मित्रांनो आज मी तैवानसारख्या बर्याचजणांना अपरिचित आणि अनवट अश्या भूप्रदेशाची (किंवा देशाची) ओळख करुन देणार आहे. तैवानमधल्या ५ वर्षांच्या वास्तव्यामध्ये तिथे पाहिलेल्या अनेक ठिकाणांची प्रचिंद्वारे ओळख करुन देण्याचा प्रयत्न राहील.
तैवान म्हटले कि आपल्याला आठवतो तो चीन, कारण चीन आणि जगातले बरेच देश तैवानला चीनचाच एक भाग मानतात. भारताच्याही अधिक्रुत धोरणानुसार हा चीनचाच एक भाग आहे. पण खरेपाहता चीनचा तैवानवर कोणत्याहीप्रकारे अंमल नाही. तैवानचे स्वत:चे सैन्यदल आहे, स्वत:चे करंसी आहे, स्वतंत्र सरकार आहे. बर्याच जणांचा गोंधळ होतो तो तैवानच्या नावाने, तैवानचे अधिक्रुत नाव आहे "रिपब्लिक ऑफ चाइना" किंवा ROC आणि चीनचे "पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना" किंवा PRC. कम्युनिस्ट क्रांतीनंतर चीनचा नेता चैंग काय शेक च्या नेत्रुत्वाखाली तैवान मध्ये लोकशाही सरकारची स्थापना करण्यात आली आणि तैवानला खरा चीन घोषित करण्यात आले. अगदी १९७१ पर्यंत संयुक्त राष्ट्रांमध्ये तैवान चीनचे प्रतिनीधित्व करत होता, पण नंतर चीनच्या (तैवानमध्ये चीनला Main land china म्ह्णतात) वाढत्या प्रभावामुळे तैवानला ती जागा सोडावी लागली.
जगाच्या नकाशावर अगदी ठिपक्याप्रमाणे आणि पानाच्या आकाराचा हा देश नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. एकुण लोकसंख्या 23,061,689 असून त्याची राजधानी तैपेई (तेथल्या उच्चारांनुसार "थायपेई"), एक अतिशय सुंदर आणि आधुनिक शहर आहे. चाईनिज ही तेथील सरकारी कामकाजाची भाषा असूनसुध्दा Main land china ची चाईनिज आणि येथील चाईनिजमध्ये खूप फरक आहे जसे की, उच्चार, कांजी.
माझे वास्तव्य हे "व्हालियन" (Hualien) नावाच्या तैवानमधील सर्वात मोठ्या परगण्यात होते. व्हालियन हे शहर पूर्व किनार्यावरील सर्वात मोठे शहर आहे, पण पश्चिम किनार्यावरील ईतर शहरांच्यामानाने थोडेसे अविकसित आहे. कदाचित शहराला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहचू नये म्हणून हा निर्णय घेतला गेला असावा. व्हालियनला तैवानचे "स्वित्झर्लंड" म्हणतात (जरी इथे बर्फ पडत नसलातरीही), आणि हे कमी की काय म्हणुन आमचे विद्यापीठ ही तैवानचे सगळ्यात सुंदर विद्यापीठ म्हणुन गणले जाते. विस्तीर्ण अशा ५०० एकरवर हे विद्यापीठ पसरलेले आहे, चोहोबाजुंनी डोंगराने वेढलेला विद्यापीठाचा परिसर, वैशिष्ठयपूर्ण इमारती, मुबलकप्रमाणात हिरवळ आणि असलेले तळं ह्यामुळे विद्यापीठाच्या सौदर्यात भरच घातली आहे.
तर जास्त वर्णन न करता आता आपण प्रचि पाहुयात-
व्हालियन
व्हालियन रेल्वे स्थानक
शहरात मांडलेले अतरंगी बाकडी
शहराचा समुद्रकिनारा
माझे विद्यापीठ- विद्यापीठाची कार्यालयीन इमारत
विद्यापीठाचे ग्रंथालय-
काही माहिती आणि प्रचि जालावरुन साभार.........
जगाच्या नकाशावर अगदी ठिपक्याप्रमाणे आणि पानाच्या आकाराचा हा देश नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. एकुण लोकसंख्या 23,061,689 असून त्याची राजधानी तैपेई (तेथल्या उच्चारांनुसार "थायपेई"), एक अतिशय सुंदर आणि आधुनिक शहर आहे. चाईनिज ही तेथील सरकारी कामकाजाची भाषा असूनसुध्दा Main land china ची चाईनिज आणि येथील चाईनिजमध्ये खूप फरक आहे जसे की, उच्चार, कांजी.
माझे वास्तव्य हे "व्हालियन" (Hualien) नावाच्या तैवानमधील सर्वात मोठ्या परगण्यात होते. व्हालियन हे शहर पूर्व किनार्यावरील सर्वात मोठे शहर आहे, पण पश्चिम किनार्यावरील ईतर शहरांच्यामानाने थोडेसे अविकसित आहे. कदाचित शहराला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहचू नये म्हणून हा निर्णय घेतला गेला असावा. व्हालियनला तैवानचे "स्वित्झर्लंड" म्हणतात (जरी इथे बर्फ पडत नसलातरीही), आणि हे कमी की काय म्हणुन आमचे विद्यापीठ ही तैवानचे सगळ्यात सुंदर विद्यापीठ म्हणुन गणले जाते. विस्तीर्ण अशा ५०० एकरवर हे विद्यापीठ पसरलेले आहे, चोहोबाजुंनी डोंगराने वेढलेला विद्यापीठाचा परिसर, वैशिष्ठयपूर्ण इमारती, मुबलकप्रमाणात हिरवळ आणि असलेले तळं ह्यामुळे विद्यापीठाच्या सौदर्यात भरच घातली आहे.
तर जास्त वर्णन न करता आता आपण प्रचि पाहुयात-
व्हालियन
व्हालियन रेल्वे स्थानक
वाचने
14502
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान फोटो आहेत आणि तैवान बद्दल
छान
तैवानची मस्त सफर घडवलीत. फोटो
मस्तं.
हेच म्हणतो.. आणी त्याबरोबर
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
छायाचित्रे मोठी हवीत हंसा.
धन्यवाद
अतिशय उत्तम प्रकाशचित्रे!
नक्कीच!
In reply to अतिशय उत्तम प्रकाशचित्रे! by बिपिन कार्यकर्ते
फोटो आवडले, मस्त आहेत. थोडीशी
मस्तच फोटो आहेत! सफर आवडली!
मस्त... असेच लिहीत रहा...
सुंदर!! फोटो खाली कॅप्शन्स
मस्त
ममो, छोटा देश हाच त्यांचा USP
In reply to मस्त by मराठमोळा
हेच म्हणतो
In reply to मस्त by मराठमोळा
तैवानविषयी सहसा जास्त काही
छान
तैवान असाच पहायला आणि वाचायला
फोटो छान
फोटू आवडले. अजून येउद्या.
असेच
In reply to फोटू आवडले. अजून येउद्या. by बबलु
मस्त
छान. तैवान बद्दल अजून थोडे....
+१