एक बहारदार जुने गाणे
कधीकधी पूर्वी ऐकलेले एखादे गाणे मनात पुन्हा अचानक उतरते. मग ते काही दिवस मनात घर करून बसते. तसे मला अलिकडे मालती पांडेंच्या 'कशी रे तुला भेटू' ने वेढले आहे.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Kashi_Re_Tula_Bhetu
सुमारे १९४५ नंतर मराठीत भावगीतांचा नवा जमाना आला. ह्याची सुरूवात गजानराव वाटवे ब बबनराव नावाडीकर ह्यांनी केली. नंतर इतर अनेक कवि/ कवयित्रींच्या रचना घेऊन, अनेक नवनव्या गायिकांसह इतर संगीतकार त्यात उतरले. त्या गायिकांतील एक अग्रगण्या नाव म्हणजे मालती पांडे. त्यांनी गायिलेले राजा बढे ह्यांचे हे गीत आहे.
'करिती कुटाळकी तुझे ते टाळकरी
साथीला देई साथ घरची एकतारी
भोवती निंदकांचे वाजती पखवाज
लौकिक तुझा मोठा, आणि तू घरंदाज
कशी रे तुला भेटू, मला वाटे लाज'
आता पुन्हा पुन्हा, व लक्षपूर्वक ऐकतांना मला ह्या गाण्याच्या धीटाईने आशचर्यचकित केले. एका पुरूषास, त्याची लग्नबाह्य संबंधातील प्रेयसी हे गीत म्हणत आहे. बरं, हा पुरुष बर्यापैकी नावलैकिक असलेला, तथाकथित प्रतिष्ठित असावा असे दिसते. तत्कालिन शालिन, घरंदाज वगैरे भावगीतांच्या पुढे हे गीत अगदी वेगळेच ठसले असावे? तेव्हा त्याची अशा तर्हेने काही चर्चा झाल्याचे आठवत नाही. साहित्याच्या क्षेत्रात डोळ्यात तेल घालून बसणारी मंडळी, संगीताच्या प्रांतात बहुधा लुडबुड करत नसावीत. किंवा भावगीते वगैरे सर्व त्यांच्या लेखी 'थिल्लर' असल्याने त्यांनी ह्या गीताला वॉकओव्हर दिला असावा.
गाणे मात्र सर्वाथाने सुंदर जमून आले आहे. श्रीनिवास खळे ह्या अत्यंत गुणी संगीतकाराने संगीत साज चढवला आहे. मालती पांडेंनी ते त्यांच्या नेहमीच्या सुबक गाण्याने सुशिभित केले आहे. पियानोवरील वॉल्ट्झच्या र्हिदममध्ये व्हायोलिन व बांसरीच्या प्रील्यूडने गाणे सुरू करणे ही तेव्हाच्या भावगीतांची टिपिकल व मोहक स्टाईल येथेही दिसून येते, तसेच अनेक व्हेरिएशन्स करणारा, मारूतिराव कीरांचा तबला नेहमीप्रमाणेच गाण्यास खुलवतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
गाणं ऐकतोय. सुंदर आहेच.
छान परीक्षण
गाणे आवडले
हे गाणं माहिती नव्हतं,
एका पुरूषास, त्याची लग्नबाह्य
+ १
होय... दत्ताजींच्याच चॅनेलवर
हाच तो!
गाणे ऐकू येत नाही. काय करावे?
मग
चाल आणि शब्दप्रवाह
गाणं
ही चाल
ह्या रागातील बरीच गाणी आहेत
पहाडी रागातलं हे ते हिंदी गाणं असेल का?
प्रतिसाद
चाल 'लावणे' आणि चालीवर गीत 'बसवणे'
१३:५५ च्या सुमारास मालतीबाई
सुरेख