दुर्गराज राजगड आणि स्वराज्याचे तोरण - तोरणा किल्ला यांच्या मधोमध, सह्याद्रीच्या कुशीत लपलेला प्रचंड सुळका - लिंगाणा. हा किल्ला शिवरायांनी १६४८ मध्ये चंद्रराव मोरेना पराभूत केल्यानंतर बांधला. सुळक्याचा आकार हा शिवालीन्गाशी बरेच साधर्म्य दाखवत असल्याने त्याचे नाव लिंगाणा असे पडले. या किल्ल्याचा मुख्य वापर हा तुरुंग म्हणून होई. मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आलेल्या कैद्यांना शिड्यांच्या मदतीने सुळक्यावर चढवण्यात येई आणि शिड्या काढून घेत. सुळका योग्य उपकरणे (किमान एक दोरी) असल्याशिवाय उतरणे शक्य नाही. अर्थात हे कैदी तहान-भुकेने किंवा खाली उतरण्याच्या प्रयत्नात दरीत पडून मृत्युमुखी पडत.
लिंगाणा - वाटेवरून
इतिहासात मिळणाऱ्या काही उल्लेखानुसार लिंगाणा व रायगड हे दोन्ही किल्ले महाराजांनी पुरंदरच्या तहात स्वराज्यात ठेवले होते. ब्रिटिशानी १८१८ मध्ये मराठ्यांचा पाडाव केल्यानंतर त्यांनी इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचीही खूप नासधूस केली.
आज तांत्रिक rock climbing साठी लिंगाणा हा सह्याद्रीतील सर्वात कठीण ठिकाणापैकी एक मानला जातो. महाराष्ट्रातील बऱ्याचशा climbers साठी हे एक मोठं स्वप्न असतं.
अशा या लिंगाण्यावर स्वारी करण्याची संधी मला फेब्रुवारी २०१२ च्या पहिल्या शनिवार-रविवारी मिळाली.
रायलिंगाच्या पठारावरून - खाली सिंगापूर गाव
आम्ही १५ जण ४ तारखेला संध्याकाळी पुण्याहून निघालो. वेळे मार्गे मोहरी या लिंगाण्यापासून अगदी जवळच्या गावी पोहचलो. येथे रात्री विश्रांती घेतली.
५ तारखेला पहाटे ३ ला उठून सर्व आवरून ४ वाजता चालायला सुरुवात केली. अंधारातच गावापासून चालत रायलिंगाच्या पठारापर्यंत पोहोचलो. त्यानंतर तेथूनच खाली जाणाऱ्या 'बोराट्याची नाळ' या घळीतून जवळपास १ किलोमीटर खाली उतरलो आणि खालून रायलिंगाच्या पठाराला वळसा घालून लिंगाण्याच्या पायथ्याशी पोहोचलो.
बोराट्याची नाळ
लिंगाण्याच्या गुहेतून - रायलिंगाचे पठार
येथून साधारणतः ४५० फुट चढून गेल्यावर लिंगाण्याच्या गुहेपाशी येऊन पोहचलो.(दगडं होतीच)
गुहेशेजारची 'वाट'
येथून पुढे अतिशय कठीण चढण सुरु होते. सुरुवात होते जवळपास ४०-५० फुटी कड्याने!
तसेच सुळक्यावरून पुढे जाताना दोन्हीबाजुनी दिसणारी २५०० फुटाची दरी अतिशय भीतीदायक होती.
दुपारी १२ वाजायच्या सुमारास आम्ही सुळक्याच्या शिखरावर पोहोचलो. येथून समोर रायगड आणि मागे तोरणा दिसतो.
शिखरावर
विजयी वीर
यानंतर आम्ही rappelling करून खाली उतरायला सुरुवात केली.
पाण्याचे टाके
३.३० च्या दरम्यान सर्व खाली पोहोचलो. जेऊन, झोपून घेतलं. जवळच्याच पाण्याच्या टाक्यावरून पाणी भरून घेतले. संध्याकाळी ५ वाजता शेवटचा ४५० फुटी टप्पा उतरायला सुरुवात झाली.
rappelling
हा टप्पा दोन उपटप्प्यामध्ये उतरायचा होता. १५० + ३००. येथे काही नवखे सदस्य घाबरले होते. त्यामुळे उतरणीला अपक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. मी खूप उशिरापर्यंत बसून होतो. ७ वाजता जेव्हा मी पहिल्या १५० फुटाला ला सुरुवात केली, तेव्हा जवळपास अंधार झाला होता. अर्ध्यात उतरलो तेव्हा अजून ७-८ जण खाली जायचे शिल्लक होते. रात्र झाल्याने उतरायला खूप वेळ जात होता. खुप वेळ बसून मी शेवटून दुसरा (माझ्या मागे दोरी सोडवणारा) उतरलो. खाली आलो तेव्हा ९.३० होऊन गेले होते.
सर्व लोक खाली आल्यावर आम्ही दोऱ्या गुंडाळल्या, एक एक दोरी गळ्यात अडकवली आणि १०.२० च्या आसपास पळायला सुरुवात केली. रायलिंगाच्या पठाराला वळसा घालून बोराट्याच्या नाळेतून वरच्या पठारावर आम्ही ११ वाजता पोहोचलो. तसेच पुढे पळत १२ च्या दरम्यान मोहरी गावात पोहोचलो.
परत येताना गाडीत डुलक्या काढत ६ तारखेच्या पहाटे ४.३० ला पुण्यात घरी आलो.
[आणि ७.३० ला उठून ९ वाजता कार्यालयात हजर झालो.]
हे मी.पा. वर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले [माझे नसलेले] चलचित्र.
हा इंग्रजीत सविस्तर लेख.

वाचने
11293
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
-
फोटो जरा मोठे टा़कले असते तर
लिंगाणा...जबरदस्त सुळका
जबरा.
धन्य आहे तुमची __/\__
अवघड प्रस्तरारोहणाखातर हार्दिक अभिनंदन!
लवकरच मोठे फोटो टाकतो.
In reply to अवघड प्रस्तरारोहणाखातर हार्दिक अभिनंदन! by नरेंद्र गोळे
अभिनंदन. सुरक्षेचा विचार करून
ब्रॅव्हो !!!
अभिनंदन!
+१
In reply to अभिनंदन! by पैसा
बापरे...पाहुनच पाचावर किंवा
अजून थोडे
नमस्कार, शतशः नमन तुम्हाला,
पन्नासराव पन बीन...टाकू
In reply to नमस्कार, शतशः नमन तुम्हाला, by ५० फक्त
चढताना सगळ्यात आधी वल्ली, ५०
In reply to पन्नासराव पन बीन...टाकू by मालोजीराव
मी येणार आहे.
In reply to चढताना सगळ्यात आधी वल्ली, ५० by प्यारे१
मालोजीराव,मलाही घेऊन जाणार
In reply to पन्नासराव पन बीन...टाकू by मालोजीराव
होय सायबानु अपुन सगले च्या
In reply to मालोजीराव,मलाही घेऊन जाणार by जयंत कुलकर्णी
(No subject)
In reply to होय सायबानु अपुन सगले च्या by मालोजीराव
जबरदस्त
थरारक.. तुमच्या चिकाटीला आणि
जबरस्त फोटो
अरे वा!
मस्त.. कधी जायचा योग येतोय
तुमचे कौतुक करावे तितके थोडेच