कॅमेरा vs कॅमेरामन
फोटोग्राफी हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय, स्वतःला जरी तांत्रिक ज्ञान आणि त्यातली कला अवगत नसली तरी चांगल्-वाईट कळण्या इतपत फोटोग्राफी कळते (असा माझा अंदाज).
National Geography, Discovery अशा संस्थाळांवर नियमित फोटो पाहणे, तसेच आंतरजालावर विविध निष्णात फोटोग्राफर्स चे काम पहाणे याचा तर व्यासंगच जडलाय. मिपावर देखील बरीच गुणी फोटोग्राफर मंडळी आहेतच, त्यांच्या "कलादालन" या विभागात मी नित्यनियमाणे भेट देत असतो. इथे बरीच मंडळी " Exposure, Shutter Speed, Aperture, ISO, Focal Length” अशा काहितरी सांकेतिक भाषेत बोलत असतात, त्यातल मला तरी काही कळत नाही बुवा पण अगदी पूर्वीपासून भेडसवणारा प्रश्न लख्ख समोर उभा राहतो की "कॅमेरा (अर्थात उपकरण आणि तांत्रिक ज्ञान) महत्वाच की कॅमेरामन (अर्थातच Photographic Sense)...?
याच अगदी सोप्प उत्तर म्हणजे दोघांचा समतोल पण हे इतक सोप्प नाही हे मला माहित आहे. याच उत्तर शोधायच ठरल आणि लगेचच एक Digital Camera घ्यायच नक्की केल. SLR, DSLR या प्रकारांचा गंधही नसल्यामुळे SONY चा Cyber-shot DSC-HX100V Black Digital Camera (16.2 Megapixel - 4.80 mm-144 mm - 3" LCD - 30x Optical Zoom - Optical IS - 4608 x 3456 Image - 1920 x 1080 Video - MPEG-4) हा कॅमेरा घेतला. वापरायला सोप्पा, उत्तम Auto Option म्हणजेच टेंशन कमी आणि दिसायला देखील चांगला म्हणून हाच घेतला.
माकडाच्या हाती कोलित मिळाल आणि मी फोटो काढत सुटलो... User Manual पण नाही वाचल आणि फक्त Instinct वापरुन बरेच फोटो काढले. न ठरवताही बर्याच गोष्टी शिकलो... प्रकाश आणि सावली याचा खेळ लक्षात येउ लागला आणि तांत्रिक ज्ञान किती महत्वाचे आहे हे पुरत उमगल. काढलेले फोटो अगदीच basic म्हणजे बावळट असले तरी कॅमेराने आपले काम चोख बजावले होते, बरेच फोटो मला स्वतःला आवडले त्यामुळे उत्तम फोटोग्राफी हा जसा तांत्रिक ज्ञान, कॅमेरा आणि कलाकार (?) यांचा समण्वय जरी असला तरी चांगला कॅमेरा आपले काम चोख बजावतोच अशा मताला मी पोहचलो आहे.
मी काढलेले काही फोटो मी परिक्षणासाठी खाली देत आहे, जाणकारांनी कॄपया उचित मार्गदर्शन करावे. फोटो टुकार असल्यास खुशाल टुकार म्हणावेत... खर तर अशा परखड मतांच स्वागत आहे. त्याशिवाय माझ्यासारख्या अगदी नवख्या माणसाने सुरुवात कशी आणि कुठे करावी याचे मार्गदर्शन केल्यास मंडळ आभारी राहील.
१) माझ्या फोटोग्राफीच्या किड्याचे उगमस्थान : आमचे चिरंजीव
२) बाल्कनीतला जास्वंद इतका सुंदर कधीच भासल नाही
३) चिरंजीव "हाट रे, हाट रे" करायच्या आत टिपलेला क्षण
४) दादाची मनी माऊ... ! वय वर्षे २ दिवस...!
धन्यवाद...!
सौरव जोशी
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
सुंदर!!
सर्वच फोटो मस्त आहेत. जास्वंद
सगळे फोटो मस्तच आहेत. पहिला
पहिला फोटो वेगळ्या प्रकारचा आलाय
प्रकाशयोजना किंवा फोटो
मी काही या विषयातला जाणकार नाही पण....
मस्त रे, आयुष्यातल्या
छान फोटो..
फोटो सुंदर आहेत !!
तुम्हि विचारलेल्या ओदिक्वनत्त्म अरेङाअकै
तुमचे सुपुत्र अन माउ फार फार
सर्व फोटो छान आहेत
-
मस्त
धन्यवाद
फोटो अतिशय सुन्दर आले आहेत
छायाचित्रण एक छंद...
धन्यवाद...!
पेठकर काकांशी सहमत ! प्रकाश
मस्त..
सल्ला बिल्ला जाउ द्या हो...
धन्यवाद...!
छान फोटो
आभार
हे फोटो मस्त आले आहेत....
फोटो उत्तम आहेत
सगळे फोटू मस्त..मस्त..आणी
पण ४च का टाकले..?
सुरेख फोटो.. आणखीही काढले
मस्त मस्त !