यावर्षी सुपरबॉल इंडियानापोलिसच्या लुकस ऑइल स्टेडियममधे खेळला जातोय. त्यामूळे पार्टीचा उत्साह वेगळाच!
यावर्षी पार्टीसाठी - ओवन बेक्ड ओनियन रिंग्ज!
साहित्यः
१/२ कप लो फॅट दही
१/२ कप ब्रेड क्रंब्ज
१/२ कप कॉर्न मिल
२ यलो ओनियन ( स्वीट ओनियन मिळाल्यास उत्तम)
१/४ चमचा मीठ
१/२ चमचा तिखट
थोडे तेल
तेलाचा स्प्रे
कृती :
ओवन ४०० फॅ. ला तापत ठेवावा. कुकी ट्रेला फॉइल लावून घ्यावी.फॉइलला तेलाचा हात लावावा.
कांद्याचे साल काढून त्याच्या साधारण १/४ इंचाच्या चकत्या कापाव्यात. या चकत्या हाताने वेगळ्या करुन त्यातील मोठ्या आणि मध्यम आकाराच्या रिंग्ज घ्याव्यात.
एका बोल मधे १/२ कप दही काट्याने फेटून घ्यावे. दुसर्या बोलमधे कॉर्नमिल, ब्रेडक्रंब्ज, तिखट, मीठ एकत्र करावे. यातील निम्मे मिश्रण बाजूला ठेवावे.
कांद्याची रिंग दह्यात बुडवावी. सगळ्या बाजूने दही लागले की काट्याने उचलून ब्रेडक्रंब्जच्या मिश्रणात टाकावी. बोल हलवून मिश्रण रिंगला लावून घ्यावे. दुसर्या कोरड्या काट्याने रिंग उचलून तयार ट्रेवर ठेवावी.
अशा सगळ्या रिंग्ज ट्रेवर लावाव्या.
साधारण एका कांद्यानंतर मिश्रणात गुठळ्या होतात. असे गुठल्या झालेले मिश्रण टाकून द्यावे आणि बाजूला ठेवलेले मिश्रण वापरायला घ्यावे. रिंग्जवर तेलाचा स्प्रे मारून ट्रे तापलेल्या ओवनमधे १५-१७ मिनिटे ठेवावा.
गरम गरम रिंग्ज बियर बरोबर सर्व कराव्या.

वाचने
7443
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान पाकृ! शेवटचा फटू आणि
कितीतरी दिवसांपासून माझ्या
छान पाकृ ..
वाह वाह......अप्रतिम !!!
लय भारी..
छान
डीप फ्राय केलेल्या ओनियन रिंग
>>अश्याच प्रकारे कांदाभजी
In reply to डीप फ्राय केलेल्या ओनियन रिंग by गणपा
चेष्टा नाय बे! त्ये गनपा काय
In reply to >>अश्याच प्रकारे कांदाभजी by सूड
तेच म्हणायचंय हो, गणपाभौने
In reply to चेष्टा नाय बे! त्ये गनपा काय by बिपिन कार्यकर्ते
काही म्हणा, चेपुवरचे फटु बघून
In reply to तेच म्हणायचंय हो, गणपाभौने by सूड
छान आहेत ओनियन रिंग्ज
हा प्रकार फार पूर्वी एकदा
खल्लास!
मस्तच.
धन्यवाद!
लै भारी पाकृ
सांडगे?
In reply to लै भारी पाकृ by कुंदन
पदार्थ छान!
गरम गरम रिंग्ज बियर बरोबर
वा मस्त.