Skip to main content

खरबुजाचा आस्वाद

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 14/03/2012 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
संकष्टी म्हणजे कडक उपास. उगाच उपास म्हणायचा अणि खिचडी, साबुदाणे वडे हाणायचे हे बरे नाही. अजिबात काही खायचे नाही. आपला पोटाला आधार म्हणुन चार पाच फळं खाल्ली की झाल. फळं म्हणजे कलिंगड, फणस अशी मोठाली नाहीत, छोटीशी - सफरचंद, पेर, केळ, संत्र, मोसंब, चिकु वगैरे. परवा रविवारी संकष्टी म्हणताना शनिवारी फळ आणली. बायकोनं आग्रह केला म्हणुन एक इवलस खरबूजही घेतलं. मोठ मजेशीर फळ! त्याची साल लक्ष वेधुन घेत होती. रविवारी सकाळी कॅमेरा बाहेर काढला, ते खरबूज टेबलावर जरा प्रकाशात घेतलं. अशी नक्षिदार साल लेन्स मधुन बघायला काय मजा आली म्हणता. mm1 lr इथल्या खगोलशास्त्रज्ञांना हा एखाद्या ग्रहाचा फोटु वाटायचा mm2 lr या नक्षीकामाची सुरुवात बुडातुन होऊन ती वर वलयाकारात पसरत गेली होती mm3 lr सालीवरच्या रेघा रेघांच्या कलाकुसरीत मजा होती. कुठे शार्क, तर कुठे पंख पसरलेला समुद्रपक्षी तर कुठे पालथी पडलेली पाल असे असंख्य आकार दिसत होते. एका बाजुला सीमारेषा देखिल होती. mm4 lr काही नक्षी जरा विरळ होती आणि शिकाऊ कलाकारान संगमरवरावर काढलेलं ओबड धोबड नक्षीकाम भासत होतं. mm5 lr काही ठिकाणे समुद्रात उभ्या असलेल्या नौका आणि त्यांच्या आजुबाजुला तरंगणारी होडकी असा देखावा दिसत होता. mm6 lr देठाच्या अगदी लगतचा भाग तुळ्तुळीत होता. थोड्या अंतरापासून आडव्या रेषांची वलयाकार नक्षी सुरू झाली होती आणि पुढच्या रेषा त्या वलयांकित रेषांना लंबरेषेत वर गेल्याहोत्या mm7 lr जिथुन नक्षी सुरू झाली तिथुन मोठा प्रवाह रेषांना वेगाने बाहेरच्या दिशेने भिरकावत असलेले दिसत होते. mm8 lr mm 9 le पलिकडच्या भागाचे निरिक्षन केले असता काही मानवी आकृत्या आणि चक्क ईंग्रजीतील 'ए' हे अक्षर दिसुन आलं. mm10 lr फोटु टिपताना वेळ कसा गेला ते समजलंच नाही. मग अचानक भूकेची जाणीव झाली आणि लगेचच आज संकष्टी असल्याची आठवण झाली. इतका वेळ मी खरबुजाकडे 'त्या' नजरेने पाहिलच नव्हतं. कॅमेरा बाजुला ठेवला आणि सुरी हातात घेतली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10902
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

फोटो आवडले आणि वर्णनाची शैलीही.

In reply to by श्रावण मोडक

+२

हनी ड्यू!!!! भारीच फोटो व वर्णन. खरबुजात हे दोन प्रकार दिसतात एक अगदीच तुळतुळीत असतात व एक असे नक्षीदार बाह्यआवरण. बरेच दिवसात नवे स्पेशल सर्वसाक्षी प्रवासवर्णन आले नाही आहे. तेवढे जमवा! :-)

आयडियाची कल्पना येकदम झाक हाय... :-) फकस्त अता येकच चिंता...ती म्हणजे सगळ्या नवउत्साही फोटु-ग्राफरांनी रोज एकेक फळ घेऊन येऊ नये... नायतर आंम्हाला त्याचे विडंबना-पोटी सुरी घेऊन इथेही फ्रुटसॅलेड करावे लागेल...कॉलिंग वल्ली,बरोबर ना हो... ? ;-)

झकास फोटू, झकास वर्णन. देठ दिसणार्‍या फोटोमध्ये देठाजवळ समुद्रकिनार्‍याला धडकणार्‍या लाटांची सुबक आणि नाजूक नक्षी तयार झाली आहे असे वाटते.. :-)

सही... :) :)

असा विचार डोक्यात येऊन तो अंमलात आणणं..... तो ही इतक्या सुंदर तर्‍हेने...... !! मानना पडेगा !! तुम्हा फोटोग्राफर्स ना कशात काय दिसेल ते सांगता येणार नाही....... ;)

काय मस्त दिसत आहेत फटू. ते फुग्याला दोरे गुंडाळुन नक्षीकाम करतात, तसलाच प्रकार दिसतो आहे एकदम. (फटू आंतरजालाव्रुन घेतले आहेत.)

खरबुजाचा एक भन्नाट प्रकार मी केला होता. खरबुजाचे तुकडे सिग्नेचर मध्ये दोन तास मुरवत ठेवले. त्यावर किंचित मीठ भुरभुरवले. एकदम झक्कास प्रकार झाला होता

In reply to by परिकथेतील राजकुमार

अरे कलिंगडासोबत फ्लेवर्ड व्होडका असते रे. हा हन्त हन्त हन्त............ ( अवांतर..... तू मला गटणे भौ म्हणालास तर मी तुला काळा डॉन म्हणेन)

In reply to by विजुभाऊ

अगदीच राहावले नाही म्हणून अवांतर करत आहे.
अवांतर..... तू मला गटणे भौ म्हणालास तर मी तुला काळा डॉन म्हणेन
आता तुम्हाला वाटेल की मी तुम्हाला 'माधवी' किंवा 'पावसाची परी' म्हणावे, तर ते माझ्याकडून होणार नाही.

फोटो आणि वर्णन दोन्ही मस्त!!!

मान गये.. आपकी पारखी नजर और खरबुज. दोन्हो को ...

सर्व लेखन आवडले. फोटोंचे Description ही Class !!!!!!!

फार सुंदर छायाचित्रे. मायक्रो लेन्स वापरली आहे का? काय पॉवरची?