नेट वर कलावंतिण गडाचे फोटो पाहिल्यापासुन एकदातरी हा ट्रेक करायचाच ही खूणगाठ मनाशी बांधली होती. जानेवारी मधे माधव भट याचा मेल येता क्षणीच ही संधी नक्की गाठायचे ठरविले.
मेल मधे मिळालेले फोटो (या मोहिमेचे प्रेरणास्थान):
दिवसभराचे काम आटोपून शुक्रवारी संध्याकाळी नाशिकहुन आम्ही चौघे (मी - ह्र्षिकेश, माधव,अनिरुध्द आणि शुभा) निघालो. नाशिक - मुम्ब्रा - शिळफाटा - कळंबोली मार्गे पुण्याकडे जाणारा एक्स्प्रेस वे गाठला. शेडुंग फाटा मार्गे खोपोली रस्त्यावर लागल्या लागल्या लगेच एक रस्ता डावीकडे - ठाकुरवाडी येथे जातो - हेच आहे आपल्या आजच्या मुक्कामाचे ठिकाण.
गावात पोहोचल्यावर तिथल्या श्वानांनी आमचे जोरदार स्वागत केले. काळ्याकुट्ट अंधारात गावातील सगळे रस्ते पालथे घालुन अखेर आम्ही हनुमान मंदिरात पोहोचलो.
क्षितिज व्यापुन लांबवर पसरलेला "प्रबळगड" आपल्या नावाचे बिरुद सार्थ करीत होता. पुर्वी प्रबळ कोकण किनारे आणि नजीकच्या वाटेवर आपला धाक जमवून असावा.
पुण्यातून निघालेले राहुल आणि चंद्रभूषण आल्यावर आम्ही प्रबळ माचीची वाट धरली. माची वर बर्यापैकी वस्ती असल्याने वाट छानच होती. लाकूडफाटा / मोळ्या / भाजीपाला घेऊन जाणारे गावकरी वाटेवर सोबत करीत होते.
डोंगर धारेच्या डावीकडून माचीकडे जाणारी वाटः
थोडेसे वर गेल्यावर आसपासची डोंगर रांग लक्ष वेधून घेत होती. एका मोठ्या शिळेवर आरुढ होण्याचा मोह माधवला झाला. त्याची पोझ मी पटकन कॅमेर्यात पकडली.
तासा - दीड तासात प्रबळ माची वर येऊन पोहोचलो. तिथे श्री निलेश भुतांब्रा यांच्या घरी स्वादिष्ट चहा पोहे यांची पोटात भर टाकली. येथेच राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते. (मोबाईल ९९२०५१८०८६)
नुकत्याच सारवलेल्या जमिनीवर थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढील वाटेला लागलो. सारवलेल्या जमिनीचा मंद सुवास आणि थंडावा मनात दरवळत होता.
माची वरुन आता कलावंतिण गड अधिक सुस्पष्ट दिसत होता.
गडाला कलावंतिण असे नाव का बरे पडले असावे?
तर एका राजाकडे एक कलावंतिण होती म्हणे. ति या गडावर राहायची. राजा तिकडून गेल्यावर देखील ति तिथेच राहिलि म्हणुन गडाला असे नाव प्राप्त झाले अशी कथा गावकर्यांकडुन ऐकायला मिळते. परंतु आजुबाजूच्या परिसरावर टेहळणी करण्याकरीताच या गडाची निर्मिती झाली असणार.
साधारण अर्ध्या तासाच्या खड्या चढाई नंतर प्रबळगड आणि कलावंतिण यांच्या खिंडीत आलो. गावातुन येणारी ही वाट मात्र घरंगळलेले दगडगोटे आणि मुरुम यामुळे दमछाक करणारी होती. उन्हामुळे आमची सगळी दोस्त मंडळी आता विसावा शोधत होती.
खिंडीतुन गडावरील सुरुवातीच्या पायर्या खुणावत होत्या.
लवकरच मी ऊंचावर आलो आणि मगाची खिंड आता मागे पडली होती.
या चित्रातील पायर्या तर साक्षात आकाशाला गवसणी घालत होत्या.
शेवटी १५ ते २० फुटांचे सोपे प्रस्तरारोहण करुन गडाचा माथा गाठता येतो. साधारण४०-५० माणसे एका वेळी मावतील एवढाच माथ्याचा विस्तार आहे.
वरुन माथेरान बरेच जवळ दिसत होते:
विस्तारलेले प्रबळगड - माची पठार वस्ती साठी अनेक पिढ्यांचे स्थान बनले असावे.
ऊतरतांना पायर्या अधिकच आक्रमक वाटत होत्या.
आता पायर्यांची वाट प्रबळ माची आणि कलावंतिण यांच्या खिंडीकडे वेगाने झेपावत होती.
परतीच्या वाटेवर निलेशच्या घरी गरमा गरम तांदळाची भाकरी, ऊसळ, झणझणीत ठेचा व आमटी भात असा फक्कड बेत रिचवून तृप्तीची ढेकर दिली.
कारल्याच्या वेलात गुरफटलेले घर
एक वेगळा गड पाहिल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहर्यावर होते. पाऊले झपझप वाट उतरत होती.
आता कलावंतिण गडाचे हिरवाईत न्हालेले रुप बघण्यासाठी पावसाळ्यात नक्की परतायचे असा निश्चय करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो.
- ह्र्षिकेश
(टिपः
मिपा वर आणि तेही मराठी मधुन लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तरी चूकभुल द्यावी घ्यावी.
मिपावर बरेच पुणेकर आहेत म्हणे.... )
दिवसभराचे काम आटोपून शुक्रवारी संध्याकाळी नाशिकहुन आम्ही चौघे (मी - ह्र्षिकेश, माधव,अनिरुध्द आणि शुभा) निघालो. नाशिक - मुम्ब्रा - शिळफाटा - कळंबोली मार्गे पुण्याकडे जाणारा एक्स्प्रेस वे गाठला. शेडुंग फाटा मार्गे खोपोली रस्त्यावर लागल्या लागल्या लगेच एक रस्ता डावीकडे - ठाकुरवाडी येथे जातो - हेच आहे आपल्या आजच्या मुक्कामाचे ठिकाण.
गावात पोहोचल्यावर तिथल्या श्वानांनी आमचे जोरदार स्वागत केले. काळ्याकुट्ट अंधारात गावातील सगळे रस्ते पालथे घालुन अखेर आम्ही हनुमान मंदिरात पोहोचलो.
वाचने
10665
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम वृत्तांत. पहिलाच
मस्त!
+१
In reply to मस्त! by पैसा
वृत्तांत मस्तच
टेन्शन नक्को - मार्च मध्ये जावू :-)
In reply to वृत्तांत मस्तच by प्रचेतस
आम्हाला मुहूर्त कळवा
In reply to टेन्शन नक्को - मार्च मध्ये जावू :-) by मोदक
मोदक साहेब, जाणार असलात तर
In reply to टेन्शन नक्को - मार्च मध्ये जावू :-) by मोदक
मस्त फोटो. पायर्या भितीदायक
पायर्या खरोखरच भन्नाट आहेत.
सफर आणि चित्रे आवडली.
In reply to पायर्या खरोखरच भन्नाट आहेत. by मराठे
फोटो आणि वृतांत आवडला
चला आज अजुन एक गड सर झाला...
ज ब रा...
पावसाळयात कलावंतीण ट्रेक
In reply to ज ब रा... by मोदक
तरीही सांभाळून. :-)
In reply to पावसाळयात कलावंतीण ट्रेक by Hrushikesh
पावसाळ्यात पुन्हा जाऊ
In reply to तरीही सांभाळून. :-) by मोदक
़ही खी खी समुद्र ही पण आमच्या
In reply to पावसाळ्यात पुन्हा जाऊ by Hrushikesh
हृषिकेश आपली गल्लत होते आहे काय?
In reply to ़ही खी खी समुद्र ही पण आमच्या by प्रचेतस
ऑ..?
In reply to हृषिकेश आपली गल्लत होते आहे काय? by वपाडाव
आपकी तंदुरूस्तीका राज..? ते
In reply to ऑ..? by मोदक
पहीला फोटो भयाण सुंदर आहे!
@तिथून सरळ खाली उडी मारावीशी
In reply to पहीला फोटो भयाण सुंदर आहे! by अन्नू
@तिथून सरळ खाली उडी मारावीशी
In reply to @तिथून सरळ खाली उडी मारावीशी by अत्रुप्त आत्मा
On a serious note...
In reply to पहीला फोटो भयाण सुंदर आहे! by अन्नू
जबराट ट्रेक आहे, मला वाटतं
जाणीवपूर्वक काढलेले सुरेख फोटो. आवडले!
आता या वयात
एकदम छान दोस्ता. असेच फिरत
मस्त!
ऋषिकेश
छान ले़ख.
अप्रतिम छायाचित्रे.
नाद करायचा नाय !