टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना का केली? लोकांनी एकत्र यावे म्हणून. त्यांचा उद्देश साध्य झाला. लोक एकत्र आले. पण त्यांनी एकत्र येऊन काय केलं?
गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस जो तमाशा चालतो, त्याबद्दल हा ऊहापोह. काही मंडळं निदान दहा दिवसांत काही वेळा तरी भजनं लावतात. पण विसर्जनाच्या दिवशी मात्र कहर होतो. अक्षरश: दारु पिऊन, "कोई मेरे साथ कोई रात गुजारे..." सारख्या गीतांच्या तालावर हे तथाकथित "गणेशभक्त" नाचत असतात.
अरे, दारू पिऊन नाचायचंच आहे तर पब्ज मध्ये जा ना! त्यासाठी गणपतीची अशी विटंबना कशाला? खेदपूर्वक नमूद करावंसं वाटतं की टिळक जर आज हयात असते, तर त्यांनी आज गणेशोत्सव बंद केले असते!!
वाचने
4326
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजुन एक कारण
सहमत !!!
In reply to अजुन एक कारण by टारझन
कोण म्हणतेय?
कर्कश
१०१% सहमत
अरे, दारू
मला फरक पडतो
या सगळ्यापेक्षा सुद्धा
कोजागिरी आणि गोपाळकाला...
हे सगळं