अरविंद केजरीवालांनी पुन्हा एकदा दुगाण्या झाडल्या..!
वंदे मातरम् !
तथाकथित टीम अण्णाचे सदस्य श्री अरविंद केजरीवाल यांनी कालच पुन्हा एकदा देशाच्या सार्वभौम संसदेवर चिखलफेक करून दुगाण्या झाडल्या आहेत. 'आपली संसद हेच या देशाकरता सर्वात मोठे संकट आहे, तिथे सगळे बलात्कारी आहेत' वगैरे वगैरे मुक्ताफळे केजरीवालांनी उधळली आहेत.
टीम अण्णांच्या पाठीशी असलेला संघ व भाजपचा छुपा पाठिंबा, परकीय शक्तींचा आणि कॉर्पोरेट भांडवलदारांचा पैसा आणि माध्यमांनी हिरो केल्याबद्दल 'आपणच काय ते सर्वेसर्वा आहोत' असा टीम अण्णाचा स्वत:बद्दलचा फाजील आत्मविश्वास आता अधिक बळावलेला दिसतो, असे म्हणावे लागेल.
केजरीवालांनी झाडलेल्या वरील दुगाण्यांवरून टीम अण्णांनी आता पुन्हा एकदा संसद आणि राज्यघटना यांना चॅलेन्ज करण्याचे ठरवलेले दिसते. या मंडळींना या देशात लोकशाही नकोच असून केवळ कॉर्पोरेट भांडवलशाही हवी आहे असाच यांचा एकंदरीत छुपा अजेंडा दिसतो. परंतु मुंबईतील अण्णा आंदोलन सपशेल हापटल्यामुळे टीम अण्णाला आताशा चळही लागलेला दिसतो आहे.
भारतीय राज्यघटनेतील कलम १९ (१) (अ) नुसार अरविंद केजरीवालांना भाषण करायची व आपले विचार मांडण्याची मुभा आहेच परंतु त्याचसोबत कलम १९ (२) काय म्हणते (...so far as such law imposes reasonable restrictions on the exercise of the right conferred by the
said sub-clause in the interests of the sovereignty and integrity of India,) याकडे केजरीवालांचे लक्ष गेलेले दिसत नाही आणि म्हणूनच संसदेवर दुगाण्या झाडून भारतीय राज्यघटना व लोकशाहीच्या सार्वभौमतेवर हल्ला चढवण्याचा गंभीर गुन्हा त्यांनी केलेला आहे, व याकरता आम्ही या लेखाद्वारे श्री अरविंद केजरीवाल यांचा तीव्र निषेध करतो व त्यांना भारतीय दंड संविधान कलम १५३(ब) (अ) च्या अंतर्गत imprisonment for 3 years, or fine, or both—Cognizable—Non-bailable—Triable by Magistrate of the first class—Non-compoundable - या तरतुदीनुसार शिक्षा व्हावी, अशी इच्छा व्यक्त करतो.
आणि त्यातूनच जरी केजरीवालांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्यांना भारतीय संसद अगदी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ हवी असेल तर त्यांना स्वत:चा पक्ष काढून निवडणुका लढवण्याची व निवडून येऊन त्यांच्या स्वप्नातली संसद प्रत्यक्षात आणण्याची मुभा आहेच. परंतु त्यांनी खुद्द संसदेच्याच संघीय स्वरुपावर कदापि हल्ला करू नये, तो सहन केला जाणार नाही असे या लेखाद्वारे आम्हाला सांगावेसे वाटते.
जय हिंद..!
-- कॉमॅ.
प्रतिक्रिया
+१०००
+२०००
+१०,००,०००
आमचेही मत .
(No subject)
टीम अण्णांच्या पाठीशी असलेला
:)
खोटेपणा कळण्यासाठी आकडे बघा
+१
हे सरसकटीकरण करणे संसदीय
हम्म
एकंदर काय तर मिडियाने पुन्हा
आणि कॉमन मॅन* बळी पडला.>>>
उलट असेही म्हणता येईल...