संत्र्याची खीर / कमलालेबु खीर (बंगाली पा़कृ)
साहित्यः
१ लिटर दूध
४ टेस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी - जास्त)
२ छोटी संत्री
१ टीस्पून वेलचीपूड
१/२ टीस्पून केशर
सजावटीसाठी बदाम-पिस्त्याचे काप
पाकृ:
प्रथम दूध एका नॉन-स्टीक भांड्यात तापवायला ठेवावे.
दूधाला एक उकळी आली की गॅस मंद आचेवर ठेवून दूध आटु द्यावे. मधे-मधे डावाने ढवळत रहावे.
दूध निम्मे झाले, जरा घट्ट झाले की त्यात वेलचीपूड, केशर व साखर घालावे व ढवळावे.
साखर विरघळली की त्यात थोडे बदाम-पिस्त्याचे काप घालावे व गॅस बंद करावा.
संत्र्याची साले काढून ठेवावी. फोडींमधील बिया व वरचा पातळ पांढरा भाग काढून गर वेगळा करावा.
दूध पूर्ण गार झाले की त्यात संत्र्याचा गर घालावा व खीर फ्रिजमध्ये ३-४ तास थंड होण्यासाठी ठेवावी. (दूध गरम असताना संत्र्याचा गर घालून नये दूध नासेल.)
आदल्या रात्री करुन ठेवली तर संत्र्याचा स्वाद आणखीन खीरीत उतरेल.
ही मस्त, चविष्ट खीर थंड सर्व्ह करावी :)

वाचने
9347
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
बंगाली संत्रा बासुंदी.
ये...हेss.....
छान सजावट..
In reply to छान सजावट.. by कॉमन मॅन
सॉल्लीड , नविन प्रकार कळ्ला
सध्या मिपावरच्या सुगरणी व
गेल्या ३-४ दिवसांपासुन पाकृ
बासुंदी?
In reply to बासुंदी? by स्मिता.
ही संत्र्याची खीर
In reply to बासुंदी? by स्मिता.
चव मस्तच असणार...... ही
अहाहाहा....
सादरीकरण आणि पाककृती
हाय,हाय,हाय... पाणी
अगं बाई तुझे (पाय नव्हे) हात
जे ब्बात.. बर्याच दिवसांनी
मस्तच..
कीलर !!
ते शेवटच्या फोटोत
दिसला दिसला .. सानिकातैंचा
In reply to दिसला दिसला .. सानिकातैंचा by इन्दुसुता
अरे हायसे म्हणजे काय, केवढं
मला वाटलं तू संत्रही शिजवून
In reply to मला वाटलं तू संत्रही शिजवून by प्राजु
ती संत्री म्हणजे
In reply to ती संत्री म्हणजे by प्राजु
अगं मी पाकृत तसे लिहिले आहे
In reply to अगं मी पाकृत तसे लिहिले आहे by सानिकास्वप्निल
चला संत्राला अजुन एक
In reply to चला संत्राला अजुन एक by गणपा
टँजेरीन आणि क्लेमेंटाईन...
दिसतंय झकास पण बरं लागतं का
मस्तच
अरेवा.. ही डिश आधी कधी पाहिली
In reply to अरेवा.. ही डिश आधी कधी पाहिली by मराठमोळा
नागपुर्ची संत्रा बर्फी
संत्र्याची फुले
संत्रं + दुध...
खुपच छान!!
क्या बात है.........
छान! नेहमीप्रमाणेच सुरेख
अरे वा!
वेगळीच पाकृ! फोटो
छान...
फ्रूट सलाड????
लय म्हण्जे लयच भारी.... वरील