मंडळी रामराम,
आप्ले म्हन्ने थोडक्यात सांगा या यस्टी स्ट्यँडवर चौकशीच्या खिडकीवर ल्हेल्यानुसार आमी आमचं म्हन्नं आपनापुडं थोडक्यात मांडतो,
परवाच आमी मंबयला गेलो व्हतो तवा तितं येक दिवस आमच्या मित्राकडं मुक्काम पडल्यानं आमाला पुर्षांनी घरात कोन्ते कपडे घालावे ह्याईषई प्रश्न पडला. गावी आल्यावर लै टकुरं खाजवून ठरवलं की, मिसळपावच्या गाडीवर आन्ना, दादा, नाना, मामा, काका, मास्तर, गुर्जी, वकील ह्यासारकी लै बुद्दीमान आन इच्यारवंत मंडळी बसलेली (पडीक) असत्यात तवा त्यास्नीच ईच्यारावं म्हनून ठरवून टाकलं. (आता आमचं ह्ये रिकार्डींग व्हताना कुनीतरी मधे बोलत व्हतं त्याचं बोलनं जे हाय तेच कंसात आलयं ह्ये ध्यानात घ्यावं.)
१) आमच्या मित्रानं रातच्याला बुरगुंडा (बरमुडा) घातला व्हता. वाळलेल्या लाकडासारक्या टंगड्या समद्याला दावत त्यानं आमाला नाक्यावरच्या पानवाल्याकडं पान खाऊ घालाया न्हेलं.
२) त्येच्या पोरानं टाचंपास्नं इतभर टंगड्या उघड्या टाकनारी प्यँट (थ्रीफोर्थ) घातली व्हती.
आता आमचे सवाल आशे हायत की,
१) घरात आन् भायेर जाताना पुरुष मानसांनी बाया मानसान्ला लाज वाटल आशे टंगड्या उगड्या टाकनारी कापडं वापरावी का? (टंगड्या बी लै नमुन्याच्या उदा. वाळक्या लाकडावनी, काळ्या, पांडऱ्या, जाडजूड मुसळावानी, पात्तळ बांबूवानी, केसाळ आस्वलावानी) ह्ये आस्ले उल्टी (ओकारी) येनारे टंगडी पीस बायामानसास्नी दाकवन्यासाटी ही बुरगुंडा म्हंजी आर्दी चड्डी धालायची का? त्येचा नेमका फायदा काय?
२) आकूडकी कापल्याली प्यँट (थ्रीफोर्थ) घालन्यात नेमका फायदा काय गुडग्यापास्नं येक ईतभर खालपरेंत टंगड झाकायचं आन टाचंपास्न येक ईतभर वर उगडं बी ठिवायचं ह्येज्यातला नेमका फायदा कुनी आमाला सांगल का? का कापडं मिळत नसल्येल्या आपल्या देश्यातल्या इतर लोकान्ला कापडं मिळावं म्हनून आपनं आशी लांडी प्यँट धालून काटकसर करायची का?
३) ह्या बुरगुंड्याचं आन त्या आकूडक्या कापलेल्या प्यँटीच येवडच जर लै कौतुक वाटत आसल तर हापीसला, कामावर जाताना का न्हाईत घालत? तवा कुनाची लाज वाटती का? फुलप्यँटीवर आर्दा श्यर्ट घालनारे लोकं हैत, तसं बुरंगुंड्यावर आन आकूडक्या कापलेल्या प्यँटीवर लांब भायाचं श्यर्ट (फुलशर्ट) फ्यॅशन म्हनून घालायला काय हारकत हाय?
४) आंग झाकनारी लुंगी किंवा पूर्न उंचीची नाईट प्यँट घालनारे लोक मागासल्येले असत्यात का?
मंडळींनो आमच्या प्रश्नाची उत्तरं देन्याचा प्रयत्न करावा.
वाचने
5375
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
...........
= I love to kill, especially time =
In reply to ........... by वपाडाव
आसल्या कपड्यास्नी फेशन
लै जुनी फ्यॅशन हाय ही
In reply to आसल्या कपड्यास्नी फेशन by शिल्पा ब
-१
In reply to लै जुनी फ्यॅशन हाय ही by सू डोकू
आत्ता गं बया!! हापिसात कुनी
In reply to लै जुनी फ्यॅशन हाय ही by सू डोकू
ठिक आहे नको ते बरम्युडा
In reply to आत्ता गं बया!! हापिसात कुनी by शिल्पा ब
चेन्नै
In reply to ठिक आहे नको ते बरम्युडा by पाषाणभेद
आक्शी बरुबर बघा आमच्या
In reply to चेन्नै by पैसा
आमच्या चेन्नैत लोकं लुंगी
In reply to आक्शी बरुबर बघा आमच्या by प्रीत-मोहर
बरं.. बोध का??
In reply to आमच्या चेन्नैत लोकं लुंगी by अन्या दातार
अरे वप्या!!
In reply to बरं.. बोध का?? by वपाडाव
आम्ही ऑफीसात सुद्धा हाफ / थ्री फोर्थ पँट वापरतो
हॅ हॅ हॅ हॅ....कस का होइना
In reply to आम्ही ऑफीसात सुद्धा हाफ / थ्री फोर्थ पँट वापरतो by नेत्रेश
लेख फारच संकुचित दृष्टीतून
घरगुती पेहराव
+१
In reply to घरगुती पेहराव by विसुनाना
२) आकूडकी कापल्याली प्यँट
मग तिला डायरेक्ट इच्चाराय्च
In reply to २) आकूडकी कापल्याली प्यँट by परिकथेतील राजकुमार
हम्म्म
In reply to मग तिला डायरेक्ट इच्चाराय्च by प्रीत-मोहर
हम्म्म..
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
पोरगी डोक्यात अंमळ अधू असेल
हायला !
बायामानसांनाच इचारावं
बुरगुंडा वापर्न्याचे फायदे.....
जरा ते 'पँट'चं अनेकवचन
In reply to बुरगुंडा वापर्न्याचे फायदे..... by सू डोकू
रामदास स्वामींचा फोटो
रामदास स्वामींचा फोटो या
या लेखांतील समर्थांचा उल्लेख ...याचा जाहीर निषेध !
जाहीर माफी
पडदा... मा़झ्याकडून ! (उगे च वादंग वाढवणे /हे मूर्ख पण //)