Skip to main content

डेली सोप मालिका कशी बनते .

लेखक यशोधन वर्तक यांनी शुक्रवार, 02/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली टीव्ही वर लागणाऱ्या मालिका लागतात त्या पाहून त्या कशा तयार होत असतील याचे चित्र मनात उभे राहिले. १ ) प्रथम मालिका चालण्याकरिता कलाकार शोधले जातात..इतर मालिकांमध्ये ज्यांची कामे संपली आहेत किंवा त्यांना काढून टाकले आहे , किंवा त्यांचे पत्र परत जिवंत होवू शकत नाही ( सास भी.. मधील मिहीर सारखे ) अश्या कलाकारांची यादी बनवली जाते . अश्या टुकार लोकांबरोबर काही चांगले कलाकार पण साईन केले जातात. २ ) कलाकार ठरल्यानंतर फक्त लोकांना सांगण्याकरिता ( जमल्यास ) एखादी कथा शोधण्यात येते ( त्या कथे चा आणि मालिकेचा पुढे कसलाही संबंध उरत नाही हा भाग वेगळा ) ३ ) साधारणतः १०० भाग बनतील एवढा माल मसाला असला तरी चालतो .....कारण भारतीय सणांची यादी खूप मोठी आहे त्या मुले वर्षभर गुढी पाडवा , गणपती संक्रांत, दिवाळी, दसरा पासून ते ईद , मोहरम अगदी सर्वपित्री अमावास्या देखील मालिकेतून दाखवता येतात या मुळे आणखी २०० दिवस मालिका वाढवता येते . या मध्ये एखादी आपत्ती उदा. अपघात , पूर , दुष्काळ , भूकंप वगैरे दाखवून प्रत्येक आपत्तीला १० असे एपिसोड वाढवू शकतो . ४ ) या सर्वात २-३ वर्षे संपली की इतर गोष्टी शोधल्या जातात उदा. मुख्य पत्राची स्मृती जाणे ( या मुळे दोन मुलांची आई असलेली व्यक्ती सुद्धा परकर पोलका घालून वावरू शकते , किंवा नव्या नवऱ्याला विसरून जुन्या नवऱ्याबरोबर परत संसार करायला जातात ) अगदी चुकून ? दोन लग्ने करणे ......हॉस्पिटल मध्ये मूल बदलणे. ५ ) आणखी आवडीचा विषय म्हणजे उतार वयात झालेल लग्न किंवा बाल विवाह ..त्यातून बिंदाडी, मासा वगैरे पात्रे आणता येतात ...सध्या मध्यमवर्गीय घरात वावरणारी मी माणसे अतिशय बेगडी वाटत असतात . ६ ) मग काय मजाच मजा चार दिवसा करता सुरु झालेली मालिका १० वर्ष झाली तरी संपत नाही. मुले,नातवंडे यांच्या पुढे जावून पंतवनडे ,खापर पंतवनडे झाली तरी चार दिवसाची सासू मारायचे नाव घेत नाही पाहावे तर प्रयेक भागात पूर्वीपेक्षा अधिक तेजपुंज. ७ ) या काळात क्रियेटिव्ह टीम चे मुख्य काम काय ? ते म्हणजे " brain storming " करणे , कश्याकरता तर संकटे शोधण्याकरता. मनात कल्पना करा की ८-१० लोकांची टोळी घोळका करुन बसत असेल आणि संकटे शोधात असेल म्हणजे कंटाळवाणी झाली मालिका की टाका संकट . ...उदा. खून , अपहरण , चारित्र्य हनन ,अश्लील फोटो, निनावी पत्रे ,राजकारण , सासूने विष देणे , पेयात अमली पदार्थ टाकणे , इथपासून धंदा बुडने, राजकिय कारकीर्द संपणे , कर्ज बाजरी होणे , गुंडांचा ससेमिरा , घरावर जप्ती आल्याने बेघर होणे , धंद्यातील फसवणूक संकटे जेवढी जास्त तेवढे मालीकेचे भाग जास्त . ८ ) मालिकेतील पुरुष पत्रे बहुदा कणाहीन आणि बुळी असतात ( अगदी लापुझंना ) आणि स्त्री पात्रे प्रमाणाच्या बाहेर आक्रमक आणि घाणेरडी असतात . बहुदा स्त्री पत्राची निवड करताना गरागरा डोळे फिरवणे , उग्र चेहेरेपट्टी करणे , आक्रमक हावभाव करणे , भुवया उडवणे अश्या टेस्ट घेतल्या जात असतील. या आणि अश्या पुष्कळश्या बऱ्या वाईट गोष्टीने भरलेल्या मालिकेतून मूळ कथा केव्हाच हद्दपार झालेली असते . महागाई आणि संसारिक त्रासाने गांजलेला प्रेक्षक वर्ग स्वस्त करमणुकीच्या शोधात असतो ..पण त्याच्या डोक्यावर मारल्या जातात त्या अश्या बिनडोक मालिका . काळात नकळत आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संदर्भ मालिकेतील कथानकात किंवा पात्रांच्या वागण्या बोलण्याशी जोडले जातात . मुळात बेफामपणे वागणारी आक्रस्ताळी पात्रे लोकांच्या ताणात भरच घालत असतात मध्यम स्त्री वर्गाला नजरेसमोर ठेवून बनलेल्या अश्या या मालिकांमधून काय दिसते तर एकीकडे बालिशपणे वागणारी आणि सर्व अन्याय कारण नसतानाही सहन करणारी नायिका आणि दुसरीकडे सत्यापासून अगदी दूर असणारी आणि अतिशय हीन पातळीवरून रागावलेली खलनायिका . खरं तर प्रत्येक व्यक्तिमत्वाला ब्लाक आणि व्हाईट अश्या दोन्ही शेडस असतात पण एकतर्फीपणे रंगवलेली ही पात्रे आपल्याला विकृत करमणुकीचे समाधान मिळवून देतात परंतु नीट विचार केल्यास आपल्या जवळची वाटत नाहीत. आज कोणालाही याबद्दल विचारल्यास तुम्हाला थोड्या अधिक प्रमाणात याच प्रतिक्रिया मिळतील. या मालिकांमधून करमणूक किंवा विरंगुळा मिळतो की मनस्ताप हा विवादाचा मुद्दा आहे . सुरुवाती सुरुवातीला उत्तम वाटणारी मालिका ५० भाग झाले की अतिशय बालिश आणि विकृत वाटू लागते . आपल्याला हे कळत असते पण वळत नाही....... कारण तरीपण आपण मालिका बघतो . यशोधन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7921
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

>>>आपल्याला हे कळत असते पण वळत नाही....... कारण तरीपण आपण मालिका बघतो . आदरार्थी बहुवचन का स्वतःसाठी? मग ठीक आहे. चालू द्या.

In reply to by प्यारे१

मी तर नेहमी इन्ग्लिश आणि साउथ इद्नियन सिरिल बघतो.त्यामुले हिन्दी सिरियलबद्ल मला कमी महिती आहे.

In reply to by चिरोटा

साउथ इद्रिय- खोखोखोखोहो होहोहोहोखोखोखो.----- मला कुप जोरात हसायला अलेले अहे. साउथ असेल किव्ना नॉरथअसेल पण इद्रियं तर सगल्यन्ची सारखी असतात. मला हिन्दीमधये तर फत्क *उशा नदकण्री* महित आहेत. त्या माझ्या आईप्रमाणे दिसतात. तसेच त्या मझ्या द्दुरच्या नत्यातल्ला पन आहेत. त्याना मी पवित्र रिशता मधये पाहिले होते.

जसे रोज-रोज नवीन-नवीन गमती-गमतीदार धागे येतात तश्याच पद्धतीनी 'डेली सोप मालिका' बनवल्या जातात होय. ;)

यशीधन यांचे संशीधन मस्त आहे. आपण होऊन सगळा धागा लांब पसरवून टाकला आहे. तरीही एक - ठाण्यात रहाणार्‍या एका कलावतीला दिवस गेले. कलावतीचे मालिकेतले वय ४५ चे आसपास . तिने न्रिर्मात्याला ही " गोड " बातमी सांगितली असावी. त्यांचे तोंड मात्र कडू झाले. आता काय करायचे. बैठक झाली. कॅमेरावाला म्हणाला " मो़कळी " होईपर्यंत फक्त क्लोजप दाखवू, " पण तिला अद्नून मधून शूटिंगला यावे लागेलच. तिचा नवरा पाठवायला तयार नाही. मग काय ... सर आले धावून तसे लेखक आले धावून म्हणाले...... आयला तिला रसत्यावर अपघात होतो व ती कोमात जाते.... कशी आयडिया आहे.......

In reply to by चौकटराजा

या अश्या मालिकांचा सार्वजनिक छळ सर्वप्रथम आभाळमाया आणि सर्वात मोठा त्रास अवंतिका ने चालू केले होता . etv वर चार दिवस सासूचे आणि या गोजिरवाण्या घरात असे वेगळे त्रास होते. मी तर रात्री ८ वाजता बाहेर पासून १० वाजता परत येत असे.

In reply to by यशोधन वर्तक

असा छळ ही हिन्दी वाल्यांची अवलाद आहे. १३ २६ किन्वा जास्तीत जास्त ५२ भागांची मालिका ही दूरदर्शनच्या काळात ठरली होती. आठवा ये जो है जिंदगी, अमोल पालेकरची नकाब ई. यात जन्मला .. बेटे,,,ये सिरीयल देखते है " हम लोगा ", मग बुन्याद , मग खानदान मग रामायण मग म्हाभा>>>>>>>>>>>>>>रत ( सन्मान्य कारण मूळ कथानकच दीर्घ ) . मग मालगाडी...... मालगाडी पीछे वाले स्टेशन बोले रुक ४ वेळा तरी ही बया थांबायलाच तयार नाही. मी तर आमच्या बायकोला म्हणायचो " चार दिवस सासूचे" मालिका रंगवायची असेल तर आशालताबाईंचेच एक सूत बाहेर जमते असे दाखवायचे ५ वर्ष मरण नाही. कारण त्या सर्वशक्तीमान पावरफुल असल्याने मग त्यांच्या व त्या सुताच्या लफड्याना काय तोटा ?

In reply to by यशोधन वर्तक

असा छळ ही हिन्दी वाल्यांची अवलाद आहे. १३ २६ किन्वा जास्तीत जास्त ५२ भागांची मालिका ही दूरदर्शनच्या काळात ठरली होती. आठवा ये जो है जिंदगी, अमोल पालेकरची नकाब ई. यात जन्मला .. बेटे,,,ये सिरीयल देखते है " हम लोगा ", मग बुन्याद , मग खानदान मग रामायण मग म्हाभा>>>>>>>>>>>>>>रत ( सन्मान्य कारण मूळ कथानकच दीर्घ ) . मग मालगाडी...... मालगाडी पीछे वाले स्टेशन बोले रुक ४ वेळा तरी ही बया थांबायलाच तयार नाही. मी तर आमच्या बायकोला म्हणायचो " चार दिवस सासूचे" मालिका रंगवायची असेल तर आशालताबाईंचेच एक सूत बाहेर जमते असे दाखवायचे ५ वर्ष मरण नाही. कारण त्या सर्वशक्तीमान पावरफुल असल्याने मग त्यांच्या व त्या सुताच्या लफड्याना काय तोटा ?

माझं एक छोटंसं निरीक्षण आहे, सध्याच्या प्रत्येक मालिकेत एका प्रकारची व्यक्ती नक्कीच सापडते. ती म्हणजे एक वेडा किंवा वेडी ! त्यांच्या त्या परिस्थितीचा कारण कितीही विनोदी व गंभीर असो, अशी एखादी व्यक्ती तर असतेच. गोष्ठी तिथेच थांबत नाहीत, तर कथानक पुढे नेण्याची किंवा त्याला आकार देण्याची मोठ्ठी जबाबदारी अश्या ह्या वेड्यांवर टाकलेली असते. ह्याने मूलभूत स्वरूपाचे फायदे होतात. एक म्हणजे ते कधीही काहीही करू शकतात. आणि त्यांनी काहीही केलं तरी त्याबद्दल त्यांना दोषी मानता येत नाही. अजून एक फायदा असा की ह्या व्यक्तीने मालिकेला दिलेली दिशा सद्सद्विवेकबुद्धी, सारासार विचार, अश्या काही महत्वाच्या गृहीतकांकडे सहज कानाडोळा करू शकते. कोणताही प्रेक्षक कश्याही विरुद्ध काही ब्र पण काढू शकत नाही, कोणी काही तक्रार केलीच तर तीच मालिका पाहणारे, सहानुभूतीने 'अरे असा काय करतोस, तो वेडा आहे की नै' असा बोलून आपली बोळवण करतात हा अजून एक फायदा ! शांतपणे तो मूर्ख खोका (Idiot Box) बंद करावा आणि आत्मक्लेश टाळावा हेच योग्य !

कलर्सवर 'शिवाजी' नावानं चालू असलेल्या मालिकेचा सेट लोक तिथे जाऊन फोडत का नाहीत ? मी ही मालिका पहात नाही - पण शेजार्‍याच्या कृपेमुळं अशा अनेक मालिका घरी असलो की रात्री 11 वाजेपर्यंत नुसत्या ऐकाव्या लागतात. कायच्या काय संवाद लिहीले आहेत शिवाजीचे..

In reply to by यकु

>>>>शेजार्‍याच्या कृपेमुळं अशा अनेक मालिका घरी असलो की रात्री 11 वाजेपर्यंत नुसत्या ऐकाव्या लागतात. कायच्या काय संवाद लिहीले आहेत शिवाजीचे.. ११ वाजल्यानंतरचं कसं काय? -निरागस प्यारे१

In reply to by मी-सौरभ

११ नंतर पसंद अपनी अपनी
..........११ नंतर लोक 'टीव्ही पाहण्यासाठी' जागे कसे राहतात ब्वा ;) .....बाकी 'गुंतता...' सारख्या मालिका वेळेत संपवल्या....त्याबद्दल वाहिनीचे आभार ! - मालोजी

मालिका बघणे म्हणजे लैच धाडसाचं काम आहे.. त्यापेक्षा मी दहावेळा पाहीलेला एखादा सिनेमा पुन्हा एकदा पाहणे पसंत करतो.. एकदा हिम्मत करुन "अफसर बिटीया" १०-१५ मिनिटं पाहिली. म्हटलं, स्पर्धा परीक्षा देणार्‍या मुलीची कहाणी आहे, पाहुया... अरारारा.. अरे, काही रिसर्च-बिसर्च कराल का नाही लेकंहो? मागे एका मराठी मालिकेत डायरेक्ट "आय पी एस" ची परीक्षा देणार्‍या पोरीचे संवाद ऐकून असाच घेरी येऊन पडलो होतो.. परीक्षेच्या हॉलमध्ये बंदुकधारी पोलिस फिरतात आणि काहीही गडबड केल्यास डायरेक्ट गोळी घालतात ?? फुकट रे आम्ही, फुकट.. लेख चांगला जमलाय, यशोधन..

मालिका - मालिक आ ....देवा येरे बाबा लवकर असचं काहीसं.......

मालिकांचा अभ्यास दांडगा आहे तुमचा! मी त्या "या गोजिरवाण्या घरात" मालिकेला "या लाजिरवाण्या घरात" म्हणायचो. रोज काही ना काही लफडी चालणार्‍या घराला आणखी काय म्हणणार! ;)

इथं कुणीतरी प्रसिद्ध आणि खुप मोठे लेखक होते ना, मालिकांसाठी लेखन करणारे, त्यांच्या किमान निषेधात्मक प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. बाकी लेखापेक्षा बालगंधर्वांच्या प्रतिसादाने जास्त मजा आणली.

मी बाकी मालिका पहाण्याचे बंद केले पण मला चार दिवस सासूचे हिचे व्यसन लागले. बापरे ! गिव्ह मी अ फिक्स पेक्षाही भयंकर ! ही मालिका बंद होईल त्या दिवशी रिअली पंच पक्वान्नाचे जेवण करून तो दिवस सेलेब्रेट करायचा ठरले. कसचं काय...... या मालिकेचा एक फॉर्मॅट आहे. एका वेळी घरातील एकाचे डोके फिरवायचे ! आता गेले ९ महिने ही मालिका बघीतलेली नाही. आशालताबाईंचे वा अनुराधाचे डोके फिरले आहे का हो एव्हाना ?

माझी आवडती सिरीअल आहे "सी आय डी". ही सिरिअल पाहताना अगदी गडागडा लोळत नुसता हसत असतो मी! या निमित्ताने तेवढाच हसण्याचा व्यायाम होऊन जातो. नाहीतरी रडक्या सिरिअल्सपेक्षा असल्या विनोदी मालिका चांगल्याच असतात, नाही का? :P

आमच्या घरी " पवित्र रिश्ता" ही सिरियल न चुकता पाहिली जाते ( आई,वहीनी अन आजी ) एक साधासुधा मनुष्य मानव ,होतकरु मॅकेनिक ,चाळीत राहणारा लोकलमधून फिरणारा , की ज्याच्या चाळीवजा घरात डायनिन्ग टेबल आहे ,फ्रीज आहे , ड्रेसिन्ग टेबल ,सोफा इत्यादी इत्यादी फर्निचर आहे ,छान छान पड्दे आहेत खिड्क्याना ,प्रत्येकाला स्वतः ची खोली देखील आहे ;) कसा आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर एक प्रतिथयश बिजनेसमॅन झाला आहे याची कर्मकहाणी ,अन त्याची होणारी अर्धांगिनी " अर्चना " ही केवळ ८ वी पास (?) असून देखील एका कंपनीत सुपरवाइज़रची नोकरी करून घर संभाळते लग्न झाल्यानंतर अजूनच इंटरेस्टिंग अर्चनाची सासू "उषा नाडकर्णी" चे संवाद, तिचा मराठी बोलीभाषेतल हिंदी ,क्या बात क्या बात ;) अन आता तर सिरीयल १८ वर्ष पुढे गेली आहे अर्चना अन मानव विभक्त होणार आहेत म्हणे ! याला जबाबदार तिची सासू अन तिच्याच कैलासवासी दिराचा अनौरस पुत्र जबाबदार आहेत ;) अठरा वर्षात अर्चना अन मानवने एकमेकांना साधा कॉलही केलेला नाही , अन तेच दोघ आता घटस्फोट घेण्याकरिता सहा महिने एकत्र राहणार आहेत कोर्टाच्या आदेशानुसार ! त्याच्यातही त्याचा ताळतन्त्री पुतण्या सचिन अन मानवची आई पाठीमागे आहेच हिकडे अर्चानाची दत्तक कन्या " पूर्वी " सचिनला टक्कर द्यायला सज्ज झाली आहे " तुम जितनी भी कोशिश करलो दादा मै आईबाबा का तलाक नही होणे दुंगी " ! अजुन एक ही पुर्वी नावाची कन्यक बॉसलाही खुन्नस देताना दाखवली आहे , बॉसला त्याच्या जबाबदारीची जाणीव करुन देन्यात कुठॅही अन कधीही कमी पड्त नाही ही कार्टी ;) अर्चना २० ते २२ कॅ टे गरीतल्या ३ मुलांची आई असूनदेखील अगदी जशीच्या तशी दाखवली (पूर्वीसारखी) आहे ,(निदान केसांची एक बट तरी पांढरी दाखवायची ना ) ;) मानवाची पण तीच गत ,त्याच्यापेक्षा त्याचा पुतण्या कम मुलगा जास्ती सिन्सिअर वाटतो चेहऱ्याने ;) अन अजून एक ट्विस्ट तर बाकी आहे ;) मानवचा गेलाबाझार बॉस डी.के याचा एक बिजिनेस टायकुन सुपुत्र जो सध्या भारतात आलेला आहे अन अर्चना + मानवची मुलगी " ओवी" जिच्याबरोबर ह्याचा साखरपुडा झालेला आहे तो आयटम " आता (फक्त)अर्चनाच्या दत्तक पुत्री "पुर्वी " च्या प्रेमात पडणार आहे अशी लक्षण दिसत आहेत ;) लैच विन्ट्रेस्टिण्न्ग मोडवर चालु आहे हे सिरियल " पवित्र रिश्ता " ;) असो..............

In reply to by पियुशा

मी हि काय कोणतीच मालिका मनापासून आजीबात बघत नाही.जेवणाची आणि पवित्र रीशाताची वेळ एकाच आहे त्यामुळे पवित्र रिश्ता चालू असताना जेवढा दिसेल तेवढा भाग बघावा लागतो. यात या दोघांचा हा दुसरा घटस्फोट आहे.आणि तिसर्यांदा अर्ज दिलाय.एकदा नामंजूर होतो.पूर्वीचा घटस्फोट झाल्यानंतर ती आठवी पास अर्चना सुपरवायझर झाली होती.पण नंतर अचानक मानव अर्चनाची एकी होते आणि खायचे वांदे असतानाही हि नोकरी करत नाही. मध्ये एकदा हि मालिका पाच वर्षे पुढे ढकलली होती.तेव्हा हा मानव(शिक्षण १० वी ) आर्किटेक आणि बिल्डर झाला होता. लोक कित्ती चवीन बघतात हि मालिका. नशीब या सेरीअल मध्ये अब अर्चना कभी म नाही बन सक्ती सारखे संवाद नाहीयेत. आता अठरा वर्षानंतर या दोघांची मिळून ५ मुलं आहेत ,एक दत्तक मुलगा व मुलगी, दोन जुळ्या मुली, आणि एक मेलेला मुलगा.पण तरीही अर्चना आणि मानवच्या चेहऱ्यावर एकही सुरुकुती नाहीये न त्यांचे केस पांढरे झालेत.त्यांच्या आयाही तेवढ्याच तरुण आहेत. एकदा ह्या सिरीयल मध्ये अर्चना 'मुझसे और बर्दाश नाही होता मानव' अस म्हणते. त्यानंतर मी 'मुझसे भी'अस बोलल्यावर घरात सगळ्यांनी मला उषा नाडकर्णी म्हणायला सुरुवात केली होती. एक सेरीअल लिहिणारे मिपावर आहेत त्यांना हात जोडून विनंती.सत्याशी (सिनेमा नव्हे) जवळपास असेल अस लिहा न प्लीज.

In reply to by किचेन

त्यामुळे पवित्र रिश्ता चालू असताना जेवढा दिसेल तेवढा भाग बघावा लागतो.
तुम्हाला -'जेवण चालु असताना जेवढा भाग दिसेल तो'- असं म्हणायचंय का?

In reply to by वपाडाव

>>त्यामुळे पवित्र रिश्ता चालू असताना जेवढा दिसेल तेवढा भाग बघावा लागतो. हसून हसुन मेलो राव ! डोळ्यातून पाणी आलं माझ्या ! गाढवागत एकटाच हसतोय.

वप्याच्या प्रतिसादाने पार खपून मृत्यु पावलेलो आहे. +१!!१११११११११११११११११११११११११११११११११