आज भारताची क्रिकेटमधे श्री लंकेबरोबर गाठ पडली.
भारतीय क्रिकेट टीमची सध्याची स्थिती आणि गती पाहता कुठल्याही आशा नव्हत्याच.
अपेक्षा नाहीत त्यामुळे अपेक्षाभंगाचे दु:खही नाही.
असा सुज्ञ विचार भारतीय क्रिकेटरसिक करू लागलाय.
सचिन सेहवाग आउट झाल्यावर तर होत्या नव्हत्या त्या सार्या आशा संपुष्टात आल्या.
"तरी सांगत होतो आधी बॅटींग घ्या, चेस करताना आपली फॅ फॅ उडते , पण ऐकलं नाही
आता भोगा आपल्या कर्माची फळं"
"३२० आणि चेस करून केवळ अशक्य"
"मी सांगतो आजची मॅच फिक्स झालीय आधीच"
"आज कितीने १०० ने की २०० शे ने हरायच ठरवलय"
"आपण तर बुवा क्रिकेट पहायचच सोडून दिलय, ती हॉकी टीम पहा चालली लंडन टीमला
आपण आता फक्त हॉकी पाहतो"
"हा सचिन महाशतकाच्या निमित्ताने किती दिवस जागा अडवून ठेवणार आहे कुणास ठाऊक"
असे काही काही उद्गार ऐकू येत होते.
----
एक सेहवाग आणि दुसरा तो महाशतकाच्या प्रतिक्षेत असलेला 'सचिन तेंडूलकर'
एवढे दोनच फलंदाज आमच्याकडे आहेत. बाकी कुणाला बॅटदेखील हातात धरता येत नाही.
असा एक सोयीस्कर आणि गोड गैरसमज काहीजणांनी करून घेतलाय.
असो...
पण टीम धोनीने पुन्हा आशा जिवंत केल्या आणि
लोकांची भाषाच बदलून गेली.
तात्पुरता क्रिकेटपासून दूर गेलेला रसिक
संध्याकाळपासून पुन्हा टीव्हीकडे वळला.
पुन्हा त्यांना प्रतिक्षा आहे त्या महान फलंदाजाच्या
महाशतकाची !
वाचने
2671
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
याचं सारं श्रेय
कदाचित लवकरच महाशतकाचा योग आहे.
छान छान
हाण्ण्ण
In reply to छान छान by परिकथेतील राजकुमार
तात्पुरता क्रिकेटपासून दूर
हं..
In reply to तात्पुरता क्रिकेटपासून दूर by कॉमन मॅन
सदर व्यक्तिगत रोखाच्या
In reply to हं.. by राजो
व्यक्तिगत रित्या दोषारोप
In reply to सदर व्यक्तिगत रोखाच्या by कॉमन मॅन
अहो तसं नाही, तसं
In reply to व्यक्तिगत रित्या दोषारोप by राजो
(लाईक बटणाची सोय करण्यात
In reply to अहो तसं नाही, तसं by प्यारे१
हे सर्व सट्टेबाजांचे अर्थकारण असते.
In reply to तात्पुरता क्रिकेटपासून दूर by कॉमन मॅन