✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

प
पाषाणभेद यांनी
Mon, 01/16/2012 - 04:16  ·  लेख
लेख
पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे. sarasgadh pali maharashtra सुरूवातीची चढण sarasgadh pali maharashtra सरसगड किल्यावर येथे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक-गावाच्या पुर्वेकडून व दुसरा पश्चिमेकडून. पुर्वेकडचा मार्ग थोडा सोपा आहे. पश्चिमेकडचा मार्ग बल्लाळेश्वर देवस्थानाच्या मागील बाजूने जातो. आम्ही पश्चिमेकडून गेलो होतो. सुरूवातीची चढाई केल्यानंतर मोठे पठार लागते. तेथून सरसगड असा दिसतो. sarasgadh pali maharashtra यावेळी पावसाळ्यानंतर लगेचच गेलो होतो त्यामुळे गवत खुप वाढलेले होते. मला याची अपेक्षा नव्हती. एकतर लहान मुले अन त्यात जनावरांची भिती. त्यामुळे त्यांना आरडाओरड करत व पाय आपटत चालण्यास सांगितले होते. पुन्हा मागे सरसगड दिसतो आहे. (मुले फ्रेममध्ये सतत येत असल्याने कुणाचा रसभंग होत असेल तर क्षमस्व.) sarasgadh pali maharashtra विस्तीर्ण पठारावर sarasgadh pali maharashtra येथे थोडी झाडी आहे. sarasgadh pali maharashtra उंच वाढलेले गवत sarasgadh pali maharashtra sarasgadh pali maharashtra पाली (ता. सुधागड) गाव. पाली हे रायगड जिल्ह्यातले तालूक्याचे गाव आहे. जरी सरकारी अंमलबजावणीसाठी याला सुधागड तालूका म्हणतात, पण पाली येथील किल्याचे नाव सरसगड असे आहे. प्रत्यक्षात सुधागड हा वेगळा किल्ला येथून सुमारे दहा किलोमिटर दुर आहे. sarasgadh pali maharashtra येथे थोडीशी खडकाळ चढण आहे. येथून उतरतांना मात्र बसून उतरावे लागते. sarasgadh pali maharashtra वरील चढाई संपल्यानंतर हा एक टोकाचा भाग आहे. खाली अगदी सरळ उतरण आहे. येथील ग. बा. वडेर शाळेतील मुले शालेय स्पर्धेदरम्यान मात्र येथूनच वरती येतात. त्यांना येथे येण्यासाठी अगदी अर्धा तास लागतो. sarasgadh pali maharashtra याच्याच थोडे वर ही एक चौकोनी गुहा आहे. sarasgadh pali maharashtra गुहा sarasgadh pali maharashtra पुर्वी येथे शिवाजी महाराजांचे शिपाई बसत असावेत. आता हि मुले बसलेली! sarasgadh pali maharashtra येथून वरती जाण्यासाठी पायर्‍या खोदलेल्या आहेत. sarasgadh pali maharashtra क्षणभर विश्रांती... sarasgadh pali maharashtra पहिला दरवाजा sarasgadh pali maharashtra sarasgadh pali maharashtra sarasgadh pali maharashtra sarasgadh pali maharashtra sarasgadh pali maharashtra येथील गवताची उंची थोडी अधिक होती. येथूनच बुरूज चालू होतो. sarasgadh pali maharashtra किल्यावर जाण्याचे तिन टप्पे आहेत. हा दुसरा टप्पा. sarasgadh pali maharashtra sarasgadh pali maharashtra sarasgadh pali maharashtra हे गवत पुरूषभर उंचीचे व अंग कापणारे होते. अद्याप किल्यावर वर्दळही नसल्याने पायवाटही तयार झालेली नव्हती. थोडी काळजी घेत, पाय आपटत, मोठे आवाज काढत येथून मार्ग काढला. sarasgadh pali maharashtra राहण्यासाठी खोदलेल्या गुहा sarasgadh pali maharashtra sarasgadh pali maharashtra sarasgadh pali maharashtra प्रशस्त खडक. याच्याच मागे दोन पाण्याचे टाके आहेत. पाणी पिण्यालायक व थंडगार असते. पुर्वेकडचा व पश्चिमेकडचा मार्ग येथे एकत्र येतात. येथे बरोबर आणलेला थोडफार खाऊ खाल्ला. येथून वरती जाण्यासाठी सरसोट चढाई करावी लागते. लहान मुले असल्याने त्यांना मी खालीच सांभाळले. वरती एक शंकराचे मंदीर आहे. तेथे केवळ शुभम जावून आला. येथे कॅमेरॅची बॅटरी संपली असल्याने पुढील फोटो काढता आले नाहीत. उतरतांना आर्या एक दोन ठिकाणी व मी सुध्दा एके ठिकाणी उतरणीवरच्या गवतावरून पाय सरकून घसरलो. खाली येतांना फारसा वेळ लागला नाही. आल्यानंतर सुरूवातीच्या चढाईच्या ठिकाणी चंद्रपुर येथून आलेले एक दहा बारा जणांचे कुटुंब भेटले. त्यात चार एक महिला, पाच मुले व एक पुरूष होते. त्यांचे कडे पाणी नसल्याने आमच्या पाण्याच्या बाटल्या त्यांनी संपवल्या. पुढे किती चढाई आहे याची विचारपुस झाली. नंतर आम्ही खाली उतरून देवूळवाड्यात शिरलो. (बल्लाळेश्वर देवळाच्या मागील भागास देवूळवाडा म्हणतात.) मुले दमलेली नसल्याने टणाटण उड्या मारतच घरी आली. जरी किल्यावरची चढाई सोपी असली तरी मुलांना मजा देवून गेली.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
भूगोल
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
8071 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

मस्त

प्रचेतस
Mon, 01/16/2012 - 09:04 नवीन
मस्त हो पाभे. मजा केलीत राव. फोटो आणि वर्णनही सुरेख. सरसगड हा सातवाहनकालीन किल्ला. खडकात खोदलेल्या गुहा, खोदीव पाण्याची टाकी, खडकात खोदलेल्या पायर्‍या हे त्याचे प्राचीनत्व सहजी सिद्ध करतात. शिवाय सातवाहनकालच्या व्यापारी मार्गावर बांधलेला हा किल्ला. पायथ्याला सुधागड, सरसगड ही फळी तिथून घाटमाथ्यावर पोहोचणार्‍या प्राचीन वाघजाई, नाणदांड, तैलबैला ह्या घाटवाटा व घाटमाथ्यावर घनगड, कोरीगड हे संऱक्षक दुर्ग. घाटवाटेनजीक ठाण्याळ्याची दुर्गम लेणी आहेतच.
  • Log in or register to post comments

+१

मन१
Mon, 01/16/2012 - 09:16 नवीन
टंकण्याचे कष्ट वाचवलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

व्वाहवा पा.भे.छान सफर

अत्रुप्त आत्मा
Mon, 01/16/2012 - 09:13 नवीन
व्वाहवा पा.भे.छान सफर घडवलीत... बाकी पोरांचे फोटो झ्याक आलेत हां एकदम... :-)
  • Log in or register to post comments

पाभे, फोटो मस्त आलेत एकदम आणि

५० फक्त
Mon, 01/16/2012 - 09:51 नवीन
पाभे, फोटो मस्त आलेत एकदम आणि पोरं फोटोत आल्यानं रसभंग नाही होतंय उलट सगळं कसं जास्त जिवंत वाटतंय..
  • Log in or register to post comments

+१

मोदक
Mon, 01/16/2012 - 09:57 नवीन
+१ सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मस्त वर्णन !!! गडावरील

धन्या
Mon, 01/16/2012 - 10:07 नवीन
मस्त वर्णन !!! गडावरील शंकराचे मंदीर खुप छान आहे. खरं तर ते एक देवस्थान आहे. म्हणजे मंदीराला छप्पर आणि भींती नाहीत. परंतू खुप प्रसन्न वाटते गाभारासदृश्य जागेमध्ये.
  • Log in or register to post comments

फोटो आणी वर्णन दोन्ही मस्तच.!

किसन शिंदे
Mon, 01/16/2012 - 10:34 नवीन
फोटो आणी वर्णन दोन्ही मस्तच.! प्रत्येक फ्रेम या छोट्या मावळ्यांमुळे जिवंत झालेली दिसतेय.
  • Log in or register to post comments

पाभे,

प्रास
Mon, 01/16/2012 - 11:02 नवीन
धमाल एस्कर्शन! निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारी कोणतीही भटकंती एस्कर्शनच्या तोडीचीच असते. फोटो मस्तच! फोटोत लहान मुलांच्या अतिक्रमणाने कुणाचा रसभंग होत असेल तर त्यास छायाचित्रणातला 'औरंगजेब' अशी पदवी पुरेशा मानहानीपूर्वक देण्यात यावी, अशी मी या ठिकाणी मागणी करून ठेवतो. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मस्त आवडेश

पियुशा
Mon, 01/16/2012 - 11:49 नवीन
मस्त आवडेश :)
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
Mon, 01/16/2012 - 18:09 नवीन
मस्त... :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम ... फोटॉ तर खुप छान !

गणेशा
Mon, 01/16/2012 - 18:25 नवीन
अप्रतिम ... फोटॉ तर खुप छान ! मस्त वाटला तुमचा ट्रेक ..
  • Log in or register to post comments

मस्तच !!!!!

स्वतन्त्र
Mon, 01/16/2012 - 20:30 नवीन
पोरांचे फोटो झकासस्स्सस्स्स !!!! मुलांएवढे असतानाच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल आभारी आहोत !
  • Log in or register to post comments

"सरस" गड केलात राव

बज्जु
Tue, 01/17/2012 - 00:13 नवीन
"सरस" गड केलात राव. सरसगडाची काही वर्षांपुर्वीची एक गमतीदार आठवण. आमच्या संस्थेचा (निसर्ग गीरीभ्रमण संस्था) हा ट्रेक ठरला होता. भेटण्याची वेळ दिवा स्टेशनला सं.६.३० वा. ची होती, पण काही गैरसमजुतीने म्हणा किंवा अतीऊत्साहाने म्हणा मला वाटलं सकाळी ६.३० ला भेटायच आहे. मी दिवा स्टेशनला सकाळी ६.३० ला हजर, सवंगडी कोणीच दिसेनात, दिवा-रत्नागिरी गाडी नेहमीप्रमाणेच भरलेली होती. मला वाट्लं गाडीत बसले असतील, नागोठण्याला भेटतीलच. कसलं काय. म्ह्टलं आपल्या आधीच्या गाडीने गेले असतील, पालीला किंवा गडावर भेटतील. तडक नागोठण्याहुन एस.टी. पकड्ली, पालीला आलो, देवळाच्या मागुन कुठूनतरी गडावर वाट जाते एवढीच माहीती होती, विचारत विचारत एकदाचा गडावर पोहोचलो. सबंध गडावर मी एकटाच, नाही म्हणायला माझ्याबरोबर एक कुत्र आलं होतं, म्हणजे गडावर कुत्रही न्हवतं अस म्हणायलाही मला त्याने जागा ठेवली नाही. म्ह्टल त्यांची गाडी चुकली असेल, संध्याकाळ पर्यंत येतीलच. म्हणुन वरतीच मुक्काम करायचं ठरवलं, शंकर भगवान होतेच सोबतीला, दुस-या दिवशी सकाळी मी खाली ऊतरलो, देवळाजवळ्च्या एका हॉटेलात खात बसलो होतो, तर माझ्यासमोरुन आमचा ग्रुप चाललेला, त्यांना हाका मारल्या, एकमेकांची विचारपुस (?) करुन झाली, आणि त्यांच्या बरोबर परत गडावर गेलो. पण सह्याद्रीतल्या कुठल्या ना कुठल्या गडावर एकट्याने रात्र काढायचा अनुभव मात्र हा सरसगड देऊन गेला.
  • Log in or register to post comments

भारी

गणेशा
Tue, 01/17/2012 - 21:06 नवीन
भारी च...............................................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बज्जु

हे भारीच!! पाभेचा लेख अन

शिल्पा ब
Wed, 01/18/2012 - 11:20 नवीन
हे भारीच!! पाभेचा लेख अन चित्र दोन्ही छान. पोरगी गोड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बज्जु

मस्त

रवि पवार
Sat, 03/07/2015 - 14:28 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा