हुंगायचे इन्सुलिन

लेखक संजय अभ्यंकर यांनी सोमवार, 28/07/2008 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
डांबिसराव व मि.पा. वरिल मान्यवर वैद्य मंडळींस काहि प्रश्नः १. काही काळापुर्वी फयझरने हुंगायचे इन्सुलिन अमेरिकी बाजारात आणले होते. ते कितपत यशस्वी झाले? २. त्याचे काही अन्य परिणाम रुग्णांवर आढळले का? ३. हे औषध खर्चाच्या दृष्टिकोनातुन भारतीयांच्या ख्शाला परवडेल का? ४. आर्थर हेलीने त्याच्या स्ट्राँग मेडीसिन ह्या कादंबरीत भाकितपर लिहिले होते कि भविष्यकाळ हुंगायच्या औषधांचा असेल. हे भाकित कितपत खरे ठरले आहे?

वाचने 3111
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

हुंगायच्या इन्शुलीनबद्दल मी प्रथमच ऐकतो आहे, तज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा...

रोज इन्सुलीन टोचून घेणार्‍या मधुमेहींना हे हुंगायचे इन्सुलिन वरदान ठरेल असे प्रथमदर्शनी तरी वाटते.... आणि एकूणच या अनुषंगाने हुंगायच्या औषधांबद्दल वाचायला आवडेल... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरील एन्सुलीन चे प्रथमिक क्लिनीकाल चाचणी रेपोर्त्स विफ्हल आहेत.