नमस्कार मंडळी,
हा लेख लिहायचे प्रयोजन म्हणजे नेहमी येणारे आणि मला नुकतेच जरा जास्तच आलेले अनुभव.
भ्रष्टाचार, सरकारी नोकरांची मनमानी, राजकारणी नेत्यांची लाज वाटायला लावणारी कृत्ये हे सर्व तर आहेच पण आपण स्वतः देखील कितपत ईमानदारीने वागतो याचा एक आढावा म्हणा हवं तर.
एकच प्रकरण - मला घर विकत घ्यायचं होतं. शोधाशोध सुरु झाली.. सर्वात पहिले मनात आलं ते म्हणजे घरांच्या वाढलेल्या किमती, खरं कारण नुसतच डिमांड सप्लाय गणित आहे का? माझ्या मते नाही.. वाढलेल्या किमतींमागे बिल्डर, त्यांना सपोर्ट देणारे नेते, तथाकथित गुंतवणूक्दार वर्ग आणि घरांची खरेदी विक्री करून देणारे एजंट हे देखील तितकेच जबाबदार आहेत.
आजकाल Resale घर घेणे म्हणजे एजंट शिवाय सोपं नाही. मुंबईत नविन घरं परवडत नव्हती, त्यात एखादं घ्यायचं ठरवलच तर बिल्डर २० टक्के काळा पैसा मागत होते, अधिक पार्कींगचा पैसा देखील काळाच द्या आणि फ्लोर राईज चा पैसा देखील काळा देत असाल तर घर मिळेल असं समोरासमोर बिल्डर च्या ऑफिसमधे गेल्यावर मला सांगण्यात आलं. मुंबईत नविन घर घेण्याचा विचार पुन्हा मनाला शिवला नाही.
कारण मला काळा पैसा देऊन घर घ्यायच नव्हतं.
यातून खालील काही गोष्टींची शक्यता वाटली.
१. बिल्डर काळा पैसा घेऊन टॅक्स चोरी करतात आणि राजकारणी लोकांना यातूनच काळाबाजारी करता येते.
२. ईन्वेस्टर लोकं बिल्डरला दर सहा महिन्याला किंमती वाढवण्यासाठी दबाव आणतात आणि किमती अव्वा च्या सव्वा वाढत जातात.
३. यातुन काळा पैसा मिळवणे आणि काळ्याचा पांढरा करणे सोपे जाते.
पुण्यात रिसेल घर शोधण्यासाठी एजंट लोकांना भेटणं सुरु केलं. यातले बरेच लोकं देखील चोर निघाले. घराच्या मालकाला हव्या असलेल्या किमतीपेक्षा जास्त मिळवून देतो असं हे घरमालकाला सांगतात आणि कमिशन तसेच २-४ लाख रुपये सहज घशात घालतात.
समजा एखादा फ्लॅट तुम्हाला आवडलाच तर किंमत वगैरे ठरते, तोपर्यंत घरमालक कोण हेही माहित नसतं. आणि बर्याचदा शेवटच्या क्षणाला घरमालक अमूक अमाउंट ब्लॅक मधे मागतो आहे असे सांगितले जाते.
"आजकाल ब्लॅक शिवाय कुठेच घर मिळत नाही" असे ज्ञानही आपल्याला दिले जाते.
घरमालक म्हणजे आपल्यासारखीच सामान्य माणसं. १५-२० लाख रुपये उदाहरण घेऊ. ईतका काळा पैसा सामान्य माणूस काय करणार बरं? फक्त टॅक्स वाचवण्यासाठी सामान्य माणून स्वतःच काळाबाजारी करतो. एवढंच काय जिथे वैयक्तीक फायदा दिसतो तिथे सामान्य माणून भ्रष्टाचार करतो आणि करणार्याचे समर्थनही करतो. मला एक पुर्ण पैसे व्हाईट मधे घेऊन घर देणारा व्यक्ती भेटला आणि मी घर घेतलही. पण काही सरकारी कामासाठी मी स्वतः नाकारले तरी वकीलाने स्वतःच्या फी मधून ते लाच दिलेले पैसे वसूल केले. मी त्याचा अप्रत्यक्ष रित्या भागीदार झालोच.
हे सगळं इथेच थांबत नाही. आजकाल अतिशय क्लिष्ट आणि संताप आणणार्या बँकेच्या गृहकर्ज प्रक्रियेतून जात असताना. घराचं वॅल्युएशन वाढवणे, कर्ज लवकर मंजूर करणे यासाठी देखील माझ्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. हे सर्व करून देणारे एजंटही आहेत म्हणे.
कॉर्पोरेशन/ईलेक्ट्रिसिटी डीपार्टमेंट मधे घर नावावर करणे यातही हे सर्व येणारच आहे आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या मी याचा भागीदार होणारच आहे. स्वतः ईमानदार राहण्याचा कितपत प्रयत्न करायचा. प्रत्येक ठिकाणी फाईट करण्यासाठी वेळही हवाच.
हे सगळ फक्त एका अनुभवावरून..
मी एकदा वाहतुकीचा नियम पाळला, (दिवसा, ट्रॅफिक असताना, लाल दिवा असताना थांबून राहिलो) तर एका रिक्क्षावाल्याबरोबर मारामारीपर्यंत वेळ गेली होती. मागून हॉर्न वाजवणारे, शिव्या देणारे सामान्य लोकंच होते.
रेशन कार्ड, कॉलेज/शाळा अॅड्मिशन, सरकारी/खाजगी नोकर्या, जात पडताळणी, अनधिकृत बांधकाम, टॅक्सचोरी आणि अशाच असंख्य प्रकारात पदोपदी भ्रष्टाचार करणारे आपणच आहोत तर मग चांगलं सरकार आणि नेते मिळावेत ही अपेक्षा आपण कोणत्या आधारावर करतो देव जाणे.
धन्यवाद.
आपला,
मराठमोळा.
वाचने
10952
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
ईमानदारीच्या आईचा घो?
सुंदर लेख. भ्रष्टाचार,
ममो, दुर्दैवाने मलापण घर
उत्त्तम लेख
हम्म...
In reply to उत्त्तम लेख by प्रकाश घाटपांडे
खरंच.... हि सत्यं परिस्थीती
ईपीएफ
मलाही वर्षभरापूर्वी फ्लॅट
सामान्य माणसाला सगळेच
कुठलाही बदल घडवणं कठीण
In reply to सामान्य माणसाला सगळेच by गवि
माफ करा..
In reply to कुठलाही बदल घडवणं कठीण by बाळ सप्रे
+१० लाख
In reply to सामान्य माणसाला सगळेच by गवि
गवि, सहमत. मी भ्रष्टाचारी
In reply to सामान्य माणसाला सगळेच by गवि
गवि,
In reply to सामान्य माणसाला सगळेच by गवि
हे अनुभव सांगितलेत तर बरे
In reply to गवि, by मराठमोळा
>>आणि एकटेपणाचा, अंधाराचा
In reply to हे अनुभव सांगितलेत तर बरे by गवि
आपण
>>कायदे ढीग कराल पण आडातच
In reply to आपण by चिरोटा
उत्तरे,
In reply to >>कायदे ढीग कराल पण आडातच by मराठमोळा
मी मुंबईमध्ये घर घेण्यासाठी
हम्म्म्म
परा शेट
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
_/\_
In reply to परा शेट by मी-सौरभ
शेवटी...
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
होय तर! तुला भारी अनुभव.....
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
असामान्य
गुर्जी,कंटेक्स सुद्धा
In reply to असामान्य by राजेश घासकडवी
म्हणूनच म्हटलं होतं
In reply to गुर्जी,कंटेक्स सुद्धा by मराठमोळा
बर्र..., ठिक आहे .. मी वर
In reply to म्हणूनच म्हटलं होतं by राजेश घासकडवी
गल्लत
In reply to बर्र..., ठिक आहे .. मी वर by मराठमोळा
हम्म्म्म
In reply to गल्लत by राजेश घासकडवी
हेच, सामान्य माणूस कोण हा
In reply to गल्लत by राजेश घासकडवी
पटलं...
In reply to हेच, सामान्य माणूस कोण हा by मराठमोळा
सामान्य आणि असामान्य
In reply to पटलं... by राजेश घासकडवी
डोळे उघडा...
In reply to सामान्य आणि असामान्य by हुप्प्या
+१
In reply to डोळे उघडा... by राजेश घासकडवी
पुन्हा आकडेवारी
In reply to डोळे उघडा... by राजेश घासकडवी
मूलभूत
In reply to पुन्हा आकडेवारी by हुप्प्या
+१०० टु राजेश, आता किमान
In reply to म्हणूनच म्हटलं होतं by राजेश घासकडवी
+१
In reply to +१०० टु राजेश, आता किमान by ५० फक्त
आपण ठरवले तर काळ्या पैशाच्या
काळ्या पैशातील व्यवहार
धन्यवद नेत्रेश, >>बिल्डर ४ ते
In reply to काळ्या पैशातील व्यवहार by नेत्रेश
मराठमोळा साहेब, पण सरकारच पण चुकत आहे ना
सागांयच होतस येव्हढेच म्हणतो
खालील कॉमेंटवरुन सुरु झालेली