आयुष्याच्या कॅलिडोस्कोपमध्ये वेगवेगळ्या वळणांवरती वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला भुलवतात, आकर्षक वाटतात. आता लहानपणीच पहा ना, असं मूल क्वचितच सापडेल ज्याला फुलपंखी पर्या, राजपुत्र-राजकन्या, आगीच्या ज्वाळा ओकणारे , आकाशात संचार करणारे ड्रॅगन यांनी मोहविले नसेल.
त्याच लहान मुला/मुलीने जरा तारुण्यात पदार्पण केले की वसंतोत्सव, बहाराचा काळ सुरु होतो.ज्या ड्रॅगनची भीती लहानपणी वाटत असते तोच ड्रॅगन जिंकावासा वाटू लागतो. "Evoke the fire within" अशा धाडसी वृत्तीचा वाटून खुणावू लागतो. जग पादाक्रांत करण्याची , इच्छा मनात लसलसू लागते.अशावेळी आपले डेस्क्टॉप वॉलपेपर, आपल्या खोल्यांमधील चित्रे , कलाकृती ह्या ओरडून ओरडून विद्रोही म्हणा अथवा त्या त्या वेळेच्या मनस्थितीचे वर्णन करतात. आपल्या त्या वेळेच्या मनस्थितीच्या त्या द्योतक असतात.
हां हां म्हणता "मिडलाईफ" उंबरठ्यावर येऊन दाखल होतं.आपणही बरेचसे निवळलेलो असतो - मान्य करा वा नका करू.केसांना केशकलप लावा वा नका लावू. बरीचशी, खरच बरीचशी स्वप्ने साकार झालेली असतात. पण अजून जबाबदारीतून पूर्ण मुक्तता झालेली नसते. एकप्रकारचा सौम्यपणा, समजूतदारपणा तुमच्या स्वभावात येऊ घातलेला असतो. आणि काय आश्चर्य डेस्कटॉपवरचा "फायरी ड्रॅगन" एके दिवशी जाऊन त्या जागी शुभ्र तेजस्वी कमळ येते. तुम्ही मनाशी म्हणता "D-I-G-N-I-T-Y" किती सुंदर शब्द आहे. मला सर्वात आवडणारा शब्द. आणि तुमच्यातल्या या बदलावर तुम्हीही चमकता. पण वेल, हा बदल फार वरचा झाला हो. आत आत खोल जो बदल होत असतो तो तर कित्येक पटीने हलवून टाकणारा असतो. या काळात तुमच्या आजवरच्या महत्त्वाकांक्षांचा, जबाबदार्यांचा, जोडीदार म्हणून तुम्ही निभावलेल्या नात्याचा प्रत्येक टप्प्याचा तुम्ही आढावा घेत असता. कुठेतरी टिकमार्कींग चालू असते. कधी तुम्ही "अॅबीसमली डिप्रेस" होऊनरडता कधी "एक्स्टॅटीकली" आनंदी होता. काहीच मधले नसते. यालाच "मिडलाईफ क्रायसिस" म्हणतात का?
असो. कालपरवापर्यंत फक्त "सेक्स, हॅपीनेस, सोशल लाइफ" या विषयावर इंटुक (मानसशास्त्रीय) लेख वाचणारे तुम्ही आज "एजींग" या विभागाकडे वळता. कारण तुम्हाला कुठेतरी वार्धक्याची चाहूल लागलेली असते. मग तुम्ही "वय वाढण्याचे फायदे" वगैरे लेख वाचत सुटता. मी ही वाचला. मला खूप आवडला. न आवडून करते काय. तुम्ही आतापर्यंत एक मात्र जरूर शिकलेले असता - तुमची मूठभर का होईना तत्वे जर ठाम असतील आणि तुम्ही त्या तत्वांशी तडजोडी केल्या नसतील, तुम्हाला थोडेसे का होईना मित्र-मैत्रीणी असतील, छंद असतील, आणि जर तुमचे कुटुंब तुम्हाला साथ देईल तर तुम्ही सहज या क्रायसिसमधून पार पडाल.
पण एकंदर असे आहे. This is my perspective on midlife crisis.
वाचने
2778
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
लेख अजून मोठा हवा होता ह्या
मिडलाईफ क्रायसिस
शुचीजी...
अजून यौवनात मी ...
प्रतीक्षेत
म्हणजे मी काय रे मेल्या.. ??
In reply to प्रतीक्षेत by स्पा
=)) =)) =))
In reply to म्हणजे मी काय रे मेल्या.. ?? by गवि
मस्त
ह्म्म्म्म्म
हम्म्म्म ......!! बदल होतो
अय्या!
आणि माझं वय तर सोळाच्यापुढे
In reply to अय्या! by पैसा
मला मिड्लैफ यायला अजून येळ