अमराईतला निवडुंग,
डुबुक डुबुक डुबुक डुबुक,
डराव डराव डराव डराव,
काव काव काव काव,
म्याव म्याव म्याव म्याव,
तडतड ताशा, धडधड गाज,
ढोल वाजतो मठ्ठ स्वरात,
वृषभ त्वचा ही पॉवरबाज,
वॄषोदर उतरे माडी आज,
पंकज भार्या जगास तारी,
मोहनमर्कट वन्दा भारी
वृषणे ठेचा घाला दोरी,
मंडुकरावही चाबुक मारी,
पिवळा शेंबुड वाहे भळभळ,
अश्वथामा करतो जळजळ,
तरुणाईची बिभित्स सळसळ,
गाभार्यातील पिसाट वळवळ,
गुरुवर्यांना सुटते खाज,
गुरुकुलातला नंगा नाच,
ज्ञानरज्जुला पतंग माज,
शरपंजरीवर मदीरा पाज,
जगणे थोटे, सारे खोटे,
नर्मदेतले दगड गोटे,
लोचट कुत्रा पायही चाटे,
जनमृत्युचे घालत खेटे,
रामाला शरयूने गिळले,
शामराव बाणाने निमले
या सार्यातुन इतके कळले
आपण मेलो जग बुडाले,
डु....बु....क...., ड....रा....व....,
का....व...., म्या....व....,
लावत ठिगळे लंगोटीला,
बुवा हसतो गुढ जगाला,
पैजारबुवा,
अप्रतिम हो पैजारबुवा.
रामाला यमुनेने गिळले, शामराव
गलतीसे मिष्टेक हो गया
मस्त
कविता जबरदस्त शांतरस तर
याक नंबर ओ पैजारबुवा आवडेश
वा.. वा.. चान.. चान..
वाहवा.
छान रचना . मर्ढेकर ष्टाईल !
+१
अगदी हेच म्हणायचे आहे
शरदिनी तै कुठे असतात हो?
ओहो!
एकच नंबर बुवा