आपण गाजर हलवा नेहमीच आवडीने खातो आणी हिवाळ्यात तर घरोघरी हमखास बनवला जातो :)
मी विचार केला नेहमीचा हलवा बनवून सर्व्ह करण्यापेक्षा त्यात काहीतरी वेगळेपण असले पाहिजे म्हणून हा छोटासा बदल :) चला तर मग सुरुवातीपासून सुरु करुयात ;)
साहित्य:
१ किलो गाजरे सालं काढून किसून घेणे
१ मग भरून गरम दूध
३/४ -१ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
३-४ टेस्पून खवा (घरी केलेला ताजा खवा वापरावा किंवा साय, मिल्क पावडर वापरली तरी चालेल )
४ टेस्पून साजुक तुप
सू़का-मेवा
१ टीस्पून वेलचीपूड
९-१० मॅकविटीज (मारी) बिस्कीटे
५० मिली फ्रेश क्रीम
पाकृ:
एका भांड्यात २ टेस्पून साजुक तुप गरम करून त्यात गाजराचा कीस परतून घ्यावा.
गाजराचा कीस चांगला परतला गेला की त्यात थोडे-थोडे करुन दूध घालावे व सतत परतत राहावे.
दूध पूर्ण आटले की त्यात खवा घालावा . सतत परतून मिश्रण घट्ट होऊ लागेल.
मिश्रण सुकत आले की त्यात साखर घालावी. साखर विरघळल्यावर मिश्रण पातळ होईल. सतत ढवळत रहावे.
हलवा साधारण सुकत आला की वरून २ टेस्पून साजुकतुप सोडावे म्हणजे हलव्याला चकाकी येते व हलवा खमंग लागतो.
त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा व वेलचीपूड घालावी . हलवा थोडा पातळ असेल,पूर्ण गार झाला की एकसंध होईल.
गाजर हलवा तयार आहे. तुम्ही असाच किंवा व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर सर्व्ह करु शकता :)
अब आ गया ट्विस्ट ;)
फ्रेश क्रीम थोडं व्हॅनिला एसेन्स व थोडी साखर घालून व्हिप करुन घेणे.
आपल्याला पाय बनवायचा आहे त्यासाठी मारी बिस्कीटांचे तुकडे करावे व एका झिपलॉक बॅगमधे ठेवून त्यावर लाटणे फिरवून चुरा करावा.
तयार चुर्यात वितळलेले बटर घालून सगळ्या चुर्याला नीट चोळून घ्यावे.
आता तुमच्याकडे जर स्प्रींगफोर्मचा केक टीन असेल तर तुम्ही तो वापरु शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी पेस्ट्री कटरचा वापर करत आहे. (तसेही मला Individually सर्व्ह करायला सोपे पडले :) )
पेस्ट्री कटरमध्ये बिस्कीटांचा चुरा नीट दाबून पसरावा.
त्यावर तयार गाजर हलव्याचा थर पसरावा. (गाजर हलवा पूर्ण गार झालेला हवे)
त्यावर व्हिप केले क्रीम पसरावे व पिस्त्याचे काप लावावे. फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवावे अर्धा-एक तास.
सर्व्ह करतेवेळी सुरी कडेने फिरवून अलगद पेस्ट्री कटर काढावे.
तुमचे डेजर्ट खाण्यासाठी तयार आहे :)
वाचने
14486
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
देवा!!
सुपर!!
खल्लास... सुपर्ब!!!! बाकी
हा हा हा हा
In reply to खल्लास... सुपर्ब!!!! बाकी by मराठमोळा
शेवटचा फोटू बघून वारलो.....
मस्त आयडीया आहे.. एकदम
मस्त आयडीया आहे.. एकदम
In reply to मस्त आयडीया आहे.. एकदम by प्राजु
खत्री रेसिपी..... प्रचंड
अप्रतिम..
भन्नाट पाकृ...... सही आहे....
सुरेख. आयडियेची कल्पना भारी
नंबर झालीये डिश.... चला आता
मस्त
ज ब र्या द स्त !
अणुमोदन
In reply to ज ब र्या द स्त ! by परिकथेतील राजकुमार
अणुमोदन
In reply to ज ब र्या द स्त ! by परिकथेतील राजकुमार
खतरनाक!
अरे उचला रे मला.. कुठुन शब्द
पायाचा फोटु पाठविणे
लै भारी
आवडल्या गेली आहे
सानिकाताई, काय बोलु.....
अरे रे !
In reply to सानिकाताई, काय बोलु..... by उदय के'सागर
शिणीमा
In reply to अरे रे ! by परिकथेतील राजकुमार
अड्यसुहो
In reply to शिणीमा by स्मिता.
मस्त गो
अतिब्येक्कार......! (हे
क्लास!
मुडदा पडला गेला आहे, त्या
>>>शेतात बैलाच्या तोंडाला
In reply to मुडदा पडला गेला आहे, त्या by ५० फक्त
जबरी कल्पना शक्ती...
अगं काय भन्नाट आयडिया!
मस्त..
_/\_
सानिके, का असं वागतेस? आता
अप्रतिम
सानिकाजी का... ? का.. असे
छान
अग आइइ ग्गं
विन्ट्रेश्टींग हो... तुम्ही
खल्लास !
!!!!!!!!!
अफलातुन
(No subject)
धन्यवाद
ओ सानिकातै, तुम्ही कुठे असता
काय हे ?
एक विनंती
सह्ही !