✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नाती गोची

व
विनायक प्रभू यांनी
Tue, 01/17/2012 - 16:34  ·  लेख
लेख
"उद्या कुठे आहेस"? विरार, का ग? "अरे अनिकेत भाउजींचा साठावा वाढदिवस आहे ना. आमंत्रण आहे". किती वाजता? "आठ वाजता. स्पेशल पाणी पुरी चा कार्यक्रम आहे" येउन पोचतो. पण तु आधी जा. "गिफ्ट काय घेउ"? मला माहीत नाही. "अरे सुचव ना" घरात एक ग्लेन फिडीच आहे ना. ती देउ. "शी. साठाव्या वाढदिवसाला दारु" मग तुला काय आवडते ते दे. "येताना एक बुके घेउन ये. कार्यक्रमात मिळलेच ना. विकतचा आणु नकोस. तेवढेच वाचले. स्पेशल पाणीपुरी म्हणजे काय रे"? पाणी पुरीच्या पाण्यात थोडीशी व्होडका आणि लिम्का टाकले की झाली स्पेशल पाणी पुरी. मराठी संस्थळावर एक महान सोकावलेल्या साहित्यीकाच्या लेखावर ही रेसी'पी' मिळाली होती. "दारु शिवाय काही सुचतच नाही का"? मला बोलायचे काय काम नाही हा. घरातल्या सर्व बाटल्या तशाच पडून आहेत. आणि वाढदिवस म्हटला की थोडी दंगा मस्स्ती हवीच की. आता चाळीस % सुट. एक% जास्त व्याज आणि इतर सवलती सेलिब्रेट नाही करायच्या का? "बर बर. वेळेवर ये म्हणजे झाले". ___________________________________________________ अगदी वेळेवर पोचलो. सर्व अ‍ॅडल्ट कारभार होता. त्या मुळे सर्व जण सोकावले. मस्त धमाल आली. पाणी पुरी वर जरा जास्तच उड्या पडल्या. रात्री अकरा वाजता कार्यक्रमाची सांगता झाली. अन्याची मुलगी पण निघाली. नात जागीच होती. अख्ख्या कार्यक्रमात पोरीने धमाल केली होती. ती काही घरी जायला तयार होइ ना. झालेला संवाद खालील प्रमाणे. "तुला उद्या शाळेला जायचे आहे ना" नाय. उद्या सुट्टी आहे. "आज घरी जा. उद्या परत ये" मी आज तुझ्या बरोबर रहाणार. तु नसलीस की बाबा रडतील ना. "बाबा वैइट्ट आहे" का ग? बाबा रोज रात्री स्टोरी सांगतो. गाणे म्हणुन गाइ गाइ करतो. तो रडेल ना तु नसलीस तर. बाबा वैइट्ट आहे. का ग? आजोबा काल ना बाबा ने मला झोपताना स्टोरी सांगीतली. आणि झोपताना एक पप्पी दिली. मग आज तु गेली नाहीस त्याला वाईट वाटेल. बाबा वैइट्ट आहे. का ग? काल मला एकच पप्पी दिली. आणी मी झोपल्यावर मम्माला टेन पप्पी देत होता. आणि नंतर ना...... मी लगेच म्युझीक चा वॉल्युम वाढवला आणि पुढचे संभाषण फक्त आजोबा पर्यंत मर्यादित राहीले. आजोबा वय वर्षे साठ, नात वय वर्षे अडीच. ___________________________________________________
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
9057 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

आयला! इथे तर प्रतिसाद

बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/17/2012 - 16:41 नवीन
आयला! इथे तर प्रतिसाद द्यायचीच गोची! ;)
  • Log in or register to post comments

+१

स्वाती२
Tue, 01/17/2012 - 20:07 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अर्र... अगागागा.. केला की

गवि
Tue, 01/17/2012 - 16:46 नवीन
अर्र... अगागागा.. केला की बल्ल्या कार्टीने..
  • Log in or register to post comments

@-आजोबा वय वर्षे साठ, नात वय

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/17/2012 - 17:37 नवीन
@-आजोबा वय वर्षे साठ, नात वय वर्षे अडीच... >>>बालपण आणी म्हातरपण सारखं असतं असं म्हणतात ते उगीच नाही... ;-) अवांतर-बाकी या धाग्याचं १नक्की - अनेक प्रतिसादकांना हवं तिथे मार लागल्याचा आनंद होण्णार Image removed.
  • Log in or register to post comments

बापाला पोत्यात घालायची कामं..

असुर
Tue, 01/17/2012 - 16:52 नवीन
ह्या आजोबांची नात आणि गविंच्या ठकरालची पोरगी, लक्षणं सगळीच्या सगळी सारखीच आहेत की! जमेल तिथे बापाला पोत्यात घालायची कामं त्येजायला! :-) --असुर
  • Log in or register to post comments

मास्तरचे सगळे लेख 'सेक्स'

प्यारे१
Tue, 01/17/2012 - 16:52 नवीन
मास्तरचे सगळे लेख 'सेक्स' भोवती घुटमळण्याचं कारण? डॉक्टर दिवटे 'अतिथेट' लिहीतात तर मास्तर 'सटल'... मास्तर समुपदेशन करतात असे ऐकले आहे. मास्तरांचे कोण करते.... समुपदेशन? ;)
  • Log in or register to post comments

अरे

मी-सौरभ
Tue, 01/17/2012 - 17:00 नवीन
'मास्तर' आणि 'डॉक्टर' यात फरक असणारच ना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मास्तरचे सगळे लेख 'सेक्स'

मराठी_माणूस
Tue, 01/17/2012 - 17:04 नवीन
मास्तरचे सगळे लेख 'सेक्स' भोवती घुटमळण्याचं कारण?
सिगमंड फ्रॉईड चा प्रभाव असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नर्मदा

तिमा
Tue, 01/17/2012 - 20:03 नवीन
नर्मदा हा शब्द नर आणि मादा या दोन शब्दांपासून बनलेला आहे काहो गुर्जी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बाब्या.. कार्टे .... असले

सविता
Wed, 01/18/2012 - 13:12 नवीन
बाब्या.. कार्टे .... असले शब्द ऐकले नाहीत का हो तुम्ही? मास्तर बहुदा बाब्या क्याटेगरी मध्ये मोडत असावेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

=)) =)) =))

सुहास झेले
Tue, 01/17/2012 - 16:53 नवीन
हा हा हा ... बिकांशी बाडीस
  • Log in or register to post comments

घरात एक ग्लेन फिडीच आहे ना.

गणपा
Tue, 01/17/2012 - 16:59 नवीन
घरात एक ग्लेन फिडीच आहे ना. ती देउ.
=)) बाकी अजुन वाचायचय...
  • Log in or register to post comments

अं

चिरोटा
Tue, 01/17/2012 - 17:04 नवीन
विनोदी शैली असूनही अंतर्मुख होवून विचार करायला लावणारा लेख.
  • Log in or register to post comments

थॅ़क्स

विनायक प्रभू
Tue, 01/17/2012 - 17:09 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

मास्तरांची स्फुटे वाचून ती

यकु
Tue, 01/17/2012 - 17:05 नवीन
मास्तरांची स्फुटे वाचून ती लावणी आठवते.. पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा ;-) कृहघेणे
  • Log in or register to post comments

स्वारी पण या स्फुटात

गणपा
Tue, 01/17/2012 - 17:12 नवीन
स्वारी पण या स्फुटात मास्तरांच्या 'हिरव्या' देठाचा काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

गणपाशेठ तो

यकु
Tue, 01/17/2012 - 17:16 नवीन
गणपाशेठ तो प्रतिसाद >>>>मास्तरचे सगळे लेख 'सेक्स' भोवती घुटमळण्याचं कारण? डॉक्टर दिवटे 'अतिथेट' लिहीतात तर मास्तर 'सटल'... >>>>मास्तर समुपदेशन करतात असे ऐकले आहे. मास्तरांचे कोण करते.... समुपदेशन? हे पाहून लिहीला होता हो.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

ह्म्म्म मग तुमची 'लाईन' चुकली

गणपा
Tue, 01/17/2012 - 17:18 नवीन
ह्म्म्म मग तुमची 'लाईन' चुकली म्हणायची. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

समुपदेशन

विनायक प्रभू
Tue, 01/17/2012 - 17:19 नवीन
प्रतिसाद कर्ते माझे सर्व लेखन वाचतील आणि माझे समुपदेशन करतील.
  • Log in or register to post comments

सरासरी...

मन१
Tue, 01/17/2012 - 17:53 नवीन
नात आणि आजोबा ह्यांच्या वयाची सरासरी तीसच्या आसपास येते. सरासरी तीस वय असणार्‍या ग्रुपने काही गप्पा मारल्या तर हरकत नसावी. --सौजन्य ननिंचा धागा खास विप्र ष्टाइल लेख.
  • Log in or register to post comments

विवाहीत मिपाकर योग्य ती

इरसाल
Tue, 01/17/2012 - 18:14 नवीन
विवाहीत मिपाकर योग्य ती कल्जि घेतील अशी आशा.(कारण प्रत्येक ठिकाणी ऐकणारे ६० वर्षाचे आजोबाच आणि आवाज कमीजास्त करता येणारा म्युजिक सिस्टीम असेलच असे हि नाही.)
  • Log in or register to post comments

हायला !

परिकथेतील राजकुमार
Tue, 01/17/2012 - 17:58 नवीन
मास्तुरे एक कुठे कुठे जात असतात ना. असो.. आपली पाणीपुरी पार्टी कधी ?
  • Log in or register to post comments

ठ्ठो. संसार म्हणजे तारेवरची

अप्पा जोगळेकर
Tue, 01/17/2012 - 19:52 नवीन
ठ्ठो. संसार म्हणजे तारेवरची कसरत असं का म्हणतात यामागचे कारण कळले.
  • Log in or register to post comments

हम्म...

दादा कोंडके
Tue, 01/17/2012 - 20:52 नवीन
याच विषयावरचे शाळेत असताना ऐकलेले (आणि सांगितलेले) हि आणि हि विनोद आठवले. इच्छुकांनी व्यनी करू नये. अपमान करण्यात येइल! :)
  • Log in or register to post comments

अगायायाया!!

चतुरंग
Tue, 01/17/2012 - 21:15 नवीन
ही चिमुरडी ना कुठे गोत्यात आणतील सांगता येत नै...अनिकेत आजोबांना अगदी कानकोंडं झालं असेल नै!! ;) आपलीच नात आणि आपलीच गोची! =)) =)) - रंगा
  • Log in or register to post comments

मास्तर लै झाक

रघु सावंत
Tue, 01/17/2012 - 23:02 नवीन
'' घरातल्या सर्व बाटल्या तशाच पडून आहेत.'' तर एक दोन जरा ईकडे सरकवा म्हणजे नाती ने आणखी काही सांगितले तरि आम्हाला काहीच ऐकु जानार नाही. मस्त............
  • Log in or register to post comments

स्पेशल पाणीपुरी

नितिन थत्ते
Wed, 01/18/2012 - 13:39 नवीन
अशी पाणीपुरी परवाच* अमर प्रेममध्ये ओमप्रकाशला खाताना पाहिले. *रविवारी-सब टीव्हीवर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा