समलिंगी संबंध.....
लैंगिकता हि प्रत्येक व्यक्तिगणिक वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचे काही लैंगिक अग्रक्रम असतात. पुरुषाला स्त्रीविषयी वाटणारे आकर्षण व स्त्रीला पुरुषाविषयी वाटणारे आकर्षण(भिन्नलिंगी आकर्षण) हे समाजाच्या सर्व घटकाद्वारे नैसर्गिक मानण्यात आले आहे. समान लिंग असणाऱ्या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधाना समलिंगी म्हणतात. पुरुषांचे पुरुषांशी संबंध असतील तर त्यांना गे म्हणतात व स्त्रीचे स्त्रीशी संबंध असतील तर त्यांना लेस्बिअन म्हणतात. समलिंगी संबंधातून मुल जन्माला घालता येत नाही त्यामुळे बहुसंख्य लोकांच्या दृष्टीकोनातून समलिंगी संबंध अनैसर्गिक मानण्यात आले आहेत. पण लैंगिक संबंधांचा हेतू हा फक्त मुल जन्माला घालणे नसून परस्परांना आनंद देणे हा आहे. दोन्ही व्यक्तींनी एकमेकांच्या आनंदासाठी केलेला लैंगिक अविष्कार हाच या संबंधांचा मूळ हेतू आहे.
समलिंगी आकर्षण हे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. साहित्य,शिल्प,कला या प्रकारच्या माध्यमातून ते आढळून येत. पण त्याकाळी याविषयी समाजात खुलेपणाने बोलले जात नसे.एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून समलिंगी संबंध अनैसर्गिक मानले जायचे. अमेरिकन मानसशास्त्र संस्थेने वैद्यकीय संशोधन करून समलैंगिकतेची व्याख्या "लैंगिकतेच्या विविध अविष्कारापैकी एक" अशी केली आहे. समलिंगी असणे हा मानसिक रोग किंवा विकृती नाही. ती शरीराची व मनाची एक अवस्था आहे. भिन्नलिंगी आकर्षणाप्रमाणे समलिंगी आकर्षणही नैसर्गिकच आहे. या व्यक्तींची बोद्धिक क्षमता, जडणघडण भिन्नलिंगी व्यक्तीप्रमाणेच असून या व्यक्तीही निरोगी आयुष्य जगू शकतात.
समलिंगी असण्याची काही कारणे :
१. शास्त्रज्ञांच्या मते आनुवंशिक व हार्मोनिक बदलांमुळेसुद्धा एखादी व्यक्ती समलैंगिक असू शकते.
२. तारुण्यात असणारी मुले भावनिक व मानसिक आधारासाठी समलिंगी संबंधांचा आधार
घेतात.
३. महाविद्यालयीन जीवनात लैंगिक प्रयोग करून बघण्याचे विलक्षण कुतूहल असते. अशावेळी भिन्नलिंगी जोडीदार न मिळाल्यास समलिंगी संबंध ठेवले जातात व नकळत पुढे त्याची सवय होती.
४. लग्न झाल्यावर कामेच्छा पूर्ण न झाल्यास व्यक्ती दुसऱ्या जोडीदाराचा शोध घेतात. भिन्नलिंगी जोडीदार न मिळाल्यास अशा व्यक्ती समलिंगी व्यक्तीशी संगत करायलाही घाबरत नाहीत.
समलिंगी असण्याचे धोके व बाहेर पडण्याचे मार्ग:
१.समलिंगी संबंधातील जोडीदारापैकी एकाला एड्स असल्यास व निरोध न वापरता संभोग केल्यास यातूनही एड्स होऊ शकतो.
२. नैसर्गिकरीत्या आपल्याला अशा व्यक्तींचे आकर्षण वाटत नसल्यास अशा व्यक्तींबरोबर शारीरिक संबंध ठेऊ नयेत. कितीही मोह झाला तरीही मनावर संयम ठेऊन अशा व्यक्तींशी शरीर संबंध टाळावा.
३.. योग्य समुपदेशन, डॉक्टरांची मदत व प्रबळ इच्छाशक्ती यामुळे समलिंगी असणाऱ्या व्यक्तींना यातून बाहेर पडणे शक्य आहे. अशा व्यक्ती यातून बाहेर पडू शकतात, त्यांना मुलं-बाळही होऊ शकतात पण परत समलिंगी आकर्षण जागृत होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असते.
कॅनडा, स्पेन, नॉर्वे, बेल्जीअम, दक्षिण आफ्रिका यासारख्या काही देशांनी अशा संबंधाना अधिकृत मान्यता दिली आहे. युरोपातील काही देशात मान्यता नसली तरी त्यांना वैवाहिक जोडप्यांचे अधिकार देण्यात आले आहेत. अमेरिकेतही काही राज्यात याला मान्यता आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेची राजधानी असणाऱ्या Washingaton शहरातही समलैंगिक लोकांच्या लग्नाला वैध ठरविणारे विधेयक मंजूर करण्यात आले. इंग्लंडमध्ये तर Manchestar जवळ "गे व्हिलेज" असे समलैंगिक लोकांचे गावच आहे . आखाती देशामध्ये अशा संबंधाना मृत्युदंडाची शिक्षा असून भारतात दंडसंहिता कलम ३७७ नुसार जन्मठेप/काही वर्षाच्या कारावासाची शिक्षा आहे.(विशेष म्हणजे भारतात बलात्कार करणाऱ्या नराधमाना पण जन्मठेपेची शिक्षा नाही). पण आता सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर सरकारने समलिंगी संबंधाना मान्यता देण्याचे ठरविले आहे..
भारतातील धार्मिक ग्रंथात अशा प्रकारच्या संबंधाना मान्यता नसून भारतीय समाज दुसऱ्या देशांपेक्षा वेगळा आहे. भारतीय संविधान, नैतिक मुल्ये वेगळी आहेत. या संबंधातून घातक आजार फैलाविण्याची जास्त शक्यता असल्याने समलिंगी संबंधास मान्यता देता येणार नाही असे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलेले आहे.
मुळात, भारतासारख्या देशात लैंगिक संबंधाबद्दल चर्चा करण्यात चोरटेपणा व अपराधीपणाची भावना आहे. एखाद्या मुलाला सायन्सऐवजी आर्ट्सला का जाव वाटत हे देखील ज्यांना चटकन समजत नाही, त्यांना समलिंगी संबंधाना मान्यता देण हेही पचवण अवघडच जाणार आहे. त्यांचे प्रश्न माहित नसलेला समाज त्यांना गुन्हेगार ठरवत आहे. अल्पसंख्याकावर अन्याय करण, त्यांना भेदभावाची वागणूक देण हे घटनाबाह्य असून माणूस म्हणून जगण्याच्या मुलभूत हक्कांच्या विरोधात आहे. सन्मानान जगण हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे.
समलैंगिक वर्तन अनैसर्गिक नाही अशी चर्चा IBN लोकमतवर झाली होती. त्यावेळी बिंदुमाधव खिरे जे समलैंगिक आहेत त्यांनी सांगितले कि, आपण असे संबंध मनापासून मान्य करीत नसलो किंवा असे संबंध मान्य करणे कठीण असले तरी या गोष्टी शास्त्रीय दृष्ट्या नैसर्गिकच आहेत. समलिंगी व्यक्तीस मनाविरुद्ध भिन्नलिंगी व्यक्तीशी संबंध ठेवण्यास भाग पाडले तर अशा व्यक्तींची मानसिक घुसमट होऊन आत्महत्या करेपर्यंत त्यांची मजल जाऊ शकते..
एका मुलाने ज्यावेळी आपल्या पालकांना समलैंगिक आहे असे सांगितले त्यावेळी त्याच्या पालकांनी त्याला घराबाहेर काढले. आता ते त्याला भरपूर पैसे पाठवितात, पण आपला मुलगा मानायला तयार नाहीत. समाजाची भीती व अवहेलना यामुळे या मुलाचा एकलकोंडा वाढत गेला. अनावर झाल कि एड्सचा धोका असूनही तो पुरुष वेश्यांकडे जातो. थोडक्यात काय, अशा लोकांना वाळीत टाकून किंवा शिक्षा करून प्रश्न सुटण्यापेक्षा अधिक बिकट होत जाणार आहे. त्यांना धीर व प्रोत्साहन देऊन समाजवून सांगण्याची गरज आहे.
बिली जीन किंग व मार्टिना नवरातीलोका या दोन महान टेनिसपटू समलैंगिक असूनही असंख्य टेनिस चाहते त्यांच्या टेनिस कौशल्यामुळे त्यांच्यावर फिदा आहेत. ओलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा व स्पोर्टस्मन ऑफ द सेन्चुरी असा पुरस्कार मिळविणारा कार्ल लुईस हा देखील गे होता. पण म्हणून त्याच्याविषयीचा आदर तसूभरही कमी होत नाही.
सगळ जग त्यांच्याविषयी बोलत असताना, संस्कृतीचे वाद घालीत असताना, सामाजिक स्वास्थ्याच्या चर्चा करीत असताना, ज्यांच्या वाट्याला समलिंगी जगण आल आहे त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे कोणीही समजावून घेत नाही. निकोप मनान समाजान आपल्याला स्वीकाराव, आजार-विकृती, गुन्हा-पाप अशी लेबल न लावता चारचौघांसारख जगू द्याव एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. कदाचित, गैरसमजुतीमुळे समाजाकडून त्यांची उपेक्षा झाली असेल,पण त्यांना सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे आहे.
वर्गीकरण
शिळ्या कढीला परत ऊत.
In reply to शिळ्या कढीला परत ऊत. by प्रचेतस
ताज्या कढ्यान्ची लिस्ट एकदा
In reply to ताज्या कढ्यान्ची लिस्ट एकदा by विश्वनाथ मेहेंदळे
ताज्या कढ्याच आता कुठं मिळना
In reply to ताज्या कढ्यान्ची लिस्ट एकदा by विश्वनाथ मेहेंदळे
+१
चर्चा करण्या योग्य विषय नाहि.
तर आम्ही शाकाहारी
संतुलित आणि उत्तम लेख
तीनही मुद्दे काहीसे विस्कळित किंवा नॉनस्पेसिफिक
In reply to तीनही मुद्दे काहीसे विस्कळित किंवा नॉनस्पेसिफिक by गवि
गवि, सहमत आहे...
In reply to तीनही मुद्दे काहीसे विस्कळित किंवा नॉनस्पेसिफिक by गवि
....
तर आम्ही शाकाहारी
संतुलित लेख
आपली समाजस्वास्थ्याविषयीची
In reply to आपली समाजस्वास्थ्याविषयीची by धन्या
कळकळ
In reply to कळकळ by तिमा
गल्ली चुकलात की हा होळीचा
सापट दिसली की पाचर ठोकायची
उत्तम लेख. काही मुद्द्यांबाबत
.
In reply to . by आदिजोशी
+१
In reply to . by आदिजोशी
कुठलीही गोष्ट फार पुर्वीपासुन
In reply to कुठलीही गोष्ट फार पुर्वीपासुन by मृत्युन्जय
+१०० उत्तम प्रतिसाद
In reply to कुठलीही गोष्ट फार पुर्वीपासुन by मृत्युन्जय
आता,
In reply to कुठलीही गोष्ट फार पुर्वीपासुन by मृत्युन्जय
+१ मृत्युन्जय
In reply to कुठलीही गोष्ट फार पुर्वीपासुन by मृत्युन्जय
+१००
In reply to . by आदिजोशी
+१००
एकदम
सापट दिसली की पाचर ठोकायची
उघडले एक चंदनी दार.. पण कुठले
एका मांसाहारी माणसाची गोष्ट
In reply to एका मांसाहारी माणसाची गोष्ट by चौकटराजा
चिकन खाणारा माणूस
In reply to चिकन खाणारा माणूस by कपिलमुनी
चूक झाली
छान
या बाबतीत पूर्णतः वैयक्तिक
लेख आणि त्यावर चालेलली
.
सवय
In reply to सवय by आबा
अगदी अगदी
माझे लंडन च्या हिल्टन मध्ये
In reply to माझे लंडन च्या हिल्टन मध्ये by निनाद मुक्काम …
वैयक्तिक मत
निसर्गाचा नियम म्हणजे
In reply to निसर्गाचा नियम म्हणजे by निनाद मुक्काम …
असतात
In reply to निसर्गाचा नियम म्हणजे by निनाद मुक्काम …
निनाद अज्ञान दूर करा
In reply to निनाद अज्ञान दूर करा by चौकटराजा
दीड हजार
In reply to दीड हजार by आबा
आबा आभार !
अबबाबो!!
वाचतोय
हम्म
In reply to हम्म by चित्रा
+१ चित्राताई
In reply to हम्म by चित्रा
बाउंड्री लाईन - जन्मजात - स्वीकृत
In reply to हम्म by चित्रा
वल्ली: शिळी कढी आपण २०००
बंद खोल्यांमध्ये कुणी कुणाशी