नमस्कार,
भारतीय संविधानाच्या कलम २१-अ - Right to education चा थोडासा आधार घेत आम्ही खालील शंकानिरसन करून घेऊ इच्छितो आणि त्याबाबत थोडेफार साक्षर व माहीतगार होऊ इच्छितो. जाणकारांनी कृपया प्रतिसाद देत सदर चर्चेत अवश्य भाग घ्यावा व माहिती पुरवावी ही विनंती -
आजच्या घडीला गुगल, गुरुजी आणि अन्य अनेक शोधयंत्र आंतरजालावर कार्यरत आहेत. त्यामुळे माहिती मिळवण्याचे आपले बरेचसे काम सुकर झाले आहे हे नाकारता येणार नाही. उदाहरणार्थ, समजा आपल्याला 'Mango' म्हणजे काय हे माहिती नाही; आणि म्हणून आपण गुगलच्या शोधयंत्रात 'Mango' हा शब्द टंकीत केला तर क्षणार्धात हजारो संकेतस्थ़ळांची, छायाचित्रांची माहिती आपल्या पुढ्यात येते. यात जगभराच्या आंब्याच्या जाती, आंबा उत्पादन, आंब्याच्या पाककृती, निरनिराळ्या जातींच्या आंब्यांची हजारो छायाचित्रे इत्यादी नानाविध माहितीचा खजिना आपल्यापुढे उघडला जातो. परंतु हे झाले दिलेल्या 'Mango' ह्या शब्दावरून आंब्याची माहिती पुरवण्याचे गुगलचे कसब. परंतु आमचा प्रश्न निराळाच आहे. तो असा -
गुगलच्या शोधयंत्रात जशी शब्द टंकीत करून शोध घ्यायची सोय आहे तशी एखादी जेपीजी प्रतिमा चढवण्याची व त्या अनुषंगाने शोध घ्यायची सोय का नाही..?
आम्ही आमचा मुद्दा वरीलप्रमाणे उदाहरणाद्वारे अजून थोडा स्पष्ट करू इच्छितो. समजा आमच्या संगणकावर आंब्याची प्रतिमा उपलब्ध आहे, परंतु ती प्रतिमा नेमकी कशाची आहे, कोणाची आहे हे जर आम्हाला माहीत नसेल तर मग गुगलच्या शोधयंत्रात सदर प्रतिमेची जेपीजी चढवून 'शोधा' या पर्यायावर कळ दाबता का येऊ नये? गुगलचे शोधयंत्र जसे दिलेल्या शब्दावरून तो शब्द ओळखून त्यानुसार त्या शब्दासंबंधी जमेल तितकी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करते त्याप्रमाणे गुगलचे शोधयंत्र दिलेली प्रतिमा ओळखून त्यानुसार माहिती पुरवण्यास आजच्या घडीला असमर्थ का?, हा आमचा सवाल आहे.
या अनुषंगाने काही स्वाभाविक प्रश्न -
१) प्रतिमेवरून शोध घेण्याचे तंत्र अद्याप विकसितच झालेले नाही? किंबहुना तसा अद्याप विचारच झालेला नाही?
२) किंवा तसे प्रयत्न सुरू आहेत?
३) किंवा या संदर्भातील तांत्रिक आव्हानांना अद्याप सारे प्रयत्नशील तंत्रज्ञ अपुरे पडत आहेत/पडले आहेत..?
कृपया या विषयाबाबत येथे विषयाला अनुसरूनच विस्तृत चर्चा व्हावी. असंबद्ध प्रतिसाद देणार्यांना ईश्वराने तूर्तास क्षमा करावी व सद्बुद्धी द्यावी.
ता. क. - पक पक पक यांसारख्या सन्माननीय मिपा सभासदांनी या धाग्याचे स्वतंत्र विडंबन केल्यास तो निश्चितच एक निखळ विरंगुळ्याचा धागा ठरावा, अशी आम्हाला आशा आहे. सबब, त्यांचेही स्वागतच आहे!
-- कॉमॅ.
वाचने
5473
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुगल गॉगल्स
आपण सांगितल्याप्रमाणे सदर
In reply to गुगल गॉगल्स by मनिष
पॅटर्न मॅचिंग तंत्रज्ञानात
प्रतिमा शोधणे हे थोडे अवघड
हो, आणि त्यात तोतापुरी, बदाम,
In reply to प्रतिमा शोधणे हे थोडे अवघड by मराठी_माणूस
ओ काय बोंबाबोंब व्हत नाय.
In reply to हो, आणि त्यात तोतापुरी, बदाम, by प्रचेतस
एखाद्या सराईत कोंकणी
In reply to ओ काय बोंबाबोंब व्हत नाय. by धन्या
कॉम्प्युटर किंवा
In reply to एखाद्या सराईत कोंकणी by गवि
कँप्युटर्ला डायबिटीस
In reply to हो, आणि त्यात तोतापुरी, बदाम, by प्रचेतस
http://www.tineye.com/ या शोधयंत्रा कडे हि सेवा आहे
गुगल कडे हि सेवा नसली तरी
In reply to http://www.tineye.com/ या शोधयंत्रा कडे हि सेवा आहे by मालोजीराव
असे करणे शक्य आहे. आम्ही
मग दोन्ही हात वर करायचे... ;)
In reply to असे करणे शक्य आहे. आम्ही by धन्या
मला अजून एक शोधप्रणाली
गवि काका
In reply to मला अजून एक शोधप्रणाली by गवि
shazam
In reply to मला अजून एक शोधप्रणाली by गवि
गुगलचा आवाजी शोध
In reply to मला अजून एक शोधप्रणाली by गवि
गुगलचा आवाजी शोध
In reply to मला अजून एक शोधप्रणाली by गवि
प्रयत्न
बहुधा नवीन असल्याने
त्याने सर्च केले.
In reply to बहुधा नवीन असल्याने by सुमो
=)) =))
>>अभ्यास वाढवा. ते अभ्यासच
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
हम्म्म
In reply to >>अभ्यास वाढवा. ते अभ्यासच by विश्वनाथ मेहेंदळे
हे बघा... :)
शक्य आहे
इमेज प्रोसेसिंग.
आश्चर्य आहे.कोणीही काहीही
सुरुवात
In reply to आश्चर्य आहे.कोणीही काहीही by किचेन
पास..