लिअँडर पेसचं हार्दिक अभिनंदन!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ज्येष्ठ भारतीय टेनिस पटू लिअँडर पेस याने पुरूष दुहेरीतील ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा झेकोस्लोव्हाकियाच्या रॅडेक स्टेपॅनेक च्या जोडीने जिंकून अकरावं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळवलं आहे. ३८ वर्षांचा पेस आणि ३३ वर्षांचा स्टेपॅनेक यांनी अमेरिकेच्या बॉब आणि माईक ब्रायन या जुळ्या भावांचा ७-६ (७/१), ६-२ असा पराभव केला. एक तास २४ मिनिटे चाललेल्या या झुंजीनंतर त्यांनी ब्रायन बंधूंचं १२वं ग्रॅड स्लॅम विजेतेपद निदान लांबवलं तरी. पेस ने आतापर्यंत ६ पुरूष दुहेरी आणि ५ मिश्र दुहेरी विजेतेपदं मिळवली आहेत.
पेसला आता मिश्र दुहेरीतही विजयाची संधी आहे, त्याचा हा सामना उद्या (रविवारी) रशियाच्या एलेना व्हेसिनिना हिच्या साथीने होईल.
पेसने या विजयानंतर आपल्या पत्नी आणि मुलीची आठवण तर काढलीच पण त्याची मैत्रीण-मार्गदर्शक-सहकारी मार्टिना नव्हरातिलोव्हा हिचाही आदराने उल्लेख केला.
१९९९ च्या विंबल्डन मध्ये पेसने अमेरिकेच्या लिसा रेमंडच्या साथीने मिश्र दुहेरी (आणि मला वाटतं त्याच वेळी पुरूष दुहेरी पदही) मिळवलं होतं.
पेसचं हार्दिक अभिनंदन आणि उद्याच्या विजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
लिअँडर पेसचे हार्दिक
ऑस्ट्रेलियात...३८
पेसचे अभिनंदन!
पेसचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!
निरर्थक भिती
वेट & वॉच
हा खेळाडू कायम दुहेरी किंवा
Synergy..?
अभिनंदन, अभिनंदन अभिनंदन.
अभिनंदन.... अभिनंदन.... अभिनंदन....
लिअँडरचा पेस चं खरोखरच जोरदार
मनापासून अभिनंदन. भारताचं
अभिनंदन....!!!