चुकते कोण??
घरातील बाईमाणसाला जास्त काम लावू नये, शक्यतो स्वत:चा हातभार वाढवावा,असे माझे मत आहे. असो.
आई-वडिल, मुलगा-सून, नातवंडे असे भरलेले कुटूंब दिसणे हल्ली दुर्मिळ होत चालले आहे. त्यातही जी काही थोडी कुटूंबे आहेत, तिथे सूनांना योग्य वागणूक मिळत नाही. बायकांनी नेहमी घरकाम आणि नवर्याने तंगड्या पसरुन टीव्ही बघत चमचमीत खाण्याच्या फर्माईशी सोडायच्या असे समीकरण सर्रास दिसते. [ आमच्या गणपासारखे काही अपवाद सोडून...]
माझ्या गावाला (झुमरीतलैय्या) ओळखीचे अशा एक कुटूंबात आई-वडिल, दोन मुले -सुना, नातवंडे आहे. तर झाले काय... धाकटा मुलगा दुबईत नोकरी करतो. त्याची बायकोसुद्धा चांगल्या कंपनीत नोकरी करते, अर्थात घरकामातही ती अजिबात कमी पडत नाही. त्यामुळे घरी-दारी तिचे कौतुक होत असते. पण यामुळे कामाचा सगळा बोजा तिच्यावर पडतो आणि नवरा मात्र दिवाणखान्यात बसुन बीयर ढोसत बसतो.
हे पाहून थोरली सून गावाला राहून नोकरी करु लागली.[ म्हट्ले जाउद्या...घरात, शेतात काही काम होत नाही, नोकरीवर तरी उजेड पडेल....] मधे एकदा गावाला जाण्याचा योग आला असता असे दिसले की, बाईसाहेब स्वतःचे आवरून कामाला जायला लागल्या तर तिच्या खाष्ट सासूबाई घरी तिच्यावर ओरडल्या नाष्टा, स्वयंपाक, धुणे, भांडी, पाणी भरणे, दोन नातवंडांचे आवरणे कोण करणार म्हणुन.
हे सर्व पाहीले की असे वाटते चुकते कोण? सासू , सून की आळशी नवरा? घरकामाची जबाबदारी एकट्या बाईचीच का? मुलगा का म्हणुन काही करत नाही. आजकाल मुलीही मोठ्या हुद्द्यावर काम करता (आयटी वैग्रे) . मग मुलानेही घरकामात हातभार लावायला नको काय? स्वत:चा मुलगा ठोंब्या असुनही सूनेवर आगपाखड करुन स्वतःचे आणि सूनेचे ब्लडप्रेशर वाढवणारी सासू चुकीची? की वर्षानुवर्षाची भारतीय परंपरा झुगारुन घरकामाला फाटा देणारी सून चुकीची? की झेपत नसताना काम करणारी दुबैची सून चुकीची? की सासूबाईंचे २ ठोंबे चुकीचे?
{मिपाकर यावर नक्कीच काही चांगले मार्गदर्शन करतील अशी खात्री आहे. उत्तर माहिती असुनही उत्तर न देणार्या मिपाकरांच्या डोक्याची शंभर शकले होतील आणि या धाग्याला फाट्यावर मारणार्या मिपाकरांचा आयडीच गोठवला जाइल}
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आज्जी काय म्हणत्ये
येता जाता माझ्यावर अवलंबून
१ तारखेचे वेध चालू झालेले
^^
केवढा आवाका
ह्म्म..
आणि हो, कौतुकाने सटीसहामाशी
खि: खि: खि:
दणक्यात
घराचा आहेर. =))
गंपाभौ आणि प्रशांतभौ,
एक उदाहरण माझ्या माहितीतलंच
एका दगडात किती पक्षी??
बालकथा
आजकाल मुलीही मोठ्या
चूक सासूचीच! तिने आपल्या
यात आम्ही काय डोंबल