कुंदनच्या आग्रहाखातीर....
साहित्य:
मेथीची पालेभाजी बारीक चिरलेली - २ वाटी
शेंगदाणे - १/२ वाटी
हिरवी मिरची - ६ ते ७ (चवीनुसार)
लसुण पाकळ्या - ५ ते ६
कोथिंबीर - बारीक चिरुन आवडीनुसार
फोडणी साठी - जिरे, मोहरी
मीठ चवीनुसार
तेल
कृती :
शेंगदाणे व मिरच्या कढईत थोडे तेल गरम करुन खमंग भाजुन घ्याव्यात. भाजलेल्या मिरच्या, शेंगदाणे , कोथिंबीर, लसुण पाकळ्या, जिरे एकत्र मिक्सरवर बारीक वाटण करुन घ्यावी.
कढईत तेल, मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यात वरील वाटलेली चटणी घालुन तेल सुटेपर्य॑त परतावे. त्यात मेथीची बारीक चिरलेली भाजी टाकुन २ मिनीटे चांगले परतावे. त्यात रस्स्यासाठी जरुरी प्रमाणे गरम पाणी व मीठ घालुन एक उकळी आणावी. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकुन गरम गरम पोळी किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
टिप - अशाप्रकारे आपण गवार, वांगी, दोडका, ढेमसे, बटाटा, चवळी, वाल, सांडगा याची भाजी करू शकतो. फक्त भाज्या फोडी करून शिजवून किंवा वाफवुन घ्याव्यात.
मिसळपाव
खरच चांगली लागते..
जबरी!
योगिता ताई
छान पाककृती.
सह्ही