उपीट / उपमा
उपीट / उपमा:
साहित्यः
१ वाटी जाड रवा, तूप, साखर, मीठ, भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, लिंबू/लिंबाचा रस, कढीलिंब, जिरे, हिंग, तेल
खालील गोष्टी ओप्शनलः
बारीक चिरलेली कोथिंबीर, खोवलेले खोबरे, काजू, शेव, फरसाण, शिजवलेले मटार
क्रुती:
थोड्या तूपावर रवा भाजून घ्या. एका कढइमध्ये तेल घेउन त्यात हिंग, जिरे घालून फोडणी करा. त्यात कढीलिंब, मिरच्यांचे तुकडे, शेंगदाणे घालून परता. मग काजू घालून परता. मग कांदा घालून तो लालसर होईपर्यंत परता. मग त्यात ३ वाट्या पाणी, मटार, टोमॅटो, मीठ, साखर व ४/५ थेंब लिंबूरस घाला. पाण्यास उकळी आली की त्यात भाजलेला रवा घालून चांगले हलवा. झाकण ठेवून उपमा शिजत ठेवा. शिजत ठेवताना त्यावर ४/५ चमचे तूप घाला.
उपमा शिजल्यावर त्यावर खोबरे-कोथिंबीर आणि आवडत असल्यास शेव/फरसाण घालून खा :-)

वाचने
16502
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
चान...चान अत्ता तेच खातोय
माझी आवडती डिश...
In reply to माझी आवडती डिश... by Mrunalini
सेम हियर. गपागप गिळता येतो.
लै भारी..आवडत्या नाष्त्यांमधे
साधी सोपी
In reply to साधी सोपी by पैसा
धन्स
छान
उप्पीट आणि उपमा हे दोन
In reply to उप्पीट आणि उपमा हे दोन by पाषाणभेद
पदार्थ एकच पण उपमा तमिळ आणि
In reply to पदार्थ एकच पण उपमा तमिळ आणि by प्रचेतस
+१
In reply to पदार्थ एकच पण उपमा तमिळ आणि by प्रचेतस
सांज्यात हळद असते वाटतं.
In reply to उप्पीट आणि उपमा हे दोन by पाषाणभेद
उपमा, उपीट, शिरा, सांजा
In reply to उप्पीट आणि उपमा हे दोन by पाषाणभेद
शांत गदाधारी भीम शांत.
बिनहळदीचा असतो तो उपमा, हळद घातल्यावर त्याचा सांजा बनतो.
तांदळाच्या पीठापासून फोडणी
ऐकीव, बघीव माहितीनुसार, उपमा:
मूळात ( वेदात
मस्त.... आवडता नाश्ता
अरेरे एका उपम्यावर किती
उप्पिट
वाह वाह !