होळी म्हणले की ' बोंबलणे ' आणि ' टिमकी ' वाजवणे याचे बाळकडू आम्हाला घाटावरच मिळाले. मात्र मुंबईत आल्यावर या दोन्ही गोष्टीना मुकलो. दरवर्षी सोसयटीच्या आवारात अगदी पारंपारिक पध्दतीने होळी साजरी होते मात्र या दोन्ही गोष्टी बघायला ( करायला ) मिळत नाहीत. मात्र या वर्षी होळी पेटली की ठरवलय ,प्रसादाचा नारळ होळीत सोडायचा आणि मग होळी भोवती प्रदक्षिणा मारत बोंब ठोकायची. ' हा काय करतोय येड्यासासारखा ? ' असे सोसायटीतील लोकाना वाटले तरी चालेल .
वर्ष भरात ज्या गोष्टींमुळे त्रास झाला/ होतो त्यांचा उध्दार करायचाच म्हणून यादी तयार करायला घेतली ती अशी :)
१) पहिली फेरी सचिनच्या नावे - अरे भो x x च्या, प्रतेक सामन्यात अपेक्षा ठेवल्या होत्या, मित्रांशी पैजा लावल्या होत्या आता बोंबल्तो तुझ्या नावाने . आता तरी बांग्लादेशात होऊदे !
२) पर्यावरणवादी - या नालायकांना फक्त होळी आणि दसरा या दिवशीच झाडे, पर्यावरण -हास यांची आठवण होते. बकरी ईदला मुक्या प्राण्यांची हत्या होताना एक शब्द निघत नाही
३) मुंबईकर - मराठी अस्मितेचा अभिमान बाळगत धुलवडीच्याच दिवशी रंगमंचमी साजरी करणा-या मुंबईकरांसाठी तिसरी फेरी ( यात आम्ही स्वता: ही आलो :) )
४) खास ' ती ' च्या साठी - ती हो आमची , ८.०५ ची पनवेल - ठाणे लाल डब्बा - एक दिवस जरी वेळेवर आली तर शप्पथ
बास ! बास ! दमलो , याच्या पुढे फे-या मारता येणार नाहीत ( आणि जास्त बोंबलूनही उपयोग नाही ). पुढल्या वर्षी पर्यंत सा-या सोसायटीला नाही बोंबलायला लावले तर ' घाटावरचा' असे म्हणून घेणार नाही
काय तुमची टार्गेट्स तयार आहेत का ? कळूदे आम्हाला ही :)
( टीपः वरील यादीत ताई, माई, अक्का, बाबा, अण्णा, दादा, काका- पुतण्या, गुरु, भाई, महागाई , भ्रष्टाचार यांना मुद्दाम स्थान दिले नाही. यांच्या नावाचा शिमगा रोजचाच आहे. त्यांच्या बद्दल बोंबलणे जाऊ दे त्यांच्या करामतीने आमची बोबडी वळु नये हीच ' होळी' चरणी प्रार्थना :) )
अमोल केळकर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3318
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावरील कंपू प्रतिसादक.
जावयाची गाढवावरून धिंड काढून
मुंबईकर - मराठी अस्मितेचा
शुभेच्छा
आज अन उद्याची धूळवड इथेच.