आठवणीतील मृत्यूची तीन रूपे....
माझ्या आठवणीतल्या मृत्युच्या प्रसंगापैकी तीन अगदी अतर्क्य अकल्पनीय आहेत.
१. सचिन ३२ वर्षीय होतकरू तरुण. आई वडीलांचा एकुलता एक मुलगा. स्वत:चा व्यवसाय . मा. प्रा. सुमारे ३००००. २ लहान मुली. ६ आणि २ वर्षाच्या. माहेरी गेलेल्या बायको व मुलींना आणण्यासाठी रात्रीच्या बसने सचिन मुंबईला निघाला होता. Reservation मिळाले नाही. आई वडील म्हणाले Reservation मिळाल्या नंतर जा. ते न ऐकता आयत्या वेळी मिळेल असा विचार करून निघाला. शेवटच्या क्षणी मिळाले. शेवटच्या बाकावर जागा . अर्धा प्रवास झाल्यावर driver शेजारच्या माणसाला झोपायचे होते म्हणून सचिनला त्याने विनंती करून सीट exchange केली . सचिन driver शेजारी जाऊन बसला. अर्ध्या तासानंतर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या truck ला बसची धडक बसून जागीच ठार झाला.. Driver फक्त जखमी झाला.
सचिन ला imergency नसूनही व Reservation मिळाले नसताना जाण्याची तातडी का वाटावी ? सीट बदलण्याची बुद्धी का व्हावी ?
२. काकाजी वय ५५ वर्षे. आरोग्य उत्तम. रक्तदाब विकार नाही. मधुमेह नाही. हृदय ठणठणीत. १० वर्षापूर्वी operation करून मेंदूतील छोटी गाठ काढलेली . त्यानंतर नियमित औषधे व तपासण्या करीत असत. सर्व काही नॉर्मल. जेवण अत्यंत मर्यादित व ठराविक वेळेला. झोप वेळच्यावेळी. व्यसन नाही. व्यायाम पुरेसा व वेळच्यावेळी. स्वभाव हसरा happy go lucky. एक दिवशी दुकानातून आले. दुध घेऊन फिरायला बाहेर पडले. कोपऱ्यावर वळले आणि खाली पडले. ओळखीच्या लोकांनी ताबडतोब दवाखान्यात नेले. पण काही उपयोग झाला नाही. हृदय बंद पडून मृत्यू. Heart attack नव्हे , heart fail..! हा नियमितपणाचा व बिनचूकपणाचा परिणाम ?
३. मंदा आजी वय ७४ वर्षे. वजन प्रमाणाच्या दुप्पट. गेली १० वर्षे पक्षाघाताने अंथरुणाला खिळून. मधुमेह आहे. उच्च रक्तदाब आहे. अनिमिया आहे. सुदैवाने एकत्र कुटुंब असल्याने सुश्रुषा करण्यारया ३-४ स्त्रिया घरात. झोपून बेड सोर्स झालेले. सुश्रुषा करणारेही मनोमन घाईला आलेले. ३-४ वेळा डॉक्टरनि ‘नातेवाईकांना बोलावून घ्या’ म्हणून सांगून झालेले. आजी यमाच्या दारातून ४ पावले परत. आलेले नातेवाईक २-४ दिवस वाट पाहून परत गेले. अखेर ७६ व्या वर्षी सर्वांचा अंत पाहून पाहून व स्वत:हि यातना भोगून भोगून आजी (एकदाच्या ) गेल्या. यावेळी नातेवाईक खात्री केल्यानंतरच आले..
मृत्यूची अशी रूपे पाहिली कि वाटते..
1. मृत्यूचे हे नियोजन कसे होते ? याला काही नियम आहेत का ? असतील तर कोणते ?
2. सुनियमित विश्वात हि उदाहरणे अनियमित वाटत नाहीत का ? याचे गणित ( असेल तर ) अजून माणसाला समजलेले नाही.
3. वेळ आली म्हणजे मृत्यू बोलावून नेतो हे खरे वाटते
4. आणि वेळ आल्याशिवाय मृत्यू नेत नाही हेही तितकेच खरे.
वाचने
6583
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक धागा.
जीएची राणी कथा आठवली
>>>1. मृत्यूचे हे नियोजन कसे
आपला प्रतिसाद आवडला
In reply to >>>1. मृत्यूचे हे नियोजन कसे by प्यारे१
प्रतिसाद संपादित केलात,
In reply to >>>1. मृत्यूचे हे नियोजन कसे by प्यारे१
हम्म...
१००%सहमत
In reply to हम्म... by दादा कोंडके
प्रोबॅबिलीटी , रँडमनेस वगैरे माणसाला पटत नाहीत
In reply to हम्म... by दादा कोंडके
तसं नाही चितळे साहेब,
In reply to प्रोबॅबिलीटी , रँडमनेस वगैरे माणसाला पटत नाहीत by रणजित चितळे
व्हिडो...
In reply to तसं नाही चितळे साहेब, by दादा कोंडके
व्हिडो छानच...
In reply to व्हिडो... by वपाडाव
हम्म...
In reply to व्हिडो छानच... by दादा कोंडके
जास्त पावसाळे पाहिले नसल्याने
In reply to हम्म... by वपाडाव
साहिर
अजून एक
In reply to साहिर by चिरोटा
लीना बै, हे काय चाललंय ?
दासबोधातील अधिभौतिक , अधिदैविक, व आध्यात्मिक
In reply to लीना बै, हे काय चाललंय ? by चौकटराजा
गुरुक्रुपेने भोग नष्ट होतात
In reply to दासबोधातील अधिभौतिक , अधिदैविक, व आध्यात्मिक by सस्नेह
जिंदगी एक सफर है सुहाना यहा
द फायनल डेस्टीनेशन !! जरूर
कळवीन
ह्या विचार करण्याच्या आहेत का ?
( अनीस वाले दाभोळकर किंवा
एक जुना लेख
गोष्ट जुनी आहे
:(
(अंतु बर्व्याच्या आवाजात
मस्त प्रतिसाद!!
In reply to (अंतु बर्व्याच्या आवाजात by मराठे
=)) =)) =)) =)) मला ही उसळ
In reply to मस्त प्रतिसाद!! by पिवळा डांबिस
प रा धि न