किल्ले रामशेज
किल्ले रामशेज- नाशिकपासून अवघ्या १५ किमीवर. दिसायला तसा छोटेखानी, अगदी एखाद्या टेकाडाएव्हढाच. पण त्याला संरक्षण आहे ते चहुबाजुंनी असलेल्या कातळकड्याचे. याच भक्कम नैसर्गिक तटबंदीच्या जोरावर आणि यावरच्या मूठभर मावळ्यांच्या मनगटाच्या ताकदीवर हा किल्ला मोगलांच्या राक्षसी सैन्यबळापुढे तब्बल साडेपाच वर्षे झुंजला.
रामशेजला जाण्यासाठी आम्ही नाशिकवरून सकाळीटे साडेसहालाच निघालो, नाशिक-वणी रस्त्यावर असलेल्या किल्ल्याच्या पायथ्याच्या आशेवाडीत जेमतेम अर्ध्या तासातच पोहोचलो. रामशेजची कातळटोपी लक्ष्य वेधून घेत होती.
गावातूनच किल्ल्याची चढाई चालू होते. किल्ल्याची पायवाट किल्ल्याला वळसा मारून पाठीमागच्या बाजूने वर वर चढत जाते. उजवीकडे दरी आणि डावीकडे किल्ला यांमधून अरूंद अशी ती वाट पुढे सरसरत जाते.
१. आशेवाडीतून दिसणारी गडाची कातळटोपी
२. गडावर वर चढत येणारा ट्रॅव्हर्स
३. ट्रॅव्हर्स
थोड्याच वेळात पुढे बांधीव पायर्या लागतात. पायर्या चढून जातात आम्ही थेट गडाच्या कातळाला भिडलो. गडाचा मूळ दरवाजा तिथेच कातळात बुजलेल्या अवस्थेत आहे. त्याशेजारूनच कातळ कोरून गडावर जाणार्या अरूंद पावठ्या खोदलेल्या आहेत. कातळाला लगटून ते चढून जातात कातळात अजून एक गुहा खोदलेली दिसते. गुहेत रामाचे मंदिर आहे व शेजारीच पाण्याचे टाके आहे. दरवाज्याची कातळकोरीव रचना, पाण्याचे अंतर्भागात खोलवर पसरलेले टाके यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा.
४. बांधीव पायर्या
५. कड्यातील मूळचा दरवाजा आणि राममंदिर
६. सातवाहनकालीन खोदीव टाके
७. भग्नावस्थेत असलेला गडाचा मुख्य दरवाजा
तिथून अजून काही पायर्या चढून जातात गडमाथ्यावर आम्ही प्रवेशतो झालो. समोरच्याच बाजूला एक गुप्त दरवाजा आहे. पलीकडच्या बाजूच्या तुटलेल्या कातळामुळे हा मार्ग तसा आज बंदच आहे, किंबहुना शिवकाळातही दोर लावूनच पलीकडे उतरता येत असावे.
थोडेसे पुढे चढल्यावर पाण्याची टाकी आणि कोरडाठाक तलाव लागतो, त्याच्याच जवळ देवीचे एक मंदिर पण आहे. तसेच पुढे गेल्यावर पाण्याची काही टाकी आणि घरांचे पडके अवशेष दिसतात. संपूर्ण गडाला कातळाचे आवरण असल्याने तटबंदी इथे अशी बांधलेली नाहीच. गडाच्या पलीकडच्या टोकापर्यंत जाऊन परत दरवाजापाशी येऊन समोरच्या पठारावर गेलो. इथे बर्यापैकी सपाटी असून काही अवशेष, ओहोरलेले पाण्याचे टाके व ध्वजस्तंभ आहे. गडमाथ्यावरून देहेरगड, भोरगड अगदी उत्तम दिसतो, दूरवर अजंठा सातमाळा रांगेतील अजस्त्र किल्ले सप्तशृंगी, धोडप, रवळ्या जावळ्या खुणावत असतात.
८. गडमाथ्यावर जाणारी वाट
९. समोरच असलेला चोर दरवाजा
१०. गडमाथा
११. ओहोरलेले पाण्याचे टाके
१२. काही अवशेष
१३. गडाची माची
१४. उजवीकडचा देहेर किल्ला आणि डावीकडचा सैन्याच्या ताब्यात असलेला भोरगड.
१५. पायथाची शेते
१६. वैराण प्रदेश
शिवाजी महारांजाच्या मृत्युनंतर औरंगजेबाची राक्षसी वावटळ दख्खन काबीज करण्याच्या हेतूने महाराष्ट्रात घुसली, त्यांचा वेढा पडला तो ह्या छोटेखानी रामशेजला. काही तासातच किल्ला जिंकून देण्याच्या वल्गना मोंगल सेनापतींनी केल्या. पण इथल्या मातीपुढे ते फिके पडत गेले. मूठभर शिबंदीनिशी इथल्या अज्ञात किल्लेदाराने तब्बल साडेपाच वर्ष किल्ला झुंजता ठेवला. अखेर रसद संपल्याने आणि राजेही दुसर्या मोहिमेत झुंजत असल्याने रामशेज नाईलाजाने मोंगलाच्या हवाली करावा लागला. पण मोंगलानाही रामशेजचं पाणी कळून चुकलं.
तासाभरात गडफेरी आटपून आम्ही उतरणीला लागलो. २० मिनिटातच परत पायथ्याला पोहोचलो. सकाळचे नऊ वाजत आले होते. पंचवटीच्या अंबिकाची मिसळ मनसोक्त चापून परत शहरातल्या रूक्ष वातावरणात आलो.
१९. गडावरून उतरताना
२०. आशेवाडीतून

याद्या
14387
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटू आणी माहीती...नेहमी
मस्त...
+१
In reply to मस्त... by वपाडाव
+१
In reply to मस्त... by वपाडाव
वप्याला अनुमोदन...... हे
In reply to मस्त... by वपाडाव
फटु एकदम झ्याक आल्येत हो
In reply to मस्त... by वपाडाव
अप्रतिम... फक्त ४५०-५००
जबरा, मा. संपादक मंड्ळ,
+१
In reply to जबरा, मा. संपादक मंड्ळ, by ५० फक्त
+२

वल्ल्या, लेका उगाच कुठेतरी
अगदी अगदी...त्याने पुरातत्व
In reply to वल्ल्या, लेका उगाच कुठेतरी by अन्या दातार
सगळे 'गड'करी नी गडकरी
जबरदस्त किल्ला आणि जबरदस्त
उत्तम माहिती
In reply to जबरदस्त किल्ला आणि जबरदस्त by मालोजीराव
मस्त ..
In reply to उत्तम माहिती by प्रचेतस
मस्त रे.......... आणखी एक
खुपच छान माहिती आणि फोटो!
ख ल्ला स !! अवांतर :
अप्रतिम पुन्हा एकदा .. आवडेश
सुदंर फोटो आणि माहीती.
मस्त वर्णन शिवाजी महाराजांचा
मुजरा!
मस्त
मस्तच
मस्त फोटो
In reply to मस्तच by स्वच्छंदी_मनोज
झाला का प्लान?
In reply to मस्त फोटो by प्रचेतस
म्हसरूळजवळची चांभार लेणी
प्लॅन करा??
In reply to म्हसरूळजवळची चांभार लेणी by स्पा
सौणेशा, त्याच्यापुढचं मी
In reply to प्लॅन करा?? by मी-सौरभ
फारच छान वर्णन आणि फोटो.
मस्त!