ही आधी केलेली स्वयंपाक घरातील लुडबुड
http://www.misalpav.com/node/16330
http://www.misalpav.com/node/13709
http://www.misalpav.com/node/13909
http://www.misalpav.com/node/14007
आणि दिपालीदेवी आणि गणपाशेफ यांच्या प्रेरणेवरून.
विनंती : पाकृ करताना फोटो काढण्याच्या त्रेधा-तिरपटी साठी लेखकांस क्षमा असावी
भारतीय आहारपध्दतीत डाळी ला अन्यनसाधारण महत्व आहे, (लोक घर की मुर्गी दाल बराबर म्हणत असले तरी जर का दाल परफेक्ट असेल तर बाहेरची मुर्गी देखील...हॅ हॅ हॅ ;) ) साधं रेस्टारंट मध्ये जेवायला गेलेल्या व्यक्तीचा डाल फ्राय /डाल तडका यांच्याशिवाय मेनु पुर्ण होत नाही. डाळ ही सहजा-सहजी कूठे ही मिळत असली तरी बनवणे म्हणजे महा कर्म कठीण काम असते. जरा तेलाच,पाण्याच प्रमाण, कूकर ची शिट्टी, जिरे-मोहरी चा तडका हिकडचा तिकडं झाला की डाळीची वाट लागलीच म्हणुन समजा. (वर आमच्या सारख्या आय टी नवर्यांना " साधी डाळ करता येत नाही " हे एकावे लागेल ते बोनसमध्ये ;) )...असो ...
अश्याच काही डाळींमध्ये मेथी डाळ हा एक अजुन अवघड प्रकार, स्वताचा 'कूकींग सेन्स' चा कस पहायचा असेल तर ही पाकृ चॅलेंज म्हणुन करायला हरकत नाही, कारण मेथी चा कडवट पणा आणि डाळी ची चव, जिर्याचा तडका, हिरव्या-लाल मिरच्या, ह्या सर्व जिन्नसांची योग्य त्या प्रमाणात शिजवण झाली नाही तर जिभेवर ठेवल्या-ठेवल्या बनवणार्याच्या प्रयत्नांची बोळवण होते. (मी जेव्हा पहिल्यांदा केली तेव्हा कूकर उघडला तशी माझी शेजारिण घावत येवुन म्हणाली की घरात 'वायर' जळाली आहे बहुधा ;) ) आणि याच मुळे ही पाकृ लिहीताना मी प्रमाण देण्याचे टाळतो आहे.
१ ) मेथी खुडून घ्या. (सुचना : बाजारात हल्ली कलर केलेल्या मेथीच्या गड्ड्या असतात, आधी घेताना भाजीवाल्याच्या नकळत एक भिजलेले पान खुडून जरा चिमटीत घासुन घ्या , हाताला कलर लागला तर सरळ दुकान बदला.)
२ ) डाळ निवडुन भिजवुन घ्या. ( सुचना : इथे ही कलर्ड, प्रोसेस्ड भानगडी आहेतच, मी माझ्या च शेतातली वापरतो :) )
३ ) ट्माटे कापुन घ्या, मिरच्यांचे देठ खुडून घ्या (ज्यांना तिखट हवे असेल त्यांनी कापुन घ्या ! मी नंतर तडका देताना लाल मिरच्या टाकल्या आहेत.)
(पुढे सर्व काही मंद आचेवर )
४ ) थोड तेल, थोड हिंग (ही आमची चॉईस ) टमाटे आणि मिरच्या कूकर मध्ये परतावुन घ्या.
५ ) डाळ आणि मेथी नीट पणे मिक्स करुन घ्या. ( इथे पाणी घालण्याचे प्रमाण सांगत नाही, मेथीला पाणी लागत नाही, मात्र डाळ शिजण्यासाठी लागते , स्वता ठरवायचे आहे . )
६ ) कूकर ला शिट्ट्या दोवु द्यात ( मी एकच दिली :) ) मध्यंतरात , लसुन सोलुन घ्या, पेस्ट बनवा वा आमच्या पध्दतीने चिरडुन घ्या ;)
७ ) ईकडे कुकर थंड झाल्यावर (कडवट सुगंध आला पाहिजे मेथीचा पण जरा व्यवस्थित :) )
७ ) मग तडका एके तडका !!
८ ) वर शिजवलेली डाळ टाका ..एक उकळी येवु द्यात
९ ) गरमा-गरम मेथी डाळ तयार !! ( मी काही सोबत चपात्या बनविल्या, वाटाणा-बटाटा पुलाव सकाळीच केला होता)
या मंडळी जेवायला
वाचने
11504
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
येतोच रे संध्याकाळी उपास
असेच म्हणते
In reply to येतोच रे संध्याकाळी उपास by गणपा
आयला, मस्तच की
वा रे आयटी हमाल...आणि
भारीच !
अंमळ विश्वास ठेवणे
In reply to भारीच ! by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to भारीच ! by परिकथेतील राजकुमार
मस्त पाकृ. मेथीच्या भाजी ऐवजी
+ १
In reply to मस्त पाकृ. मेथीच्या भाजी ऐवजी by पुष्करिणी
येवू द्या....
पाककृती छान आहे. पण मेथी
मस्तच!
मेथी डाळ छानचं
In reply to मस्तच! by स्मिता.
आह्हा...
अजुन पाक्रु येउद्यात....
मस्तच रे..फक्त चव कशी आहे हे
सही रे.... भेटू लवकरचं
आनंद आहे, धुक्यातली दाळ मेथी
@५० फक्त अवांतर - काही बॅचलर
In reply to आनंद आहे, धुक्यातली दाळ मेथी by ५० फक्त
आमची पियू कि नै स्वनापक खूप
In reply to @५० फक्त अवांतर - काही बॅचलर by पियुशा
एकदम मस्त पाकृ...माझी ऑल टाइम
मस्त डाळ !
अभिनंदन! तुमच्या
चविष्ट दिसतेय. तुझ्या बायकोने
नविन धंदा सुरु केल्याबद्दल
छान ..
मस्त आवडता पदार्थ... पण काहि
दिपालीदेवी म्हणजे मीच कां??
मूर्ख आहेस लेका. उगा कष्टलास
हात मेल्या!! इथं पण मीठ घातलं
मस्त पाकृ...
वरील प्रतिसादात बर्याच
तू धंदा बदललास काय
In reply to वरील प्रतिसादात बर्याच by मराठमोळा
डाळमेथी.
मस्तच!
करून बघितली.लई भारी