होळी
अंगास रंग लावू दे,
अंगास अंग लावू दे,
सण होळिचा आहे,
प्रेम रंगात न्हाऊ दे..
दिवस आज मस्तीचा
प्रेमाचा व जबरदस्तीचा
गाली गुलाल फासू दे
थोडीशी मस्ती करू दे
उघडा खांदा रंगवू दे,
गोरे तन चिंब करू दे,
ओलेती तुला बघू दे,
प्रेम रंगात न्हाऊ दे,
तनू रंगात रंगली
सखी सचैल न्हाली
वस्त्रे तनूंस लिपटली
गुन्हे माफ,असे होळी
मुठीत रंग,मनात रंग
मन तव प्रेमात दंग
रंगात श्रीरंग रंगू दे,
राधे आज होळी खेळू दे
अविनाश
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4520
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाय आवड्ल.....
छान
क्या बात है !
दिवस आज मस्तीचा प्रेमाचा व
हे काय 'डर' मधल्या 'अंग से
च्यायला, होळीचा रंग वेगळाच दिसतोय. :)
डाक्टरसाहेब,
In reply to च्यायला, होळीचा रंग वेगळाच दिसतोय. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कशाबद्दल बोलत आहेत ते ?
In reply to डाक्टरसाहेब, by वपाडाव
हो हो, मला पण समजलं नाही.
In reply to डाक्टरसाहेब, by वपाडाव
उघड उघड नै बोलता येत काही
In reply to हो हो, मला पण समजलं नाही. by सूड
काही ऐकू नका ह्या
In reply to उघड उघड नै बोलता येत काही by वपाडाव
काय सांगता यकु ?? तुम्हाला
In reply to काही ऐकू नका ह्या by यकु
अगदी मनमोकळे बोला.
In reply to उघड उघड नै बोलता येत काही by वपाडाव
हॅ हॅ हॅ
In reply to अगदी मनमोकळे बोला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपलं काय ठरलंय. :)
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
माझं हे सारं सामान गं सखु !!!
In reply to अगदी मनमोकळे बोला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@धनाजीरावांनी ह्या रसग्रहणाचे
In reply to माझं हे सारं सामान गं सखु !!! by वपाडाव
ह्याप्पी होळी.
काका मस्त आहे कविता