✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जगात नक्की कोणत्या देशाचे चांगले चालले आहे?

प
पुण्याचे वटवाघूळ यांनी
Tue, 01/31/2012 - 13:21  ·  लेख
लेख
मिपाकरांकडून मला सतावत असलेल्या एका प्रश्नाचे उत्तर मिळेल ही अपेक्षा आहे. जगात नक्की कोणत्या देशाचे चांगले चालू आहे आणि तो देश येत्या काही वर्षात वर्चस्व गाजवेल? अमेरिका गेली अनेक वर्षे वर्चस्व गाजवत होती पण २००७-०८ पासून तिथे आर्थिक संकट आले आणि त्यातून ते पुरते सावरलेले दिसत नाहीत. इराक आणि अफगाणिस्तानातील युध्दांमध्ये त्यांचा वारेमाप खर्च झाला आहे.मध्यंतरी त्यांचे क्रेडिट रेटिंगही कमी झाले असे वाचल्याचे आठवते. युरोपात तर प्रश्न मोठाच आहे.अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या आहेत. बडा घर आणि पोकळ वासा अशी त्यांची अवस्था. त्यांचेही क्रेडिट रेटिंग कमी होतच आहे. चीनने मोठी प्रगती केली आहे हे मान्य पण ती प्रगती आपल्याच लोकांच्या शोषणावर केलेली आहे. अशी कोणतीच व्यवस्था चिरस्थायी असू शकत नाही. तसेच चीनमध्ये मधल्या काळात लोकसंख्या नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे वाईट परिणाम पुढील काही वर्षात पुढे येतील अशी चिन्हे आहेत कारण देशात तरूणांची संख्या कमी होईल आणि म्हातारे लोक वाढतील. आफ्रिका खंडात तर आनंदी आनंदच आहे. जपानमध्ये, युरोपातही लोकसंख्येचा हा प्रश्न आहेच. गल्फमधील तेल संपल्यानंतर त्यांना कोण विचारणार? आपल्या भारताचे म्हणाल तर वेगळे काही बोलायलाच नको. मग नक्की कोणाचे चांगले चालू आहे आणि कोणता देश येत्या काही वर्षांत वर्चस्व गाजवेल? (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ मी ऐसी अक्षरे या संकेतस्थळावर "पिसाळलेला हत्ती" या नावाने वावरतो.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4721 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

मग नक्की कोणाचे चांगले चालू

कॉमन मॅन
Tue, 01/31/2012 - 13:48 नवीन
मग नक्की कोणाचे चांगले चालू आहे आणि कोणता देश येत्या काही वर्षांत वर्चस्व गाजवेल?
काहीच कल्पना नाही.
  • Log in or register to post comments

"चांगले " ही फार Relative

बाळ सप्रे
Tue, 01/31/2012 - 14:01 नवीन
"चांगले " ही फार Relative term आहे. कुठल्या मुद्द्यावर चांगल वाईट ठरवायच.. (Economy/ population/ oil etc) आणि किती म्हणजे चांगले हे स्पष्ट करा General Statement हवे असल्यास "विकसित " देशात " विकसनशील" देशांपेक्षा बरे चालले आहे. आणि "विकसनशील"देशात " अविकसित" देशांपेक्षा बरे चालले आहे. :-) बाकी समर्थानी म्हटले आहेच "जगी सर्व सुखी असा कोण आहे ???"
  • Log in or register to post comments

"चांगले " ही फार Relative

बाळ सप्रे
Tue, 01/31/2012 - 14:02 नवीन
"चांगले " ही फार Relative term आहे. कुठल्या मुद्द्यावर चांगल वाईट ठरवायच.. (Economy/ population/ oil etc) आणि किती म्हणजे चांगले हे स्पष्ट करा General Statement हवे असल्यास "विकसित " देशात " विकसनशील" देशांपेक्षा बरे चालले आहे. आणि "विकसनशील"देशात " अविकसित" देशांपेक्षा बरे चालले आहे. :-) बाकी समर्थानी म्हटले आहेच "जगी सर्व सुखी असा कोण आहे ???"
  • Log in or register to post comments

सहमत

चिरोटा
Tue, 01/31/2012 - 14:07 नवीन
सप्र्यांशी सहमत. जर आपले चांगले चालले असेल तर देशाचे चांगले चालले आहे म्हणायचे. नाही म्हणायला विकसित देशांत लोक त्यातल्या त्यात सुखी असतात.
  • Log in or register to post comments

अंमळ जागा चुकल्याचे वाटते

यकु
Tue, 01/31/2012 - 14:10 नवीन
अंमळ जागा चुकल्याचे वाटते आहे. तुमच्या शहराच्या महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या कामगिरीवर नेमलेल्या इसमास याचे उत्तर पक्के ठौक असेल. इथे समाधानकारक उत्तरे ‍न मिळाल्यास त्या इसमास गाठावे असे विनम्रपणे सुचवितो.
  • Log in or register to post comments

चीनने मोठी प्रगती केली आहे हे

विजुभाऊ
Tue, 01/31/2012 - 14:20 नवीन
चीनने मोठी प्रगती केली आहे हे मान्य पण ती प्रगती आपल्याच लोकांच्या शोषणावर केलेली आहे. अशी कोणतीच व्यवस्था चिरस्थायी असू शकत नाही. तसेच चीनमध्ये मधल्या काळात लोकसंख्या नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे वाईट परिणाम पुढील काही वर्षात पुढे येतील अशी चिन्हे आहेत कारण देशात तरूणांची संख्या कमी होईल आणि म्हातारे लोक वाढतील ते घडायला अजून पन्नास एक वर्षे जावी लागतील. तोवर चीन चे बरे चालले आहे असे दिसते. भाम्डवलशाही ही सुद्धा लोकांच्या शोषणावर च उभी रहाते. प्रत्येक अर्थव्यवस्था ही कोणाच्यातरी शोषणावरच उभी रहाते. जर कोणीच कोणाचे शोषण करत नसते म्हणजे सर्वचजण एका विशिष्ठ आर्थीक पातळीवर असतील तर ती अर्थव्यवस्था मृत असते.
  • Log in or register to post comments

घोर निराशा

स्पा
Tue, 01/31/2012 - 14:23 नवीन
विजुभौंकडून अधिक विस्तृत उत्तराची अपेक्षा होती.. पण घोर निराशा झाली.. असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अधिक विस्तृत उत्तराची अपेक्षा

विजुभाऊ
Tue, 01/31/2012 - 18:04 नवीन
अधिक विस्तृत उत्तराची अपेक्षा होती चीन सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे त्य अमध्ये त्यांच्या कडे निर्णय घेणे आणि ते यशस्वीपणे राबविण्याची सक्षम यंत्रणा आहे. त्यामुळे जागतीक बाजारपेठेत चिनचे वर्चस्व राहील. जेथे निर्णय लवकर घेतले जातात तेच टिकतात. भारताची लोकशाही ही कोणतेच निर्णय घेऊ देत नाही. ते राबविणे हे अजूनच अवघड जाते. इतकी वर्षे आपल्याकडे विजेचा तुटवडा आहे मात्र त्यावर वीजनिर्मिती करणे सोडून इतरच मुद्द्यावर वाद घालत बसतो. एन्रॉनचा फटका बसला म्हणून त्यानंतर वीसवर्षे महाराष्ट्रात एकही वीजप्रकल्प निर्माण झालेला नाही. तीच गोष्ट बोफोर्स सारख्या सक्षम युद्ध सामुग्रीची. भारतात निर्णय क्षमता असलेले नेते नाहीत. ती आपली मानसीकता नाही त्यामुळे क्षमता असूनही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद सहन करत बसलोय. या बाबतीत चीन सर्वच गोष्टीत वरचढ आहे. लोकसंख्येवर त्यानी नियंत्रण आणलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काही काळाने लोकसंख्याबळ कमी होईल ही भीती निरर्थक आहे. कारण तो इफेक्ट दिसायला निदान ३० वर्षे जावी लागतील. सर्वच लोक म्हातारे असतील ही परिस्थिती यायला किमान ५० वर्षे लागतील. तोवर तंत्रज्ञान बरेच बदललेले असेल. जगाची आर्थीक /सामाजीक परिस्थिती बदललेली असेल. बदललेली नसेल ती भारताची मानसिकता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

जगात नक्की कोणत्या देशाचे चांगले चालले आहे?

इरसाल
Tue, 01/31/2012 - 14:26 नवीन
खान्देशाचे..........अजुन कोणाचे ?
  • Log in or register to post comments

सहमत आहे. काही खान्देशी लोक

बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/31/2012 - 14:31 नवीन
सहमत आहे. काही खान्देशी लोक खान्देशातून बाहेर पडल्याने ही ऊर्जितावस्था त्या देशास प्राप्त झाली असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

शालजोडीतले का काय म्हणतात ते

गणपा
Tue, 01/31/2012 - 16:06 नवीन
शालजोडीतले का काय म्हणतात ते हेच का हो बिका ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हुम्म्म्म.....

इरसाल
Tue, 01/31/2012 - 17:49 नवीन
मला लोण्याचा गोळा हि गोष्ट आठ्वली.;) खान्देशावर लै प्रेम दिसु र्हायल राव.:) द्या द्या ............तुमाला पावर हाय !!!!!!!!!! ( काही पुण्यवान लोक गुजरातेत जाताना खान्देशला पाय लावुन जातात त्यामुळेही चान्गले चालले असु शकते.;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सहमत

स्मिता.
Tue, 01/31/2012 - 17:55 नवीन
तरी काही पुणेकरांनी तिथे वारंवार जावून खान्देशाच्या ऊर्जितावस्थेला धक्का लावू नये अशी विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

वा वा ...

इरसाल
Tue, 01/31/2012 - 18:17 नवीन
+१०००००००० द्या टाळी........... आवडला प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

+१००००००

कुंदन
Wed, 02/01/2012 - 01:23 नवीन
+१०००००० असो , कधी तरी पुणेकराला चानस मिळालाय , त्याचा आनंद हिरावु नका. त्याला आपल म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

मेदिनीय ज्योतिष्य

मूकवाचक
Tue, 01/31/2012 - 16:41 नवीन
हा विषय मेदिनीय ज्योतिष्याचा आहे. कॉलिन्ग युयुत्सु ...
  • Log in or register to post comments

भूतान

कोदरकर
Tue, 01/31/2012 - 17:08 नवीन
भुतान मध्ये लोक समाधानी आहेत... त्यांचेच चांगले चालु आहे.....
  • Log in or register to post comments

आदेश चे खाउन पिवून वहिन्यांशी

पाषाणभेद
Tue, 01/31/2012 - 17:38 नवीन
आदेश चे खाउन पिवून वहिन्यांशी खेळ खेळून चांगले चालू आहेत.
  • Log in or register to post comments

उचलले बोट अन निघाले टायपायला...

वपाडाव
Tue, 01/31/2012 - 18:22 नवीन
पाभे... काही लिमिट आहे की नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

मीटर मंदी बसतय ना? मंग?

गणपा
Tue, 01/31/2012 - 18:29 नवीन
मीटर मंदी बसतय ना? मंग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मीटर मंदी बसतय ना? मंग?

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/31/2012 - 18:49 नवीन
मीटर मंदी बसतय ना? मंग? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

जगात नक्की कोणत्या देशाचे चांगले चालले आहे?.....

चेतनकुलकर्णी_85
Tue, 01/31/2012 - 19:06 नवीन
कोणत्याच देशाचे नीट नाहीये चालू..पण सर्व देशांच्या राजकारणी लोकांचे एकदम झकास चालू आहे....
  • Log in or register to post comments

Scandinavia

सौरव जोशी
Tue, 01/31/2012 - 21:40 नवीन
कमी-जास्त प्रमाणार आज सगळच जग विविध व्याधींनी ग्रस्त आहे. मग population, terrorism, financial crisis असो की political blunders. माझे वैयक्तिक मत जाते "Scandinavia" देशांना. Norway, Denmark, Sweden या देशांबद्दल फारसे नकारात्मक ऐकायला, वाचायला मिळत नाही. मी स्वतः या देशांमध्ये गेलोय आणि " त्यांचे नक्की चांगले चालले आहे" असेच वाटते.
  • Log in or register to post comments

एका स्विडीश मित्राकडूनही

रेवती
Wed, 02/01/2012 - 02:54 नवीन
एका स्विडीश मित्राकडूनही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. तो हिरव्या देशात फारसा आनंदी नाही पण बायको इथली असल्याने आणि मुले चांगली रमली असल्याने त्याने बृहनस्विडन मंडळात जायला सुरुवात केलिये (त्यांचा मोठ्ठा गृप आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरव जोशी

सौदी अरेबिया

हुप्प्या
Wed, 02/01/2012 - 06:47 नवीन
सौदी अरेबियाचे सगळे सुरळित चालले आहे. अमेरिका रक्षणाला कटिबद्ध आहे, तेल भरपूर निघते आहे. भाव चांगला मिळतो आहे. मधे मधे महिलांना कार चालवायला परवानगी द्या असे "नेत्रदीपक, पुरोगामी" उपक्रम राबवून तमाम माध्यमांवर इंप्रेशन मारायचे की झाले. बाकी चिंता नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पुण्याचे वटवाघूळ
Wed, 02/01/2012 - 13:01 नवीन
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. एकूणच पुढील पिढीला चिनी भाषा शिकावी लागणार असे वाटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा