सो...हम....सो...हम!!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मिपाकर मित्रमंडळींनो,
`आपला अभिजित` नावाने मिपावर वावरणारा त्रस्त समंध गेले काही दिवस, काही महिने कुठे गायब झाला, असा प्रश्न आपणांस पडला असणे साहजिक आहे. अर्थात, हा आपला माझा समज. `तुझ्यावाचून मिपा ओस पडलंय रे बाबा, कधी परततोयंस` अशी आर्त साद मला कुणी खव किंवा टपाल हापिसातून घातलेली नाही. मिपावर एकाहून एक सरस आणि सुरस लेखकु असताना अस्मादिकांची विशेष दखल घ्यावी असे नाही. तरीही अस्मादिक कुठे होते, आणि सध्या काय करतायंत, हे सांगण्याचा हा आगाऊ प्रयत्न.
गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये. मिपावर तर फिरकलो नव्हतोच, पण ब्लाॅगलाही गंज चढलाय. गुंतलोय एका वेगळ्या माध्यमात. टीव्ही सिरियलच्या लिखाणात. एका प्रसिद्ध मालिकेसाठी काही महिने संवादलेखनासाठी साहाय्य करत होतो, आता माझ्या नावे एक स्वतंत्र मालिका प्रसारित होऊ लागली आहे. स्टार प्रवाह वरची `दोन किनारे दोघी आपण.` (संध्याकाळी ७, रात्री १०,३० आणि सकाळी ११.३०.) पटकथालेखिका आहेत अपर्णा पाडगावकर आणि संवाद मी लिहितो.
गेले काही महिने, वर्षं अभिजित पेंढारकर नावाच्या माझ्या संगीतकार नावबंधूने माझं जिणं हराम केलंय. लोक किती मूर्ख, नादान आणि अकलेचे खंदक असतात, हे या नावबंधूमुळेच मला कळलं. `तुमचा मुलगा सिरियलमध्ये काम करतो का हो, गुंतता हृदय हे मध्ये नाव येतं, ते तुम्हीच का,` अशा उथळ, बिनबुडाच्या आणि बाष्कळ प्रश्नांनी हैराण झालो होतो. अरे डोळेफुटक्यांनो, तुम्हाला देवानं जी पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं दिल्येत, त्यांच्यावरची धूळ झटकून कधीतरी ती वापरात आणा ना, असं कळवळून सांगावंसं वाटायचं. पार्श्वसंगीत - अभिजीत पेंढारकर, असं ढळढळीत अक्षरात लिहिलेलं तुम्हाला वाचता येत नाही का रे नतद्रष्टांनो, असं विचारायचं तोंडावर यायचं. पण कमावलेल्या सभ्यतेशी प्रामाणिक राहून मी गप्प राहायचो.
आता मात्र कुणी विचारलं, की `दोन किनारे दोघी आपण`चा संवादलेखक तूच का रे बाबा, तर मी छाती पुढे काढून सांगू शकतो...हो, तो मात्र मीच!!
प्रतिक्रिया
>>>डोळे पाणावले डोळे जातील
भा. सं.
आयला, हा धागा पाहिलाच नव्हता.
अभिदा आधी चेपु वर शुभेच्छा
प्रतिसादांचा सुवर्णमहोत्सव
हम्म..
खुलासा पटला नाही. संगीत देणे
प्रतिसाद पटला नाही.
तर लोकांच्या बालबुद्धीला
काही आगन्तुक सल्ले
अभिनंदन
+१
..
किती सारवासारव करायची ती.
. थेंबातून गेलेली हौदातून
>>थेंबातून गेलेली हौदातून
अभिजित, तुम्हारा थोडा चुक्याच.
माझे नाव आडनाव आणि जगातील एका
येक्कद्दम चोक्कस्स!...
Pagination