मिठी...

हर्षद आनंदी जे न देखे रवी...
अधीर तो .. किंचित बावरलेली ती .. हात्तात हात..नयनात चाले रुजवात..अस्फुट अधर ते थरथरतात .. शब्द परी न सुचतात. .. सोनसळी तिची कांती झळाळे जसा मावळतीचा रवी .. उषेचा रक्तिमा गाली पसरला.. बघता हा नजारा तो देहभान हरवला.. क्षणात सावरला... हळूच घेतले कवेत तिजला.. मोहोरली ती .. अंगावर अंगावर फुले शहारा ..विसावला पळभर रवी क्षितिजावरी अनुभवण्या तो अद्बुत देखावा .. दोन देह परी एकची आत्मा..स्पंदने सांगती स्पंदनाना ..भारावली सृष्टी .. स्तब्ध दश-दिशा..जडावले श्वास ..मिठी किंचित सैलावली .. विश्वासाची वचने नयनातून समजली..नाजूक वेल ती जणू वृक्षाला बिलगली.. .
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

5 टिप्पण्या 2,033 दृश्ये

Comments

सांजसंध्या नवीन

अधीर तो .. किंचित बावरलेली ती .. हात्तात हात..नयनात चाले रुजवात.. अस्फुट अधर ते थरथरतात .. शब्द परी न सुचतात. .. सोनसळी तिची कांती झळाळे जसा मावळतीचा रवी .. उषेचा रक्तिमा गाली पसरला.. बघता हा नजारा तो देहभान हरवला.. क्षणात सावरला... हळूच घेतले कवेत तिजला.. मोहोरली ती .. अंगावर अंगावर फुले शहारा .. विसावला पळभर रवी क्षितिजावरी अनुभवण्या तो अद्बुत देखावा .. दोन देह परी एकची आत्मा.. स्पंदने सांगती स्पंदनाना .. भारावली सृष्टी .. स्तब्ध दश-दिशा..जडावले श्वास ..मिठी किंचित सैलावली .. विश्वासाची वचने नयनातून समजली.. नाजूक वेल ती जणू वृक्षाला बिलगली.. . छान आहे :)

तर्री नवीन

नवशृंगार चांगलाच जमलाय. विसावला पळभर रवी क्षितिजावरी अनुभवण्या तो अद्बुत देखावा ..ऐवजी साधेसे ... विसावला पळभर रवी बघण्या तो अद्बुत देखावा . चालले असते का ? जरा सहज वाटते मला.

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

छान!