ज्योतिष- पलभरके लिए कोई हमे प्यार कर दे झूटाही सही!
ज्योतिषाची उपयुक्तता तपासा या म.टा.मधील राजीव उपाध्येंच्या लेखावर खर तर प्रतिक्रिया मला द्यायची नव्हती. तेच तेच मुद्दे किती काळ देत राहणार. पण म्हटल त्या निमित्त पुर्वप्रकाशित लेखनाचा काही भाग वाचकांच्या समोर आणावा.ज्योतिषावरचे वाद- प्रतिवाद हे गेली दीडशे वर्ष त्याच त्याच प्रकारचे आहेत.असो लेखातील काही मुद्यांचा परामर्श घेउ.
"हे धैर्य वैफल्यग्रस्त व्यक्तिने नक्की कुठून गोळा करायला हवे होते? अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठेल्यावरुन की नारळीकरांच्या आयुकातुन? आत्म हत्या हा चुकीचा पर्याय आहे नि:संशय पण एखाद्या व्यक्तीच्या सपोर्ट सिस्टीम्स संपल्या तर त्याने येणारे वैफल्य हाताळायला कुणाकडे जायचे?"
नैराश्यापोटी आलेल्या लोकांना मन व मनाचे आजार याविषयी योग्य माहीती दिली गेली पाहिजे. चिंता, नैराश्य हे मनाचे आजार आहेत. मानसोपचार तज्ञांचा सल्ला व मानसोपचारावरील योग्य औषधांनी ते बरे होतात. शिवाय कौन्सिलिंग सेन्टर्स हे पण तुमच्या समस्या समजावून घेवून त्यावर कायदेशीर व व्यावहारिक उपाययोजना सुचवतात. सर्वांचे सर्व प्रश्न सुटतीलच असं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अवलंंब केला तर तर्कबुद्धी, विवेक व आत्मनिरीक्षण यांच्या सहायाने आपले काही प्रश्न सुटू शकतात. अनिश्चितता ही सर्वांसाठी आहे. ती पचवायला शिकलं पाहिजे. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या पेक्षा जी गोष्ट आपल्या हातात आहे तिचा विचार केला पाहिजे. प्रयत्न ही आपल्या हातातली बाब आहे.ती करत राहणे असे म्हणणे काय आणी कर्म करत राहा असे म्हणणे काय एकच.
"ज्योतिष शास्त्र आहे की नाही यावर वाद घालून धूळ उडवत बसण्यापेक्षा ज्योतिष उपयुक्त आहे की नाही हा मुद्दा महत्वाचा आहे. उपयुक्तता सिद्ध होण्यास शास्त्रीयत्वाच्या कसोटीची गरज नाही. फक्त अनुभव पुरेसा आहे."
त्याची उपयुक्तता कोणास व कशी यावर ते अवलंबून आहे. दारुच्या आहारी गेलेल्या माणसाला दारु ही त्याच्यासाठी उपयुक्तच नव्हे तर उपकारकही वाटत असते!
प्रथम, ते उपयुक्त का नाही, इतकेच नव्हे तर ते उपद्रवकारक का आहे ते पाहू. एक सश्रद्ध गृहस्थ ज्योतिषाकडे कधीही जात नसत. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले, ''हात दाखवून अवलक्षण का करून घ्यायचे?`` याचा अर्थ असा की भविष्यात घडणार असलेल्या प्रतिकूल घटना आधी कळून घेउन उगीच मन:स्ताप कशाला करून घ्यायचा ? जे होणार आहे ते अटळ आहे हे जर खरे असेल तर ते आधी कळण्याने काय फायदा ? नसत्या विवंचनेला आपण होउन का आमंत्रण द्यायचे ?
यावर ज्योतिषीलोक जो युक्तिवाद नेहमी करतात तो असा. चक्रीवादळ टाळता येत नाही म्हणून वेधशाळेने ते वर्तवूच नये का? पुढे येणार असलेल्या प्रतिकूल परिस्थितीची आधी कल्पना आली तर माणूस त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीची तीव्रता कमी व्हावी यासाठी व्यवहारी किंवा दैवी उपाय योजू शकतो. उन्हाळा आहे कडकडीत उन थोपवणे काही आपल्या हातात नाही पण चपला घालणं, टोपी घालणं, छत्री घेणं हे तर आपल्या हातात आहे ना! त्यामुळे उन्हाचे चटके तर बसत नाहीत ना या युक्तिवादात हे गृहीत धरण्यात आले आहे की ज्योतिष्यांना आगामी घटनांची कल्पना आधी निश्चितपणे येउ शकते. आणखीही एक गोष्ट नकळत गृहीत धरली आहे ती म्हणजे जे होणार आहे ते पूर्णपणे अटळ नाही. त्यात माणसाच्या प्रयत्नाने थोडाफार फेरबदल होउ शकतो. ही दोन्ही गृहीतकृत्ये वादग्रस्त आहेत. चक्री वादळाचे उदाहरण इथे गैरलागू आहे. वेधशाळेने चक्रीवादळ वर्तवल्यामुळे ते टाळता आले नाही तरी त्याची सत्यता तपासता येते. उपग्रहाद्वारे त्याचे चित्रण बघता येते. चक्रीवादळांचे अंदाज
तपासता येतात कारण त्यांचा संख्यात्मक अभ्यास उपलब्ध असतो. परंतु ज्योतिषांच्या भाकितांबाबत असा अभ्यास केला जात नाही. फलज्योतिषाचे अनिष्ट भाकित योगायोगाने खरे ठरले तर 'बघा! सांगितले होते. पण ऐकले नाही.` असे म्हणता येते. खोटे ठरले तर 'योग्य ते उपाय, तोडगे केले म्हणून अरिष्ट टळले` असेही म्हणण्याची सोय आहे.
प्रतिकूल परिस्थितीने हैराण झालेला माणूस ज्योतिष्यांचा सल्ला घेण्यासाठी पैसे खर्च करीत असतो. चांगल्या गोष्टी घडणार असल्याचे भाकीत सांगून ज्योतिषी त्याला दिलासा व आधार देउ शकतो, किंवा आताचे वाईट दिवस लवकरच संपणार आहेत अशी मनाला उभारी देउ शकतो हे जरी खरे असले तरी त्यासाठी त्या बिचार्याचा आधीच हलका झालेला खिसा आणखी हलका होत असतो. भरल्या गाडीला सुपाचे काय ओझे? या विचाराने दैवी उपाय करण्यासाठी प्रसंगी माणूस कर्जसुद्धा काढतो.
फलज्योतिष हे जर खरोखरीच विश्वसनीय शास्त्र असते तर हा खर्च कारणी लागला असे म्हणता आले असते. पण तशी वस्तुस्थिती नाही, आणि हेच तर आम्हाला सांगायचे आहे.
आता उपयुक्ततेबद्दल विचार करू. कुंडलीवरून माणसाचा नैसर्गिक कल कोणत्या गोष्टीकडे आहे ते कळते असे ज्योतिषी म्हणतात. तसे खरोखरीच कळत असेल तर ती फार चांगली गोष्ट आहे. पाश्चात्य देशात या अंगाने खूप संशोधन झालेले आहे. त्याचे निष्कर्ष फलज्योतिषाला बहुतांशी प्रतिकूल असेच निघालेले आहेत. म्हणजे त्याची उपयुक्ततासुद्धा वादातीतपणे सिद्ध झालेली नाही.
आता ते मनोरंजन म्हणून उपयुक्त आहे असा दावा कुणी केला तर मात्र त्याची उपुक्तता आम्ही मान्य करु. कारण जगात शास्त्रज्ञांची चलती झाली म्हणून कवी लगेच ओस पडले असे दिसून येत नाही. उपयुक्ततेच्या मुद्याचे यश हे ज्योतिषाच्या सामर्थ्यात नसून जातकाच्या मानसिकतेमध्येच आहे.
"माझे आयुष्य एखाद्या सूत्रात बांधले गेले आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास प्रत्येक व्यक्ति पुर्णपणे स्वतंत्र आहे एखादे सूत्रही त्यातील विशिष्ट घटकांच्या परस्पर संबंधाची प्रतिकृती असते. जन्म आणि मृत्युच्या या अंतिम अवस्थांनी बद्ध असलेल्या मनुष्याची पत्रिका ही म्हणूनच त्याच्या जीवनात येउ शकणार्या वेगवेगळ्या अवस्थांची एक प्रतिकृती मानली तर त्यात वावगे काय?"
प्रतिकृतीच आहे ती.सोप्या भाषेत आराखडा म्हणु. जन्म ते मृत्यु या दरम्यान होणार्या माणसाच्या वैयक्तिक आयुष्यतील घटनांचा संबंध या प्रतिकृतीच्या अन्वयार्थाशी जोडून मग त्याचा परामर्श घेणे हेच तर फलादेश म्हणुन गणले गेले आहे.फलज्योतिषातील शास्त्रत्व तपासण्यासाठी एम्पीरिकल संशोधन करुन या वादाचा निर्णय लावता येईल अशी आशा पुष्कळ बुद्धीवादी लोकांना वाटते. परंतु हे शास्त्र अशा संशोधनासाठी निरुपयोगी आहे असे आम्हास वाटते. याची कारणे :-
१) या शास्त्रातल्या फलित दर्शवणाऱ्या पॅरामीटर्सची संख्या अगणित बनत जाते. शिवाय पूर्वसंचितासारखे अज्ञेय पॅरामीटर्स त्यात आहेत.
२) ग्रहस्थितीची आयडेंटीकल पुनरावृत्ती कधीच होत नसते. त्यामुळे पुन:प्रत्यय घेणे शक्य नसते. म्हणजे हे संशोधन प्रत्यक्षात आणणे शक्य नाही.
३) सौख्य व स्वभाव विश्लेषण या गुळमुळीत अथवा सापेक्ष बाबींमध्ये एम्पीरिकल संशोधन कसे आणणार? त्यासाठी निसंदिग्ध बाबी घेतल्या पाहिजेत उदा. मृत्यू, मोठे आजारपण, मोठा अपघात, शारिरिक व्यंग, इ.
४) पुरेसा डाटा मिळणं व्यक्तिगत पातळीवर शक्य होत नाही. वि.म दांडेकरांनी संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढण्याइतपत डाटा मिळाला नाही असे सांगितले होते. परदेशात पुन:पुन: एम्पीरिकल संशोधने केली गेली. पण त्यातून फारसे काही हाती आले नाही. फलज्योतिषाच्या समर्थन करणाऱ्यांविरुद्ध ते निष्कर्ष गेले की ते संशोधनात त्रुटी काढतात. गोकॅलीनच्या संशोधनाचा प्रचलित फलज्योतिष, शास्त्र म्हणून सिद्ध होण्यास काहीही उपयोग झाला नाही.
"आधुनिक ज्योतिषी हे ग्रहांचे परिणाम अजिबात मानीत नाहीत. ते ग्रहांच्या भ्रमणाचे किंवा आकाशात तयार होणार्या विशिष्ट भौमितिक रचनांची मानवी जीवनातील अवस्थांशी सांगड घालायचा प्रयत्न करतात."
थोडक्यात ग्रह हे कारक नसून सूचक आहेत असे हे म्हणणे आहे. आज संकष्टीला चंद्रोदय रात्री अमक्या वाजता आहे म्हणजे घड्याळात अमके वाजणे हे चंद्रोदय होण्याचे सूचक संकेत असतात कि ज्यावर उपास सोडायचा असतो. तसे ही आधुनिक ज्योतिषी भाकिताशी संबंध न लावता प्रवृत्ती कलाशी संबंध जोडतात. जातकाला ग्रह कारक आहेत की सूचक याच्याशी काहीही घेण देण नसत. त्याला भविष्यात घडणार्या घटनांचा आढावा घ्यायचा असतो.वर्तमानात त्याची उत्तरे मिळाली तर तो काही नियोजन वा व्यवस्थापन करु शकतो. असे सांगड घालण्याचे प्रयत्न होतच असतात.त्याचे रिझल्टस हे संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा
अधिक नाहीत हे आजमितीस तरी सत्य आहे
( आधारित ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद )
लेख आवडला. भाषा थोडी क्लिष्ट
In reply to लेख आवडला. भाषा थोडी क्लिष्ट by मनिष
एचटीएमल
चक्री वादळाचे उदाहरण इथे
मुळात ज्योतिष हे ठोक ताळा किंवा अंदाज पध्दति आहे.
-
आपले हे पुस्तक
In reply to आपले हे पुस्तक by चौकटराजा
पृथ्वी
In reply to पृथ्वी by प्रकाश घाटपांडे
ते ठीक आहे.
In reply to पृथ्वी by प्रकाश घाटपांडे
म्हणजे पृथ्चीची प्रवृती ठरवावी लागेल
उत्तम!
In reply to उत्तम! by नगरीनिरंजन
थकाल...
In reply to थकाल... by मन१
+१११११
In reply to थकाल... by मन१
थकलो
In reply to थकलो by प्रकाश घाटपांडे
खरच थकलो. हात टेकले! वरील
In reply to खरच थकलो. हात टेकले! वरील by युयुत्सु
होऊन जाऊ द्या ना बिलेटेड
In reply to होऊन जाऊ द्या ना बिलेटेड by यकु
@घाटपांडे काकांना काहीतरी
In reply to खरच थकलो. हात टेकले! वरील by युयुत्सु
तसंही त्यावरून काहिही सिद्ध
In reply to खरच थकलो. हात टेकले! वरील by युयुत्सु
बिनपात्याची तलवार म्यान
In reply to थकाल... by मन१
हे हे हे
लेख आणि लेखाचे शिर्षक दोन्ही
मस्त लेख!
मी गेल्या वर्षी एका
In reply to मी गेल्या वर्षी एका by JAGOMOHANPYARE
हो, हो आणि मग तुम्हाला तो औषध
In reply to हो, हो आणि मग तुम्हाला तो औषध by यकु
होय. आता पाय बरा आहे.
In reply to होय. आता पाय बरा आहे. by JAGOMOHANPYARE
अॅक्सिडेंट मध्ये लोक मृत्युमुखी पडतात
In reply to मी गेल्या वर्षी एका by JAGOMOHANPYARE
अरे रे !
In reply to अरे रे ! by परिकथेतील राजकुमार
हा हा..
लपे करमाची रेखा माझ्या
In reply to लपे करमाची रेखा माझ्या by JAGOMOHANPYARE
वा!
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
घाटपांडे परत मैदानात उतरले की
In reply to घाटपांडे परत मैदानात उतरले की by युयुत्सु
घाटपांडे परत मैदानात उतरले की
In reply to घाटपांडे परत मैदानात उतरले की by युयुत्सु
धागा ....
In reply to घाटपांडे परत मैदानात उतरले की by युयुत्सु
छॅ छॅ
In reply to छॅ छॅ by प्रकाश घाटपांडे
चला तुम्ही मैदानात उतरलात असं
In reply to वा! by प्रकाश घाटपांडे
ग्रेटेस्ट कविता ओफ ऑल टाईम
सांजसंध्या इक्डे लक्ष द्या !
In reply to सांजसंध्या इक्डे लक्ष द्या ! by चौकटराजा
जरा विषयांतर
खणखणीत...
मी कालपर्यंत भविष्य आणि
In reply to मी कालपर्यंत भविष्य आणि by यकु
हितचिंतक भविष्य
In reply to हितचिंतक भविष्य by प्रकाश घाटपांडे
हे फलज्योतिषाच्या आधारे
In reply to हे फलज्योतिषाच्या आधारे by यकु
@आणखी एक - 'हितचिंतक भविष्य'
In reply to मी कालपर्यंत भविष्य आणि by यकु
कुतूहल
In reply to मी कालपर्यंत भविष्य आणि by यकु
मलादेखिल उत्सुकता आहे.
In reply to मलादेखिल उत्सुकता आहे. by कवितानागेश
हे भविष्यकथन आहे काय? म्हणजे
In reply to हे भविष्यकथन आहे काय? म्हणजे by यकु
@#$%^^&*($%
In reply to @#$%^^&*($% by कवितानागेश
हीहीहीमाऊ, माझी नाय् बाबा