Skip to main content

बेडसे लेण्या.....

लेखक मनराव यांनी मंगळवार, 14/02/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस बेडसे लेणी पाहुन येण्याचे मनात होते पण योग जुळुन येत नव्हता. मित्राला शनिवारी फोन करुन विचारलं तर तो चालेल म्हणाला आणि अखेर या रविवारी तो (योग) आला. लेणी जवळच असल्यामुळे भल्या पहाटे उठुन जाण्याचा प्रश्नच नव्हता. असो सकाळी ९.०० ला घरुन निघालो आणि ९.४५ ला आम्ही लेणीच्या पायथ्याशी होतो. वर चढुन जाण्यासाठी पुरातत्व खात्याने साधारण दहा वर्षापुर्वी नीट नेट्क्या पायर्‍या केलेल्या आहेत आणि त्या अजुनही शाबुत आहेत...... फार काही दमणुक न होता १५ मिनीटात वर पोहोचलो. हि लेणी तशी फार काही कार्ल्या भाज्या सारखी प्रसिद्ध नसल्यामुळे इथे गर्दी अजिबात नसते. शांत आणि प्रसन्न वातावरण. वर चढताना आणखी एक व्यक्ती लेणी पाशी आहे हे कळत होते. वर पोहोचताच क्षणी त्यांनी थांबवलं आणि पोलीसी स्टाईल मधे प्रश्न केला "कुठुन आलात ??" उगाच माज दाखवतोय अस वाटुन मि पण मग त्याच माजाने जाता जाता त्याच्या कडे न बघता उत्तर दिलं आणि पुढे निघुन गेलो. आमच्या पाठोपाठ तोही आला आणि त्याने काहीही न विचारता जरा नरमाईनेच लेणी बद्द्ल, तिच्या इतिहासा बद्द्ल एकदम नीट सांगितलं. त्यात या लेण्या साधारण २२०० वर्षा पुर्वीच्या आहेत अशी माहिती मिळाली. बोलता बोलता कळलं कि त्यांना पुरातत्व खात्याने देखभाली साठी नेमलं आहे. असो या स्तुपाचं काम बहुतेक अर्धवट सोडुन दिलं आहे.. लेणी प्रवेशाला रांगोळी सारखं नक्षी काम.. थोडं खराब झालं आहे. लेणीतील खांब.. असे चार खांब आहेत. चारही खांबांना बुंध्याला माठाचा आकार आहे आणि सगळ्यात वर हत्ती, घोडे, बैल आणि त्यावर बसलेले स्त्री पुरुष असं कोरिव काम आहे. माठाचा आकार. पिंपळाच्या पानाचा आकार. लेणी पुर्वाभिमुख आहे. त्यामुळे सकाळी लवकर गेलं तर या वरील भागातुन सुर्याची किरणे स्तुपावर पडलेली पहायला मिळतात. हि दगडी खिडकी. आत जाताना चोकटी वरचं नक्षीकाम. एक पाकळी दोन फुलांसाठी. स्तुप मधल्या दोन खांबाच्या वरच्या भागाचा आतुन काढलेला फोटु. खांबाचा वरचा भाग ब्राम्ही लिपी तील शिलालेख: "सामाधानिका नावाच्या राणीने पाण्याच्या टाक्या बांधल्या " ध्यान करण्यासाठी बांधलेल्य चौदा खोल्या खोली बाहेरील नक्षीकाम. साधारण तास दीड तास हे सगळं पाहुन अम्हि परतीच्या वाटेला लागलो.

वाचने 5645
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

बेडसे लेणि बघायला कसं जायच याचीही थोडी माहिती दे ना :)

In reply to by मी-सौरभ

सौर्‍या, तुझ्या घरापासून जवळच आहे की रे. कामशेतवरून पवनानगरकडे वळ. साधारण ८/९ किमीवर करूंज गावाजवळ बेडसे लेणीकडे अशी पाटी दिसेल. तिथून १/२ किमी आहेत फक्त.

In reply to by मी-सौरभ

आम्हाला तुझी लाज वाटते.. अरे तळेगावात राहुन तुला एवढी साधी गोष्ट माहित नाही .. पवना डॅम ला मजा करायला जाताना डोळे उघडे ठेवले असतेस तर ही वेळ आली नसती ...

मस्त रे मनराव. बेडसे तशी बर्‍यापैकी जवळ असूनही तिथे फारसे कुणी जात नाही. पण ही लेणी आहेत अगदी अप्रतिम. प्रवेशमार्गातले ते दोन स्तंभ तर अतिशय भव्य. मुख्य चैत्यगृहाबाहेरील जे लहान लहान स्तूप आहेत ते तिथल्या प्रमुख धर्मगुरुंच्या स्मरणार्थ बांधले जात. मुख्य स्तूप हा प्रामुख्याने बुद्धस्मरणार्थ बांधला जाई. तू जो पाण्याच्या टाकीवर असलेल्या शिलालेखाचा उल्लेख केला आहे त्यात लिहिले आहे की महाभोजाची कन्या, आपदेवणकाची द्वितीय पत्नी असलेल्या महारठी (का महारथी?) समादिनिकेने हे दान दिले आहे. त्या बाहेरच्या लहान स्तूपावर पण एक कोरीव लेख आहे तो असा-जो मूळचा मारकूडचा रहिवासी आहे आणि ज्याने वनवास स्विकारून संन्यस्त जीवन जगत आहे त्या गोभुतीच्या स्मरणार्थ हा स्तूप कुणा भट्टाषाढमित्राने बांधलेला आहे. (मारकूड हे बेडसे चे प्राचीन नाव.) बेडसे लेणीचा आमचा धागा येथे पहा.

In reply to by प्रचेतस

तुम्ही या लेण्यांविषयी जे काही सांगितलं ते तर आवडलंच... पन विशेषत: तिथे पुरातत्व विभागातील एक माणुस देखभालीसाठी नेमला होता हे ऐकुन एकदम गार्डन गार्डन झालं बघा... कारण, इतिहासाची साक्ष देणार्‍या वास्तु जपायला हव्यात हे हळुहळु का होइना अंमलात आणल्या जात आहे... मी इकडे पर्भणीत जुन्या वास्तुंची होणरी डागडुजी व देखभाल पाहिली अन असे वाटले की आपल्या देशातही हे सगळे केले जाउ शकते... फक्त प्रशासनाने थोड्या फार प्रमाणात लक्ष दिले पाहिजे... अथवा "शिवदुर्ग संवर्धन" सारख्या गैरसरकारी संस्थांच्या तर्फे राबवले जाणारे अनेकानेक उपक्रम घडुन आले पाहिजेत... ज्यामुळे इतिहास व स्थळांचे सौंदर्य दोन्हीही जपले जाइल... हे प्रबोधन असेच घडत राहो ही इ.प्रा... (आता काही लोक याला झैरात म्हणाले तरी चालेल)
बेडसे लेणीचा आमचा धागा येथे पहा.
तवा गरम आहे तोवर आपल्या भाकर्‍या भाजुन घेताय का वल्लीशेट...

मस्तच रे. फोटो जरा ब्लर झालेत; नाहीतर अजुन मजा आली असती. वल्लीने दिलेल्या माहितीने ज्ञानात भर पडली.

In reply to by पाषाणभेद

हेच बोल्तो.

सहल आवडली. बाकी ते स्त्री पुरुष म्हणजे शंकर पार्वती असावेत काय ?

आवडली लेणी .. धागा मस्त आणि एक .. शनिवारी मी लोहगड/बेडसे/ कार्ला असे कुठे तरी जायचे ठरवत होतो , नेमका मित्र रहित झाल्याने एकटाच कार्ल्याला गेलो होतो .. फोनवायला पाहिजे होते...

वा मनराव.फोटो एकदम अप्रतिम काढले आहेत.आवडले आपल्याला,,,फार छान आहेत...फोटो व लेणी सुद्धा...मस्त मस्त मस्त :-)

मस्त फोटो आले आहेत मनराव. लोहगडला जातेवेळी घरातूनच उशीरा निघाल्यामुळे बेडसे लेणी पाहता आली नाहीत, पण आता पुढच्या वेळी नक्की पाहणार.

कार्ल्याइतक्या प्रसिद्ध नसलेल्या लेण्यांची ओळख आवडली. फोटोही छान!

लेण्यांची सर्वच छायाचित्रे उत्तमच घेतलीत. वल्लींच्या नंतर आलेले लिखाण असल्याने आणखी माहीती (लेण्यांच्या संदर्भात आणि प्रवासमार्गबद्दल) असायला हवी होती. तरीही तुमच्या लिखाणामुळे तेथील वातावरण जणु प्रत्यक्षच अनुभवतो आहोत असेच वाटले.

त्या पोलिसी स्टाईल ने प्रश्न विचारणाऱ्या पुरातत्व खात्याच्या माणसाचं नाम वसंत दहिभाते पायथ्याशी असलेल्या गावात अनेक दहिभाते राहतात त्यापैकीच हे एक.