विनयभंग
Assault or criminal force to woman with intent to outrage her modesty.
Whoever assaults or uses criminal force to any woman, intending to outrage or knowing it to be likely that he will thereby outrage her modesty, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both.
भारतीय दंड विधान ३५४ नुसार विनयभंग म्हणजे काय?आणि त्याला कोणती शिक्षा आहे ?त्याबद्दलची कायद्याची परिभाषा अशी आहे...
विनयभंगः महिलेला लज्जा उप्तन्न होईल ह्या हेतुने केलेला अत्याचार व बळाचा बेकायदा वापर.
शिक्षा: जो कोणी ,जाणता अथवा अजाणता, महिलेवर अत्याचार करेल अथवा बेकायदेशीरपणे बळाचा वापर करुन असे वर्तन करेल त्याला अश्या कोणत्याही कृत्याबद्दल दोन वर्षांपर्यंत कैद अथवा दंड अथवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील.
विनयभंग! ह्या गोष्टीने स्त्रीच्या शरीराला जितक्या वेदना होत असतील त्यापेक्षा कितीतरी पटीने मनाला वेदना होतात.
भारतीय समाजात स्त्रीयांना सतावणार्या अनेक त्रासांपैकी एक त्रास म्हणजे विनयभंग. स्त्री, मग ती समाजातील अगदी उच्चभ्रू स्तरातील असो वा अगदी तळागाळातील असो, काही पुरूषांच्या विकृत प्रवृत्तीचा त्रास हा स्त्रीयांना होतच असतो. स्त्रीयांच्या भाषेत बोलायचे झाले तर पुरूषांच्या अश्लिल प्रवृत्तीचा आणि शेर्यांचा त्रास स्त्रीयांना सदैव सहन करावा लागत असतो.
कधीकधी कोर्टात विनयभंगाच्या केसेस दाखल होत असतात, पण त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की, कैक स्त्रीया आपली बदनामी नको म्हणुन केसेस दाखल ही करत नसतील, किंवा साधी पोलीसात तक्रारही देत नसतील. पण वस्तुस्थिती अशी आहे की थोड्याफार फरकाने अनेक स्त्रीयांना कधीना कधी कमी जास्त प्रमाणात ह्या गोष्टीला सामोरे जावे लागतेच .
असे म्हणतात की स्त्रीयांना स्पर्शाचे (चांगल्या/ वाईट हेतु )ज्ञान उपजतच असते. मुलगी जेव्हा बाल अवस्थेतून तारूण्यात पदार्पण करू लागते तेव्हा काही पुरूषांचा विकृत स्पर्श, नजर यांची जाणीव तिला निसर्गाकडूनच देणगीच्या स्वरूपात मिळत असते असे वाटते. अशा वेळी तिला परपुरूषा इतकाच धोका तिच्या जवळच्या नातलगांकडूनही असतो. ज्याच्या अंगाखांद्यावर लहानपणी खेळलो असतो अशा लोकांचा वयात आल्यावर सहेतुक स्पर्श कळतो. मनात लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरल्याने मुलीच्या मनाची कुंचबणा होते. जर घरी मोकळे वातावरण नसेल तर ती बोलू ही शकत नाही आणि मनात त्या व्यक्ती विषयी घृणा निर्माण होते. कधी कधी मनात असंख्य विचार येतात, पुरूषांकडे पाहण्याची प्रवृत्ती बदलते. स्वत: बद्दल अपराधी भावना निर्माण होते . कोवळ्या वयात विनयभंगाचा अनुभव आल्यास मुलींच्या मनाची अवस्था अशी होते आणि त्या मनातल्या मनात कुढत बसतात.
आज अनेक ठिकाणी रात्रंदिवस स्त्री आणि पुरूष एकत्र काम करतात. स्त्रीयांना कधी सहकार्यांच्या तर कधी साहेबाच्या विकृत प्रवृतीला समोरे जावे लागते, त्यावेळी कामातील लक्ष कमी होणे, सदैव मन अस्वस्थ असणे वगैरे अनुभव येत असतात.
एखाद्या बसमध्ये, ट्रेन मध्ये , बस स्टॉपवर, जेथे जेथे सार्वजनिक ठिकाणे आहेत तेथे छुप्या प्रमाणात कोणत्या ना कोणत्या स्त्रीचा विनयभंग होत असतो. आज काही स्त्रीया ह्या विरोधी आवाज उठवतात पण त्यांचे प्रमाण खुप कमी आहे, कारण किती ही झाले तरी लाज हा प्रकार स्त्रीला जीवाहुन प्रिय असतो. समजा एखाद्या स्त्रीने ह्या विनयभंगा विरूध्द पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोदंविली तरी तिला इतक्या लज्जास्पद प्रश्नानां सामोरे जावे लागते कि तेथेच तिचा निम्मा धीर खचतो. पुढे ती केस कोर्टात उभी राहिली तर उरलेल्या लाजेच्या चिंध्या त्या बचाव पक्षाचा वकिल काढतो. साक्षीदार असला तर ठीक ,पण असून ही तो फितुर झाला तर ती स्त्री लढा हरते. ह्याचमुळे दुस-या एखाद्या स्त्रीला अशाच गोष्टीसाठी लढा देऊन काही उपयोग होईल असे वाटत नाही आणि ती तो अन्याय मुक पणाने सहन करते.
माझ्या पाहण्यातील कोर्टातील एक केस सांगते जी खुप वर्ष चालली होती.
एक शाळकरी मुलगी होती . एके दिवशी तीची शाळा सुटल्यावर ती घरी गेली आणि घरातून पैसे घेऊन ५० पैशाची पेप्सी मिळते ते आणायला दुकानात गेली. पुढच्या खोलीत दुकान आणि मागच्या खोलीत मकान असा एकूण तिथला प्रकार होता. दुकानदाराने त्या मुलीला आत बोलावले आणि म्हणाला की, " आतल्या खोलीत फ्रीज मध्ये पेप्सी आहे तेव्हा तुच आत जाऊन स्वतःच्या हाताने घे."
ती शाळकरी मुलगी असल्याने तिच्या डोक्यात फारसे काही वेगळे आले नाही (दुकानदाराचा मुलगा आणि बायको गावी गेले होते ) . ही संधी साधून त्याने तिचा विनयभंग केला पण पुढच्या गोष्टी होण्यापासून ती थोडक्यात बचावली, आणि घाबरून पळत घरी आली. मात्र त्यावेळी तिने हे कुणालाच घरी सांगितले नाही. तिच्या रोजच्या वर्तनात मात्र अमुलाग्र बदल झाला होता (मी केस हिस्ट्री आठवुन सांगत आहे, कारण निकाल इतक्या वर्षानी आमच्या कारकिर्दीत दिला गेला असल्याने लक्षात आहे ). तिची भेदरलेली नजर, तिचे विक्षिप्त वागणे, शाळेला न जाणे, आणि कोणत्याही परपुरूषासमोर न येणे हे लवकरच तिच्या घरच्यांच्या लक्षात आले. तिला त्या बाबतीत तिच्या आईने विश्वासात घेऊन जेव्हा विचारले तेव्हा घडलेली गोष्ट उघडकीस आली. मग पोलीसात तक्रार, कोर्ट केस, साक्षीदार, ह्या सगळ्यातुन निकाल लागायला ७/८ वर्ष गेली तो पर्यत ती मुलगी लग्नाला आली होती तरी कोर्टात केस चालु होती. शेवटी सबळ पुराव्या अभावी आणि साक्षीदार कोणी नसल्याने तो आरोपी निर्दोष सुटला. पण त्या पुरूषाच्या विकृत प्रवृतीमुळे त्या मुलीच्या मनावर झालेला आघात ,तसेच तिच्या घरातील लोकांना झालेला मानसिक त्रास हा कधीच न विसरता येणारा अनुभव आहे.
म्हणून मला असे वाटते की,कायद्यात अशी तरतुद हवी होती की ज्यायोगे विनयभंगाच्या केस मध्ये साक्षीदार आणि कागदी घोडे यांचे महत्व कमी असावे आणि अशा प्रकारच्या पीडित स्त्रीची साक्ष महत्वाची ठरवावी म्हणजे आरोपीला शिक्षा मिळण्यास आणि समाजात ह्या गोष्टीचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
वाचने
23809
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
विनयभंग
चांगले -वाईट.
ह्म्म बरोबर आहे
मान्य
विचार
In reply to मान्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
संवेदनशीलता
माझ्या
In reply to संवेदनशीलता by प्रकाश घाटपांडे
लेख आवडला..
पटलं
In reply to लेख आवडला.. by प्राजु
विचार करायला लावणारा..
यू सेड इट...
वाटेवरती काचा गं!
देवकाकांन
चांगला लेख
+१
In reply to चांगला लेख by प्रियाली
दुसरी बाजू
अतिशय गंभीर विषय.
चांगला विषय हाताळलास..........
राधाच्या विचारांशी सहमत.
चावटपणा
चांगला विषय मांडलात
त्याहीपेक
In reply to चांगला विषय मांडलात by सैरंध्री
मानसिक नुकसान ??
बदल
In reply to मानसिक नुकसान ?? by आनंदयात्री
कायदा हातात घ्यावासा वाटतो
In reply to बदल by मनस्वी
विनयभंग...
चांगला विषय मांडला !!!
शितल आपण
In reply to चांगला विषय मांडला !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक गंभीर
बर्याचदा
उदा....
विनयभंग