Skip to main content

चुकते कोण?

लेखक स्वातीविशु यांनी बुधवार, 25/01/2012 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
घरातील वडिलधा-यांना जास्त काम लावू नये, शक्यतो स्वत:चा हातभार वाढवावा,असे माझे मत आहे. असो. आई-वडिल, मुलगा-सून, नातवंडे असे भरलेले कुटूंब दिसणे हल्ली दुर्मिळ होत चालले आहे. त्यातही जी काही थोडी कुटूंबे आहेत, तिथे ज्येष्ठांना योग्य वागणूक मिळत नाही. जेष्ठांनी नेहमी समजुन घ्यायचे आणि लहानांनी नेहमी चुका करायच्या असे समीकरण सर्रास दिसते. [ काही अपवाद सोडून...] माझ्या गावाला (वाई) ओळखीचे अशा एक कुटूंबात आई-वडिल, दोन मुले -सुना, नातवंडे आहे. तर झाले काय... धाकटा मुलगा मुंबईत नोकरी करतो. त्याची बायकोसुद्धा चांगल्या कंपनीत नोकरी करते, अर्थात घरकामातही ती अजिबात कमी पडत नाही. त्यामुळे घरी-दारी तिचे कौतुक होत असते. हे पाहून थोरली सून गावाला राहून नोकरी करु लागली.[ म्हट्ले जाउद्या...घरात, शेतात काही काम होत नाही, नोकरीवर तरी उजेड पडेल....] मधे एकदा गावाला जाण्याचा योग आला असता असे दिसले की, बाईसाहेब फक्त स्वतःचे आवरून कामाला निघून जातात. सासूबाई घरी नाष्टा, स्वयंपाक, धुणे, भांडी, पाणी भरणे, दोन नातवंडांचे आवरून त्यांना शाळेत पाठवून शेतात जातात. नोकरी करणे म्हणजे घरकामातून रजा घेणे असे कुठेही लिहिलेले नाही. कितीतरी प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी करणा-या महिला घरची कामे तितक्याच समरस होऊन करतात. वरिल उदाहणातील सासूबाई उच्च रक्तदाबाच्या पेशंट आहेत, वयोमानानुसार, स्थूलतेमुळे त्यांना धावपळ, उठ्बस जमत नाही. स्वभावाने समंजस व शांत आहेत. तरीही विनातक्रार सर्व करत आहेत. पण दुसरीकडे सुनबाईला वाटते की तिला कोणी विचारत नाहीत / किंमत देत नाही. [चोराच्या उल्ट्या बोंबा.....] हे सर्व पाहीले की असे वाटते चुकते कोण? सासू की सून? {मिपाकर यावर नक्कीच काही चांगले मार्गदर्शन करतील अशी खात्री आहे.}

वाचने 15793
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

वरील देखाव्यात म्हणजे भेदक कथेत सासुबाई स्वतः एका गंभीर आजारात असुन देखील खुपच कष्ट करता आहेत. तसेच सुनबाई घरची परिस्थिती व जावेबद्दल च्या कौतुकाला कंटाळुन नोकरी करताहेत. म्हणजे दोघीही त्याच्या कुवती पेक्षा जास्त कष्ट करत आहेत. त्यामुळे त्याना बदली म्हणुन मुलाने/सुनेच्या नवर्‍याने सरळ दुसरे लग्न करुन दोघीचा ताण हलका करावा. इथे चुकतो तो त्याबाईंचा/ त्या अश्राप महिलेचा पतीच.त्यामुळे त्याने आपली चुक सुधारुन सरळ दुसरे लग्न करावे म्हणजे दोन्ही स्त्रीयाना त्याचा कामातुन थोडी उसंत मिळेल. आपलाच दोडकाकिसु

अरेच्च्या! हा पाशवी धागा काही तासात बरेच उड्डाण करून गेलाय. अश्यावेळी ना मला भारतात नसल्याचं वैट्ट वाटतं. पाशवी चर्चांचं समाधान कै मिळत नै. स्वातीविशुतैंनी एव्हाना त्या कुटुंबातील बैलोबांना गदागदा हलवून जागं केलं असेलच. अहो एवढे प्रतिसाद मिळवता अश्या धाग्यावर? किती वाईट वाटतं म्हायतिये!;)

अय्या................................. स्वातीकाकू तूमी आमच्या वाईच्या घरी गेला होतात? बरं झालं त्या मेल्या माझ्या थोरल्या जावेचं नाक ठेचलंत ते! आगाऊ मेली....चांगली आता हज्जारो लोकांसमोर नाचक्की झाली!!!!!!! या बरंका कधीतरी आमच्याकडे आता. - तुमचीच, मुंबईची (कामसू) सूनबै

@पेठ्कर काका: तुम्ही अगदी योग्य विश्लेषन केलेत आणि
"त्यामुळे स्वयंपाकघराचा ताबा आपल्याच हातात राहावा आणि सुनेला मदत केल्याला मोठेपणाही आपसुक मिळावा असा कावा कित्येक सासवा करताना दिसतात."
अगदी बरोबर वाटते.
सासुने शहरातिल सुनेकडे जाउन रहावे हे उत्तम !!!
चुचु तै नी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. (त्या सासूबाई सध्या मुंबैत आहेत आणि आम्ही त्यांना अजुन ८ दिवस नाही जौ देत हो.....जरी त्यांना सारखे बोलावण्याचे फोन येत आहेत तरी...)
अहो एवढे प्रतिसाद मिळवता अश्या धाग्यावर? किती वाईट वाटतं म्हायतिये!
रेवती तै मला खरेच वाटले नव्हते इतके जास्त आणि छान छान प्रतिसाद येतील म्हणुन.....(काही प्रतिसाद परत परत वाचून खुप हसत आहे.) धन्यवाद.

In reply to by स्वातीविशु

>>त्या सासूबाई सध्या मुंबैत आहेत आणि आम्ही त्यांना अजुन ८ दिवस नाही जौ देत हो. अच्छा, म्हणजे त्या दुसर्‍या जाऊबाई म्हणजे धागालेखिका आहेत वाट्टं.

In reply to by नितिन थत्ते

थत्तेचाचा, ती एक शक्यता आहे. आणखी एक शक्यता आहे - हा नणंद-भावजया असाही मामला असू शकतो. ;)

कुणाचे चुकते ते सांगता येणार नाही, कारण मला अशी उगीच्च कुणाच्या चुका काढायची सवय नाही! ;) @ रेवतीताई: येउ द्या की अजून एक मुरंबा. लांबलचक धागा तयार करुयात... :) अवांतरः घरकाम म्हंजे काय असते? ----- (लाडावलेली) माउ

In reply to by कवितानागेश

घरकाम म्हंजे काय असते? जे काम सुनेची इच्छा असते सासूनं करावं आणि सासूची इच्छा असते सुनेनं करावं त्याला घरकाम म्हणतात.;) किंवा घरातले बैलोबा ज्या कामाला हात लावत नाहीत ते घरकाम.

In reply to by रेवती

अवांतर - गाडी बैल ओढतो. नांगरही तोच ओढतो. पाण्याची मोट तोच ओढतो. ही कामं गाईकडून करून घेतली जात नाहीत. म्हशीकडूनही नाही. तसं क्वचितही झालं तर 'कुत्रा माणसाला चावतो ती बातमी नव्हे तर माणूस कुत्र्याला चावतो ती बातमी' या व्याख्येनुसार त्या घडामोडीची बातमी होते. आता असं असूनही काम न करणाऱ्या माणसाला 'बैल' का म्हटलं जात असावं?

In reply to by श्रावण मोडक

नको नको. संमं चे काम वाढवल्याबद्दल मला बाहेरचा रस्ता दाखवतील. आजकाल बरेच ष्ट्रीक्ट झालेत म्हणे!;)

In reply to by गणपा

उतरा आता. संपादकांनी संपादकांसाठी दिलेला संपादकांचा प्रतिसाद ठरायचा हा. लवकर उतरा खाली. ;) संदर्भ

In reply to by श्रावण मोडक

अवांतराशी सहमत... घरकाम न करणार्‍याला बैल म्हणून गाडी, नांगर ओढणे असली कष्टाची कामे करणार्‍या बैलाचा अपमान करू नये!