" ....आभास.... "
हळुवार ...
हळुवार येशील आयुष्यात ...अस कधी वाटलच नव्हत ..
मनाच्याही मनातल सांगशील असही कधी वाटल नव्हत ..
स्पर्शाची भाषा ..सहवासाच जग ..मला कधी अनुभवायला मिळेल असही कधी वाटल नव्हत ...
पण तू आलास आयुष्यात असाच अगदी हळुवार ..पावलांचा आवाजही न करता .....
बर्याच दा मागे वळून पाहिलं ..पण तू कधी दिसायचास ..तर कधी ओझरता तुझा भास व्हायचा ..
मला कळायचच नाही ..मला नक्की कशाचा भास होतोय ..तुझा कि तुझ्या श्वासांचा ..
सतत चाहूल लागायची कि चालताना बोलताना .तू माझ्या जवळ आहेस ..
तुझ्या पावलांवर माझ पावूल पडतंय ..तुझ्या चेहेर्यावर माझी सावली पडतेय ..तुझ्या पापण्यात माझी आठवण साठ्तेय ....
पण खरच तुझा मला इतका भास होतो का?.....
होतो ...मला तुझा भास होतो .........
बरोब्बर एक वर्ष झाल तू मला भेटला होतास ..अगदी पहिल्या भेटीत नाही ,पण दुसर्या ..
तिसर्या भेटीतच तुझ्याबद्दल खूप उत्सुकता वाटू लागली ..
काय होत तुझ्यात अस माहित नाही ..कधी कळलच नाही ..नकळत ..अगदी चुकुनच ..
चुकीची वाट पकडूनच तुझा ,माझ्या आयुष्यात प्रवेश झाला ....
मी स्वताहाला मोहापासून बरच दूर ठेवल होत ..पण तुझ्या मोहिनिपूढे ..माझ बळ कमी पडल ....
कदाचित तुझ्या डोळ्यात ती जादू होती ...नसेल ..बहुतेक तुझ्या बोलण्यात ..
किवा मग ती तुझ्यातच ...मी मात्र वाहात गेली तुझ्या शब्दांच्या प्रवाहात ........
सुरुवातीला तुही बरेच आढेवेढे घेतलेस ..कधी अबोला धरलास तर कधी बोलायला भाग पाडलस ..
मग माझ्या बोलण्याकडेही दुर्लक्ष केलस ..
पण मी ..मी मात्र अश्या ठिकाणी जावून पोहोचले ..जिथून मागे फिरताही येत नव्हत ..अन पुढे जायला भीती वाटत होती .
भीती ह्याची कि ..मला शेवटच माहित नव्हता ..
किवा त्या ' शेवट 'ह्या शब्दाचीच भीती वाटत होती ........खर सांगू का ..पण तुझ्यात अडकून रहायचं होत ,गुंतून रहायचं
होत .......
हा गुंताही असा काहीसा घट्ट करायचा होता कि तुलाहि कधी सुटू नये ......
त्या गुंत्यात मग आठवणीतले क्षण ....अनुभवलेला सहवास ....कधीतरी मग शब्दांनीही अंगावर उठणारे अबोल शहारे ....
पापण्यांची हलकीशी होणारी उघडझाप ..त्यात्नच चोरून तुला बघणारी माझी नजर ..
माझे तुझ्यासाठी तुझ्याच मनावर उमटणारे शब्द ....ह्यांच जाळ मला विणायचं होत ..आणि झालही तसच .हे सगळ
नकळत होत गेल .....
समजण्या आधीच मी पार नकशीकांत बुडून गेले ..
तुला त्याचा गंधही नव्हता ..कि कुणीतरी इतका जीव लावतंय ..इतक वेड होतंय आपल्यासाठी ...
तुझा स्वभावच होता .....कधीही कुठल्याच गोष्टीला प्रतिक्रिया न देण्याचा ..शांत राहून ..माझी तळमळ बघण्याचा ......
माझ्या मनातले शब्द .. कागदावर उमटवन्याला तूच तर कारणीभूत झालास ..
तुझ्या ह्याच स्वभावाने मला तुझ्याकडे खेचल ..मी तुझ्याकडे आले ..अशी आले कि परत जाण्यासाठी मागे एकही मार्ग
शिल्लकच राहिला नाही ..
पण ..पण मग मी आभासी जगात जावून पोहोचले ... तू नसतानाही असल्याचा भास ...तूझ्या आभासी जगात माझा वावर ..
तू जवळ नसतानाही तुझ्या श्वासातली उब देखील मला जाणवू लागली ....
तू सोबत नसतानाही ..तू अगदी बरोबर चालतोयस ..क्षणा क्षणाला माझ नाव घेवून माझ्याशी बोलतोयस ..असले भास ........
ह्या भासातच जग जगू लागले मी ....
आभासी जग ..अतिशय नितळ आहे ..ज्याला शेवट ह्या शब्दाचा अर्थ माहित नाही अन निर्मळ हा शब्द त्याच्या यादीतही
नाहीय ....
शेवट ह्यासाठी माहित नसेल ..कि बहुतेक ह्या जगातून बाहेर पडण्यासाठी आपली स्वतःची मानसिक तयारी होत नसेल ..
आणि निर्मळ ह्यासाठी यादीत येत नसेल ..कि बहुतेक ..लोक ह्या जगाला ..
ह्या भास होण्याला वेडाच नाव देतात .....म्हणून असेल ..
पण खरच हे एक वेडच आहे ..वेड्या राधेलाही म्हणे कृष्णाचे भास व्हायचे ....... सागरालाही लाटांच्या जिवंत होण्याचा भास
होतो म्हणतात ...
क्षितिजावर धरणीला आभाळाच्या स्पर्शाचा भास होतो ..असही ऐकलय ......हम्म कवितेतच ऐकलय..पण अर्थ लावताना
किती सुंदर वाटल ..हे शब्दात नाही सांगता यायचं .....
त्या शुभ्र चान्दनिलाही खूपदा चंद्राच्या कुशीत शिरावस वाटत ..पण तिला नाही जमत ..
रात्रीलाही पहाटेच्या सोबत कितीदा फिरावस वाटत ..
पण तिलाही नाही जमत .....किनार्यालाही धावत येणाऱ्या लाटेला मिठीत घेवून तिला सोडावंसच वाटत नाही .
.."थोड ..अजून थोड.. थांब "
म्हणत म्हणतच हात सोडावा लागतो ..मग का त्या लाटेला त्याच्याजवळ थांबता येत नाही ??
क्षणिक सुखाच आमिष दाखवत दहादा मिठीत येन अन त्याला दूर लोटन ..किती योग्य आहे ?........
पण नक्की कुणाला कुणाचा कितीसा सहवास .....
कितीसा स्पर्श आनंद देवून जाईल सांगता नाही येत ....
ह्याच आभासात मीही अडकलीय रे ..बाहेर निघताही येत नाहीय ...कधी कधी मग वाटून जात का यायचं बाहेर ....
स्वताहून तर आलोय ..कुणी जबरदस्ती केली होती का?..
तुझ हसन ..तुझ बोलन ..तुझ चिडण ....तुझ वैतागण ..अगदी तुझ्या चेहेर्यावरचा निरागस खोडकर पणाही ..
तू नसतानाही माझ्या भोवती असतो ..
मग तू आहेस ..जवळ आहेस ह्या कल्पनेतच मी रमून जाते ...
तुला कधीच ह्याची जाणीव झाली नसेल ..पण मला मात्र क्षणाक्षणाला होते .....परवाचीच गोष्ट .... रस्त्यावरून चालताना
सहजच अंगावर रोमांच आले ..आधी वाटल ,हवेतल्या गारव्याच्या खोड्या ह्या ..
पण नाही ..मग एक ओळखीचा स्पर्श ..एक मखमली मोहोर अंगावर आला ... हळूच मागून येवून तुझ्या मिठीतले
ते क्षण पुन्हा , माझ्या श्वासातल्या वेगाशी खेळू लागले .....
काही कळायच्या आत माझ्या पापण्यांच्या तळाशी तुझ्या ओठातले शब्द सजून गेले ..
कानावर तुझ्या ओठांची हलकीशी कुजुबुज झाली...
अगदि त्या कुजबुजन्याचाहि स्पर्श ..असंख्य पावसाच्या थेम्बापरी ..शहार्यांचा पावूस पाडून गेला ...
मी इतकी कावरी वाबरी झाले कि कळलच नाही ..काय झाल ते ..मग क्षणात सगळ सुटून गेल ......
'बेधुंद नजर '..काहीवेळा पूर्ती स्वतःच भान हरवून बसली होती ......
तिलाही अगदी पूर्ववत होताना काहीश्या वेदना जाणवल्या असतील ... .......
मला सवय जडलीय का रे ह्या आभासाची ? तू नसतानाही तुझ्यात रमण्याची ? तू आहेस ..तुझा सहवास आहे ..
ह्या कल्पनेला जिवंत करण्याची ? मग ह्या कल्पना जिवंतही होतानाचा भास का होतो मला?..
मी का ह्या मृगजळाला हातात पकडण्याची , त्यावर जीव गुदमरून जाईल इतक घट्ट पकड ठेवण्याची चूक करते ?....
म्हणजे माझे भास ..माझ्या कल्पना ..माझ जग ..हे मृगजळा सारख आहे ,
ह्याचीही जाणीव मला आहे ...पण मग ..मग का ...?
कसे असतात ना हे प्रश्न ..अर्ध आयुष्य तर पोखरून खातात . उत्तर शोधायची ,
त्यांचा अर्थ लावायची सवय लावून जातात ....
त्यापेक्षा माझे भास बरे ..निदान काही क्षण तरी मनाच समाधान करून जातात ....
काल संध्याकाळी नदीच्या किनार्यालगत असणारी..झाडांच्या सावलीन झाकलेली पावूल वाट उगाच तुडवत होती ..
तेव्हाही असच ......
माझ्यासोबत तुझी पावल चालत होती , अगदी हातात हात घालून ...
क्षणभर माझ्याकडे बघत तुझी नजर माझ्याशी बोलत होती .....ओठांवर तुझ्या ,माझ्याच शब्दांची सांगड होती ..
मलाही तेव्हा तुझी सोबत हवीहवीशी वाटली होती ......
खर सांगू .....मी तुझा सतत विचार करते ...अगदी सूर्याच पहिलं किरण.... येताना माझ्यासाठी तुझ्या रोज नव्या विचारांच
गिफ्ट माझ्यासाठी घेवून येतो ..आणि जाताना ...दिवसभर साठवलेली उर्जा तो रात्रीला देवून जातो ...एका निरोपासकट .
रात्र ती नव्या विचारांची उर्जा ...माझ्या स्वाधीन करून जाते .....मग पुन्हा नव्या नव्याने माझ आभासी जग तुझ्या विचारांनी
मोत्यांच्या माळा सजाव्यात तस सजत ...
वेडी आहे , मी खरच वेडी ...पण हे खरय ..तुझे आभास होतात ..तुझी जाणीव होते ..तुझा सहवास मिळतो ..
तुझा स्पर्श कळतो ........
तुझी नजर समजते ..तुझे शब्द उमगतात .....
काळजाच्या अंतरातही तुझ्या भावना ..माझ्या सवेदनांशी नात जोडतात .....आवाजाशिवाय मिळणारी तुझी हाक ...
स्वप्नांशिवाय दिसणारा तुझा चेहेरा ..प्रश्नांशिवाय मिळालेलं तुझ उत्तर सारच माझ्या आभासाच्या जगात मुक्तपणे
विहार करताना दिसतात .....
कधी वाटत तुलाही सांगाव ..थोड माझ्यासारखं जगून बघ ........मला डोळ्यातल एक छोटस स्वप्न बनवून बघ ...मला
हृदयातल्या स्पंदनाच रूप देवून बघ ... पण ..पण मग नको वाटत ..
वाटत ह्या भासानी तुला आनंद न देता ..छळल तर ....आणि त्या भासांपासून सुटका करून घेण्यासाठी ,
तू माझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतलास तर ...? नको , त्यापेक्षा माझ जग माझ्यासाठीच .....
तू तिथे येवून जावून रहा ..पण ह्या जगाशी कायमचा संबंध नको ......
मनातल्या आठवणींच्या घड्या घालताना , त्याना सावरून ठेवताना , मनाचा स्वतःचाच पसारा नकळत वाढतो ...
अन मग आवरण्याचा प्रयत्नही फसतो ......
मुक्तपणे जगताना , काही गोष्टींच भान ठेवायला हव होत , पण काही धुंद क्षणात आपलाही तोल जातो ......
आणि मग जगण्याचा दृष्टीकोन आपोआप बदलतो ..
मला आता सवय झाली ह्या जगात भटकण्याची ....लोकान कडन " वेडी आहे " अस म्हणून घेण्याची .......
" भास होतात हिला , हिच्याच जगात असते " अश्या काही बोलण्याची ..
पण खरच ...खरच भास होतात ..मला तुझे ..तुझ्या असण्याचे भास होतात ......
**************************************************************
पूजा ...
मनातल शब्दात मांडण्याचा एक प्रयत्न ....
याद्या
6403
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
मनातल शब्दात मांडण्याचा एक
ठीक प्रयत्न आहे. फक्त
घोरणे आणि विरामचिन्हे
In reply to ठीक प्रयत्न आहे. फक्त by मस्त कलंदर
(No subject)
In reply to घोरणे आणि विरामचिन्हे by कपिलमुनी
मनाच्याही मनातल सांगशील हे
ह्म्म पन इथे लिहिताना खूप
http://www.misalpav.com/node/
In reply to ह्म्म पन इथे लिहिताना खूप by जेनी...
http://www.google.com/transli
In reply to ह्म्म पन इथे लिहिताना खूप by जेनी...
पहिला मुक्त कथन चांगले होते.
फारच स्वप्नाळू..! दोन
फारच स्वप्नाळू..! पुजा बाई
In reply to फारच स्वप्नाळू..! दोन by प्राजु
पण मी ..मी मात्र अश्या ठिकाणी
पूजा'जी... मनातल्या सुन्दर
In reply to पण मी ..मी मात्र अश्या ठिकाणी by पियुशा
लिखान आवडले.. स्वताच्या
ह्या अश्या मुलांच्या मागे
In reply to लिखान आवडले.. स्वताच्या by गणेशा
गवी , सहमत आहे .कस एक्दम
In reply to ह्या अश्या मुलांच्या मागे by गवि
तसा नाय रे!
In reply to गवी , सहमत आहे .कस एक्दम by पक पक पक
गणेशा ++१००
In reply to लिखान आवडले.. स्वताच्या by गणेशा
हे बाकि पटल बुवा...
In reply to लिखान आवडले.. स्वताच्या by गणेशा
खूप गोड आणि
मस्त!
मस्त!!
कंटाळा आला
+ १
In reply to कंटाळा आला by आदिजोशी
तेरी आंखोसे आज मै खुदको देखना
हम्म...
चर्चासत्र
आणि हो त्या ' स्वप्नाळु '
.....
हे माझ्या प्रेमजीवनाचे सार
प्रचंड स्वप्नाळु आणि
हे तर अगदी कणिक चाळताना
In reply to प्रचंड स्वप्नाळु आणि by ५० फक्त
पुजा बाय !