माझा निबंध.....
एकदा वर्गात ऑफ पिरिअड होता.
मस्त पुस्तक वाचत होतो....मार्क ट्वेन चे....टोम सायर....बाईनी निबंध दिला....
"मला पंख असते तर"
कोण मुंबईला गेला.....कोण हिमालयात गेला...(एक तर पार अमेरिकेत गेला....त्यावेळी अमेरिका दूर होती आणि इंग्लंड जवळ होते..)...तर कोण पक्ष्यान बरोबर गप्पा मारत बसला....
आता पुस्तक वाचावे की, निबंध लिहावा....मग काय पटकन निबंध लिहिला आणि पुस्तक वाचायला लागलो.....
बाईनी बघितले कि हे काय...हा मुलगा लिहित का नाही? त्यानी निबंध वाचला आणि सर्व वर्गाला "शंकराचे तांडव नृत्य, महिषासूर मर्दिनीचा त्वेष आणि त्रातीकेचे वाक्तांडव" एकाच वेळी दाखवले..तरी पण राग शांत होईना...मग मला झाशीच्या राणी प्रमाणे (पाठीला न बांधता) खेचत मुख्य शिक्षकान कडे नेले....त्यांनी पण "आग्या वेताळ, गब्बर सिंग, रावण,दुर्योधन, दुशासन" करून दाखवले.....शेवटी शकुनी मामा झाले आणि औरंगझेबा प्रमाणे फर्मान सोडले.....जा आणि बाबाना घेवून ये.....
मग काय बाबा आले....त्यांनी पण येण्या पूर्वी "जमदग्नीचा रोल केला" केला....आई तर तिचे माझ्या मनातील "वात्सल्य सिंधू" ह्या प्रतिमेला जोरदार धक्का दिला....भावाने मराठी भाऊ पण दाखवले...(म्हणजे आगीत तेल ओतले) आणि "विश्वास आणि भाऊ" पानिपतात मेले हे सिद्ध केले.....
मग बाबा आणि शिक्षक ह्यात तह झाला,,,,कलमे खाली देत आहे...
१. माझी पुस्तक वाचन बंदी.
२. रोज ४ पाने लिहिणे......
त्याचा सूड मी अजून उगवत आहे......आणि निबंध पण खरा करून दाखवला......
१. रोज मनसोक्त वाचन आणि
२. कमीत कमी लिहिणे......
ज्या गोष्टी मुळे हे सर्व झाले , तो निबंध वाचायचा आहे?
" मला पंख असते तर मी सगळे जग फुकट बघीन."
आणि खर सांगायचे तर आज मी सर्व जग माझ्या कंपनी मुळे फुकट बघत आहे.....
तर मंडळी आता मी निरोप घेतो......माझा पत्ता खाली देत आहे......माझ्या ह्या घरात आपले स्वागत आहे......
http://full2dhamaal.wordpress.com
सदैव मी.पा. कर (जयंत फाटक उर्फ मुक्त विहारी)
वाचने
6884
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुक्त विहारी तुम्ही गगन
लोल
In reply to मुक्त विहारी तुम्ही गगन by स्पा
एवढे होऊनसुद्धा तुम्ही इतके
त्यावेळी अमेरिका दूर होती आणि
+ १०००००००००० ... अगदी हेच
In reply to त्यावेळी अमेरिका दूर होती आणि by मराठी_माणूस
अवो
In reply to + १०००००००००० ... अगदी हेच by उदय के'सागर
यार्डली पावडर
In reply to अवो by चिरोटा
लेख लिहायला सुरुवात
मी जपा निरासागता साप्ताह
In reply to लेख लिहायला सुरुवात by ५० फक्त
किस्सा आवडला.
किस्सा आवडला. ऑ? नक्कि का?
In reply to किस्सा आवडला. by पैसा
हो हो!
In reply to किस्सा आवडला. ऑ? नक्कि का? by स्पा
वाचला तुमचा "ब्लॉग"....
छान लिहीलय.
मित्रास पत्र
भेटवस्तू आवडली. छान दिसते
In reply to मित्रास पत्र by sagarpdy
ह ह पु वा.
In reply to भेटवस्तू आवडली. छान दिसते by गणेशा